माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, २६ मार्च, २०१७

कॉलेजकट्याचे अंतरंग 

(भाग ३) 

कॉलेजचे सुरवातीचे दिवस


        

डायरेक्ट सेकंड यीअरचे राऊंड जवळपास संपत आले होते. कॉलेज आता नियमित सुरू झाले होते. शेवटच्या राऊंडमधे अजून दोन नवखे चेहरे वर्गात सामिविष्ठ झाले. मुंबईकर आशिष नारकर आणि वसईविरारचा वर्तकनगरचा धवल संखे. सुरवातीला पहिल्या दिवशीच धवल माझ्यासोबत पहिल्या बेंचवर बसला होता तव्हाच त्याच्याशी ओळख झाली. त्याच्या वहीवरील आ. हितेंद्र ठाकूर यांचा फोटो पाहिला आणि वाटलं की हाही पक्का पंटर दिसतोय. राजकारणाशी माझा संबध नव्हता असं नव्हतं. चर्चेच्या गुऱ्हाळाचा उलट प्राधान्याने घेतला जाणारा विषय असल्याने मला बऱ्यापैकी माहिती होतीच. हितेंद्र ठाकूर यांच्याविषयी मी जाणून होतो. त्यामुळेच त्यादिवसानंतर माझा त्याच्याशी फारसा संबध आलाच नाही.
कॉलेज नियमित सुरू झाल्याने लेक्चरला बऱ्यापैकी गर्दी जाणवत होती. बहुसंख्येने डायरेक्ट सेकंड यीअरचेच अॅडमिशन असल्याने वर्गात बहुमत डिप्लोमा करून आलेल्या मुलांकडेच होते. डिप्लोमा करून आलेले आणि फस्ट यीअरमधून पास होऊन आलेले हा फरक स्पष्ट जाणवत होता. डिप्लोमा करून आलेल्या मुलांकडे पाहिले तर उंचपुरे आणि तरणीबांड मुलं दिसायची. तर तुलनेने फस्ट यीअरमधून पास होऊन आलेली मुलं किरकोळ अन लहान वाटत होती. आणि ती मोजकीच असल्याने लगेच कळून येत होते. खिडकीच्या बाजूच्या दोन रांगेत ही सगळी लहान मुलं आणि उरलेला वर्ग हा तरण्याबांड मुलांनी भरलेला होता. अजून बऱ्याच जणांशी ओळख व्हायचीही बाकी होती.
डिप्लोमासारखा इन्ट्रोडक्शनचा प्रकार काही झाला नसल्याने नावंसुद्धा माहित नव्हती. काही मोजकी मंडळी माहीतची झाली होती. वैभव, रोहीत, मी, पंकज, आणि सागर असा चांगला ग्रुप झाला होता. पंकजशी तर अधिकच मैत्री झाली होती. कारण दोघांचंही एक काम निवांतपणे चालू असायचे. ते म्हणजे समोरच्या कंप्युटरच्या वर्गातकडे अधून मधून सरांच्या नकळत कोणी दिसतंय का ते पहायला नजर लावून बसणे. पहिल्या बाकाचा असाही फायदा असतो हे फार थोड्या जणांना माहित असणारा प्रकार होता. पिंपळे, अविनाश थोरात, महादेव आटोळे, महेंद्र थोरात ही त्यातल्या त्यात नव्यानेच माहित झालेली काही नावे होती.
अविनाश थोरात म्हणजे अव्या एकदम कॉमेडी माणूस. आमच्या सगळ्यातील सर्वात जेष्ठ व्यक्तीमत्व. चार विषय राहिल्याने नापास झाला होता. पण पुनर्मुल्यांकनात एखादा विषय सुटण्याच्या अपेक्षेने कॉलेज करत होता. महेंद्र जाधव हेही तसं आम्हाला जेष्ट असणारंच व्यक्तिमत्व होतं. पण नक्की जन्मतारीख किती हे कुणालाही ठाऊक नसल्याने कायम त्याच्या वयाबाबतीत चर्चा ही होतच असायची. त्याचं एक वेगळं विश्व होतं. त्याविश्वात दोघंच असायचे. त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा बाक हा फिक्स होता. कोणालाही त्यावर बसून देत नव्हता.
आमच्या वर्गात एकमेव मुलगी होती. ज्योती कारखिले. तिच्या सगळ्या मैत्रीण नापास झाल्याने तिच्या सोबत कोणीही पुढे आलेच नव्हते. तिची केसही अव्यासारखीच. चार विषय राहिल्याने पुनर्मुल्यांकनात एखादा विषय सुटण्याच्या अपेक्षेने कॉलेज करत होती. तिच्याशी बोलण्याचा कधी प्रसंग उदभवलाच नसल्याने तिच्याशी फारशी काही ओळख नव्हती. ही अशी मोजकी मंडळी माझ्या ओळखीची होती. सोबतच माझ्यासोबत डिप्लोमाला असणारी संदीप सोलट, हरि पांडुळे, अमोल भालसिंग आणि प्रशांत पाचपुते ही मंडळी ओळखीची होती. पण माझी पंकज, वैभवशी मैत्री झाल्याने त्यांच्याशी फारसा बोलण्याचा प्रसंगच आला नाही.
लेक्चर्स नियमित सुरू झाले होते. सुरवातीला काही उमजत नसले ती विषयांची नावे आता ओळखीची झाली होती. शिकवणारी सर्वच मंडळी चांगली असल्याने मनातील भिती तशी निघून गेली होती. पण तरीही इंजिनिअरींगता मॅथ (एम थ्री) हा सोडवायला खूप अवघड विषय असल्याची भीती तशीच घर करून असल्याने मी एम थ्रीचे आठवडाभरातली लेक्चर्सही कधी बुडवत नव्हतो आणि रविवारी होणारी जास्तीची लेक्चर्सलाही मी हजेरी लावायचो. डि. एन पाटील म्हणून सर एम थ्री शिकवायचे. आमच्याच वयाचे असल्याने ते आमच्यातलेच वाटत होते. सुरवातीला इंडिग्रशेशनचा काहीही प्रकार झेपला नाही. पण सरांच्या डेबा बाय डिएक्स चं फार हसू यायचं. अगदी मुलं लेक्चर कोणाचं म्हटलं तरी डेबा  म्हणायचे. एकप्रकारे पाटील सरांच वर्गातील मुलांनी डेबा या नवीन नावाचं बारसं घातलं होत. हा चिडवण्याचा प्रकार सोडला तर सरांच शिकवण एकदम चांगल होतं. सुरवातीला अवघड वाटणारा एम थ्री स्टॅटॅस्टीक्स सुरू केला की एकदम सोपा वाचायला लागला. मला काही प्रश्न अडले तरी पंकज, सागर, वैभव आणि रोहीत सोडवून देत होते.
आठवड्यातील तीन दिवस तर दिवसाची सुरवातच एचओडी सरांच्या लेक्चरने व्हायची. विनोद तोडकरी सर एप्लाईड थर्मोडायनामिक्स विषय शिकवत होते. पण सरांच्या लेक्टरला बसायचं म्हणजे एक भीती वाटून रहायची. बुधवार आला की आभाळ कोसळलं की काय असंच वाटत होतं. तसं सरांच शिकवण्याला तोड नव्हती. अगदी कितीही मठ्ठ मुलाला समजेल इतक्या सोप्या शब्दात आमचे एटीडीचे लेक्चर होत होते.  मुलांना बाकी काही कळलं नाही तरी थर्मोडायनामिक्सचे लॉ अगदी तोंडपाठ झाले होते.
तोडकरी सर अजून एक विषय शिकवत होते. प्रोग्रामिंग होती कशीची तरी. सुरवातीला नावच माहित नव्हतं पण नंतर नाव कळल्यावर आपल्याच क्षेत्राशी संबंधित असल्याने हायसं वाटलं. एमडीसिजी नेमकं काय हे माहिती नव्हतं पण त्यात डिप्लोमासारकंच अॅटोकॅडवर शीट वगैरे काहीतरी काढायचं आहे एवढीच आयडीया होती. सरांनी एकदा प्रोग्रामिंग मागचं लॉजिक समजावून सांगितलं तेव्हा जराजरा समजायला लागलं होतं. पण तरीही सगळंच नवीन असल्याने ९० टक्के तर झेपतच नव्हतं.
मॅन्युफक्चरींग प्रोसेसला दिनेश वाघोडे म्हणून लेक्चरर होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या लेक्चरचा स्ट्राईक परफॉर्मन्स बघून  मॅन्युफक्चरींग प्रोसेसमधे पास होण्याचं निम्म टेन्शन निघून गेलं होतं. अगदी की मी अभ्यास करायला चारच विषय गृहीत धरत होतो. वाघोडे सरांना शिकवताना कशाचंही भान रहात नव्हतं. अगदी घामाने शर्ट डबडबला तरी सर कधी थांबत नव्हते. कोणतीही प्रोसेस असो फळ्यावर मोठी आकृती काढून त्यावर स्पष्टीकरण देत शिकवणं म्हणजे आमच्याकरता आयता तोंडात घासच होता.
फ्लुड मेकॅनिक्स तसा मला कधीच आवडला नव्हताच. डिप्लोमालाही जेमतेम अभ्यास करून कसातरी पास झालो होतो. इंजिनिअरींगच्या एकूण विषयांपैकी एफ एम मला सगळ्यात अवघड असा विषय वाटत होता. अविनाश गाडेकर म्हणून सर एफ एम शिकवत होते. तेही वाघोडे सरांसारखेच त्वेशाने आणि भान हरपून शिकवत असायचे. पण एफ एम मधे काढीचाही रस नसल्याने समजण्याचा काहीही संबंधच नव्हता. फक्त हजेरी लावायला बसायचं एवढ्याच एकमात्र उद्देशानं मी लेक्चला बसत होतो. बर्नॉलिझ ला लेक्चरला किती शिव्या घातल्या असतील हे तोच जाणो. चारदा शिकवलं तरी काही माझ्या डोक्यात बसलं नाही. शेवटी प्रॅक्टीकल केल्यावरंच खरंच बर्नॉलिज थेरम लक्षात आलं. सरांच्या डोळ्यात एक लालबुंद थर साचायचा लेक्चर संपेपर्यंत. काहीं मुलांना वाटायचं की सर आज काही घेउनच आलेत. पण वास्तविक ते रात्री उशीरापर्यंत जागल्याचा परिणाम होतो. 
इंजिनिअरींगला एम पी नंतर जर कोणता विषय मला आवडत असेल तर तो होता मेटलर्जी. मला डिप्लोमालाही एम ई एम हा विषय आवडता होता. त्यातील बऱ्यापैकी भाग मेटलर्जी मधे असल्याने फारसं टेन्शन नव्हतं. खरं टेन्शन होतं ते म्हणजे लेक्चरंच. प्रसाद उंडे म्हणून सर मेटलर्जी शिकवत होते. सरांना इंडस्ट्रीअल एक्सपिरीअन्स असल्याने ते आपल्या नैसर्गीक भाषेत मेटलर्जी समजावून सांगत होते. पण मुलांच्या डोक्यात काहीही जात नव्हते. त्यामुळे तासभर लेक्चरला बसायचं म्हणजे जीवावर यायचं. अगदी इतकं कंटाळवाण की मुलांना कोणी महाराज येऊन किर्तनच सांगतोय असाच प्रकार वाटायचा. सर वर्गात आले की फळ्याकडे तोंड केलं रं केलं की काही महाभाग देवळात जाऊन घंटी वाजवल्याची नक्कल करायचे. कोणी मोबाईलवर बसायचं, कोणी गप्पा मारायचं तर कोणी कागदाचे बोळं करून पहिल्या बाकावर बसणाऱ्याच्या डोक्यात मारायचे हे उद्योग सर्रास चालत होते. एकंदरीत असं हे एकूण वातावरण काहीसं नरम नरमच चालू होतं.
त्यादिवशी आमचं एमडीसीजीचं पहिलं प्रॅक्टिकल होतं. सकाळचं ब्रेकनंतरचं लेक्चर संपवून पाटील सर गेल्यावर वर्गात गप्पांचा कल्लोळ सुरू होता. पाच दहा मिनिटांच्या ब्रेक नंतर एक नवीनच सर लेक्चर घेण्यासाठी आले होते. सावळा वर्ण आणि मध्य बांधा. तशी उंची जरा कमीच होती. त्यांना या अगोदर आम्ही फक्त स्टाफरूम मधे अधूनमधून पाहिले होतं. आमच्या प्रत्येक विषयाला शिक्षक असल्याने आज बहुतेक तोडकरी सर नाहीत म्हणून आले असावेत या भ्रमात आम्ही आपलं वर्गात निश्चिंत बसलो होतो. दोन तीन फेऱ्या मारून झाल्यावर त्यांनी शिकवायला सुरवात केली. वर्गात बहुतेक सगळ्यांना इंजिनिअरींग ग्राफिक्सची बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळे त्याच्यावर एकेकाला प्रश्न विचारायला सुरवात झाली. पण जवळपास वर्ष दीडवर्ष उलटल्याने कोणालाही काहीच आठवत नव्हतं. मग सगळ्यांना पॅरेलेलिझ्म, परपंडॅक्युरिझ्म अमुक तमुक वीस पंचवीस व्याख्यांची सरबत्तीच झाली. नंतर सरांनी मोर्चा वळवला अॅटोकॅड कडं. मुलांच्या अगोदरच्या ढीम्म प्रतिक्रियेमुळे सरांनी सरळ एक वाक्यच बोलून टाकलं.
"मान्य करून टाका की तुम्हाला सगळ्यांना अॅटोकॅड बद्दल काहीही माहिती नाही. नाहीतर मग मी विचारलेल्या प्रश्नांच उत्तर द्या."
त्यानंतरही सरांनी अनेक वाक्य उच्चारली. पण मी सरांचं ते एक वाक्य ऐकलं आणि माझ्यातला स्वाभिमान, मानापमानाचा किडा जागा झाला. मला ते वाक्य सहनच झालं नाही. मी अॅटोकॅडचा कोर्स वगैरे केला नसला तरी मला डिप्लोमाला बऱ्यापैकी माहिती झालेली होती. त्यामुळे मी लगेच हात वरती केला आणि म्हटलं,
"सरं मला तुमचं हे म्हणणं मान्य नाही. मी अॅटोकॅडचा कोर्स वगैरे केला नसला तरी मला डिप्लोमाला बऱ्यापैकी माहिती झालेले आहे."
सरांना हे अपेक्षित नव्हतं. माझ्या या अनपेक्षित भूमिकेमुळे सरांना सुरवातीला जरा गांगारून व्हायला झाले. पण लगेच सावरून त्यांनी मला प्रतिप्रश्न केला.
"बरं तुला अॅटोकॅडची माहिती आहे ना मग माझ्या प्रश्नचं उत्तर दे. जर मला एका आकृतीला ४५ अंशात हॅचिंग द्यायची असेल तर कशी देशील...?"
मला हॅचिंगची तशी चांगली माहिती असल्याने मी क्षणात लेच उत्तर देऊन टाकलं.
"संर अॅटोकॅडच्या विंडोमधे डाव्या बाजूला एक जाळीसारखं चिन्ह असतं त्यावर क्लिक केलं की आपल्याला हॅचिंग देता येते. त्यातच आपल्याला कोणत्या अंशात आणि कोणत्या प्रकारची हॅचिंग देता येते."
"अरे पण हे ढोबळ उत्तर झाले. म्हणून तर मी म्हणत होतो की, मान्य करून टाका की तुम्हाला सगळ्यांना अॅटोकॅड बद्दल काहीही माहिती नाही. "
"पण सरं मला अॅटोकॅड बद्दल काही माहिती आहे. "
"हो पण मग तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही."
"पण मी जे सांगितलं ते बरोबर आहे सर. वाटलस तर मी तुम्हाला अॅटोकॅडवर करून दाखवतो. "
"बरंबर, बस खाली."
मला सरांच हे वाक्य खटकलं होतं. तसंच सरांनाही माझं हे अनपेक्षित उत्तर फारसं आवडलं नव्हतं. आमच्यातल्या शीतयुद्धाला सुरवात व्हायला एवढंस कारण पुरेसं होतं. माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. काहीही करून सरांना सिद्ध करून दाखवायचं की मला अॅटोकॅड मधील माहिती आहे. त्यादिवशी प्रॅक्टीकल झालंच नाही. प्रश्नोत्तरांच्या खेळातच तासभराचा वेळ निघून गेला. फक्त एक नवीन माहिती झाली होती. की आम्हाला शंतनू काळे नावाचे एक शिक्षक आहेत आणि यांना सिद्ध करून दाखवायचे आहे की आपल्याला अॅटोकॅड मधील माहिती आहे.
आमची प्रोग्रामिंग अजून फारशी सुरू झाली नव्हती. तोडकरी सरांनी सध्याला सोप्या गोष्टी शिकवायला सुरवात केली होती. सरांचा मुख्य भर मुलांच्या समजण्यावर असल्याने आम्हाला समण्याविषयी चिंता नव्हती. सरांचं लेक्चर संपल्यावर नंतर कोणतीही लेक्चर्स नसल्याने कॉलेज जरा लवकरच संपलं होतं. बाहेर प्रचंड पाऊस चालू असल्याने घरी जाण्याचीही सोय नव्हती. आम्ही सगळी मुलं लेक्चर संपल्यावर कॉलेजच्या एन्ट्रान्स जवळच्या पायऱ्यावर मोर्चा टाकून पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो होतो.






गणेश दादा शितोळे
( मार्च २०१७)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा