नक्की देशभक्त कोण...?
नुकताच कन्हैया कुमार पुण्यात येऊन गेला तेव्हा त्याचे भाषण टिव्हीवर लाईव्ह बघण्याचा योग आला. कन्हैया कुमार, त्याची भूमिका आणि तो देशभक्त की देशद्रोही यावर काहीही टिप्प्पणी करायची नाही. कारण या गोष्टी माझ्या करता गौण ठरतात. पण पुण्याच्या सभेत कन्हैया कुमारने मांडलेला एक विचार मनाला भावून गेला. सध्या देशात एकंदरीत देशभक्त आणि देशद्रोही हा वाद वेगळे वळण घेत आहे. कन्हैया कुमार याने व्यक्त केलेली देशभक्ताची व्याख्या अगदी पटणारी वाटते. खरा देशभक्त कोण..? खरा देशभक्त कोण तर जो यदिवसरात्र राबून देशातील लोकांना पोसतो तो शेतकरी आहे देशभक्त. "समाजाकरता देशाकरता चांगले काम करणे हे आपले कर्तव्य समजून काम करणे म्हणजे खरी देशभक्ती. "
सीमेवर ऊन ,वारा, पाऊस याची परवा न करता देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेकरता डोळ्यात तेल घालून उभे ठाकणारे सैनिक आसेत देशभक्त. या देशातील आपली समाज आणि देशाची जबाबदारी समजून आपलं कर्तव्य करणारा प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. मग तो शेतकरी असो की कामगार असो की उद्योजक. भारत माता की जय म्हटलं आणि राष्ट्रगीत येत असेल तरच देशभक्त ही देशभक्तीची व्याख्या किती तकलादू आहे हे तेव्हा कळतं. मीच काय पण कित्येकांनी ऐकलं असेल किंवा माहिती असेल की देशातील अनेक लोकांना भारत माता की जय, किंवा राष्ट्रगीत माहिती सुद्धा नाही. आपल्या वडीलधार्या व्यक्तींना विचारलं की लक्षात येते की त्यांच्या कानावर हे पडलं पण ते नेमके काय आहे माहीत नाही. कारण कधी शाळेत जाण्याचा प्रश्नच आला नाही तर भारत माता की जय काय आणि राष्ट्रगीत कानावर पडण्याचा संबंधच कुठे येतो. मग अशा लोकांना आपण देशद्रोही ठरवणार आहोत का हेही तपासले पाहिजे.
दुसरा भाग असा की मुळात भारत माता की जय किंवा राष्ट्रगीत येत नाही म्हणून देशभक्त काय किंवा देशद्रोही काय हे ठरवण्याचा अधिकार एका विशिष्ट लोकांना कुणी दिला..?
मी या देशाचा नागरिक आहे हे ठरवण्याचा अधिकार घटनेला दिला आहे तर मग त्याच देशाबाबत मला प्रेम आहे की द्वेश हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा घटनेलाच आहे. देशभक्तीची सर्टीफिकेटं वाटण्याचा अधिकार घटनेने कोणालाही दिलेला नाही. उगाच काही झालं की हा देशद्रोही, हा देशभक्त अशी तकलादू देशद्रोहाची व्याख्या नाही आणि देशभक्तीची सुद्धा नाही. मुळात आपण देशासाठी काय करतोय हे बघायला हवे. देशासाठी आपण चांगले काही करण्याचा प्रयत्न करत आहोत की नाही त्यावरून आपोआपच देशभक्ती आणि देशद्रोह समजून घ्यायला मदत होते. यानिमित्ताने अगोदर स्वतःला या चौकटीत बसतोय का तपासून मग दुसर्याकडे बोट दाखवणे उचित. नाहीतर उगाच आपल्याला समोरच्याचे म्हणणे मान्य नाही की सरळसरळ देशद्रोहाचं लेबल ठोकून द्यायचं हे चूकच आहे. अगोदर समोरच्या व्यक्तीला ऐकून घेण्याची मानसिकता तयार व्हायला हवी. ऐकण्याची तयारी ठेवाली विचारातील खोलपणा जाणवतो. मग असे तकलादू बाबींवर आधारित विचारसरणीला धक्का पोहचून देशभक्ती की देशद्रोही विचार जन्मालाच येत नाही.
गणेशदादा शितोळे
(२५ एप्रिल २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा