माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २४ एप्रिल, २०१६

तारा...!!!

 

पहिल्या दिवशी तो ऑफिसला आला तेव्हा,
शेजारच्या प्रत्येकालाच खूप सोज्वळ वाटला...
पहिल्या दिवशीच एस ए पी बाबतीत विचारू लागला,
अन पहिल्या भेटीत खुपच सिन्सिअर भासला...

दिवस गेले तसे तसे,
त्याचाही रंग बदलला...
नवीन मुलगी ऑफिसला आली,
अन त्याचा खरा चेहरा समोर आला...

तिला बघताच पहिल्या नजरेत,
त्याचा न जाणे कोणता तारा जुळला...
शेजारचा तो जागा बदलून चक्क,
तिच्या शेजारीच बसायला गेला...

एम एम शिकता शिकता तो,
कधी एफचाच होऊन गेला...
तारा जुळवता जुळवता त्याचा,
नवीनच काही काही शिकवू लागला...

पुन्हा नवीन मुलगी ऑफिसला आली,
अन तो तिच्या शेजारीच बसायला गेला...
हिंदी, मराठी, इंग्रजी, बंगाली करत,
त्याचा पुन्हा नव्याने तारा जुळला...

रोज नवीन शिकवण्याच्या बहाण्याने मग,
सिनियर ज्युनियर भेद दूर झाला...
सर सर सुरू झालेला संवाद,
खासगी नावाने जवळ आला...

वाढत्या संवादासंवादातूनच,
नकळत टोकाचा विसंवादही झाला...
पण मराठी शिकवण्याच्या बहाण्याने मग
पुन्हा एकदा टाका ठीक केला...

पुन्हा नवीन मुलगी ऑफिसला आली,
अन पुन्हा त्याचा जुना शिरस्ता सुरू झाला...
टोमण्याला वैतागून शेजारचा तो,
समोरासमोर बसू लागला...

शेजारी असण्याचा फायदा घेत,
नजरेने नजरेचा संवाद साधला...
संवाद ओळखीच्या पुढे जाऊनच,
त्याचा तिचा नंबरही शेअर झाला....

वाढता संवाद नकळतपणे,
लिफ्टमधल्या हाय बाय पर्यंत पोहचला...
बॅच डिटेरमाईन करता करता,
नवीन तारा डिटेरमाईन झाला...

तारे जुळवता जुळवता त्याचा,
एक मात्र चांगला फायदा झाला....
एकमेकांच्या साथीने शिकता शिकता,
सगळ्या मोड्युलचा प्रवास करून झाला...




गणेश दादा शितोळे
(२४ एप्रिल २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा