माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २० मार्च, २०१७

बलिदान दिवस...!
आज फाल्गुन आमवस्या
सह्याद्रीचा छावा...
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
रूद्रशंभू शिवपुत्र
स्वराज्याचे दुसरे छत्रपती
युवराज संभाजी राजे यांचा बलिदान दिवस...
शिवछत्रपती नंतर महाराजांच्या स्वराज्याची तेजस्वी मशाल शेवटच्या श्वासापर्यंत जपणारा आणि आयुष्यात कधीही पराभवाचं तोंड न पहाणारा हा छावा आपल्याच काही माणसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने धारातीर्थी पडला...
अशा शिवपुत्र शंभुराजास या मावळ्याचा मानाचा मुजरा....
पाठीवर वार केला म्हणूनी माझा राजा आजच्या दिनी धारातीर्थी पडला....

बलिदान दिवस...!

दिवस ऐसा उगवला
अन राजांचा मुक्काम संगमेश्वरी पडला...
मित्र म्हणावा की अजून काही होता कलुषा साथीला
अन संताजी धनाजी दिमतीला...

आपल्यांनीच होता पाठीत खंजीर खुपसला....
औरंग्याला राजं संगमेश्वरी थांबल्याचा निरोप धाडीला....
मुकर्रब खान राजांना पकडण्याचा पण करूनी निघाला...
सोबत गणोजी होता मार्ग दाखवायला...

राजांनी होतं पाठवलं संताजी धनाजीला
राजधानीचं रायगडाचं संरक्षण करायला...
सोबत ठेवले होते फक्त मुठभर मावळे..
अन सरलष्कर म्हालोजी घोरपडेंला...

अचानक समोरूनी धुळीचा लोट उठला...
मुकर्रब खान संगमेश्वरी येऊनी धडकला...
लाखभर फौजेशी झुंजाया तरणाबांड सह्याद्रीचा छावा
अन ऐंशीच्या उंबरठ्यावरचा म्हातारा उभा ठाकला...

सपसप करत एकेक मुघल कापला जाऊ लागला...
राजांनी मांडवी नदीचा धावा दिला..
अचानक कैसा कलुषा घोड्यावरूनी कोसळला,
अन स्वराज्याचा छत्रपती थांबला...

मृत्यू दिसतानाही मैत्री निभावत राहिला...
लढता लढता म्हाळोजी बाबा वीरमरण पावला...
जाता जाता राजाला,
शंभर मुघलांच्या रक्ताचा अभिषेक घालून गेला...
शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढला..
मराठ्यांचा सरलष्कर रणांगणात धारातीर्थी पडला...

मुकर्रब खानानं जाळ्याचा दोर ओढला...
अन मराठ्यांचा राजा कैद झाला...
सोबत कलुषा ही पकडला गेला...
आयुष्यात राजांच्या नजरेला नजर न देणारा
गणोजी मनमुराद हसला...

मजलदरमजल करत बहादूरगडाचा प्रवास सुरू झाला...
मराठ्यांचा राजा कैद झाल्याचं कोणालाच नाही कळला...
दीडशे कोसांचा प्रवास करत,
मुकर्रब बहादूर गडासी पोहचला...

साथीने गणोजीच्या कैद राजा दरबारी पेश केला...
भीमेच्या किनारी विदूषकी झबल्याचा खेळ सुरू झाला...
मराठ्यांचा राजा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला...
राजांचा स्वाभिमान तरी ना भंग पावला...

पाहूनी अपमान भीमा सरस्वती च्या डोळ्याला पाझर फुटला...
अत्याचाराचा खेळ रोजचा नियमित झाला...
रोज औरंग्या एकच प्रश्न विचारी राजाला...
कोण गद्दार होता आमच्यातला तुमच्या साथीला. ..

राजांच्या उत्तराने संताप येई औरंग्याला...
उंचपुर्‍या धडाऐवजी औरंग्या,
तळवाभर जिव्हेला घाबरला...
रोखूनी बघाणार्‍या डोळ्यांचा धसका घेतला...

अचानक राजा एकदिनी स्तंभाला बांधला...
तप्त सळ्यांनी डोळ्यांचा खोबण्या केला...
पुन्हा पुन्हा जिव्हेला बाहेर ओढण्या झाला...
वाचेला त्या राजाच्या ना कैद करू शकला...
चिमटीत स्वराज्याचा श्वास दाबून धरला...
स्वराज्याचा बुलंद आवाज बंद झाला...

सुरू झाला प्रवास वढू तुळापूरला...
टाकत होता औरंग्या प्रत्येक पाऊल
जणू स्वराज्याचा प्राण घेण्याच्या निश्चयाला
स्वराज्य घेऊ कवेत ठार करूनी सह्याद्रीच्या छाव्याला
दिन ऐसा कोणता तो निवडला...

पडला धारातीर्थी राजा फाल्गुन आमवस्येला
शिरापासूनी केलं वेगळं तेजस्वी धडाला...
भाल्याच्या टोकाशी लटकवलं शिराला...
मरणानंतरही सीमा नव्हती अत्याचाराला...

फेकून भीमेच्या डोहात देह परी
एवढा अपमान माझ्या राजाच्या पदरी का आला...
मराठी नववर्षांच्या पूर्वसंधेला..
अवघा स्वराज्य छत्रपती विना झाला...

मृत्यू ला समोर पाहूनी भी मैत्री निभावत गेला...
परी मित्रांनं आघात केला की
नात्यानं दगा दिला...
पाठीवर वार केला म्हणूनीच
माझा राजा आजच्या दिनी धारातीर्थी पडला....




गणेश दादा शितोळे
(२० मार्च २०१५)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा