माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ८ मे, २०१६

गेल्या वर्षी याच दिवसांत कॉलेजच्या मित्रांसह बहुचर्चित केरळ ट्रीपला गेलो होतो. खरंतर हा अनुभव म्हणजे माझ्या कवी कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. निसर्गाच्या सानिध्यात अन भरपूर मोकळ्या वेळात मला माझ्या या छंदाकरता भरपूर वेळ मिळाला. बरंचसं काही सुचलं. मग काही मित्रांच्या मैत्री वरच्या कविता असो कि प्रेम कविता असो. उरलं सुरलं मित्रांवर काव्यटीका हे प्रकार पण झाले. एकंदरीत कंटाळवाण्या प्रवासात केरळमधील निसर्गाची किमया पहाताना मन भरून आलं. आज कॉलेज संपल्यावरही ते सगळं जूनं जसंच्या तसं आठवतंय. जणू कालंच घडल्यासारख्याच वाटतंय. याच अविस्मरणीय केरळ ट्रीपचे काही अनुभव कवितेतून सादर करत आहे. 


मी बघितलेलं अविस्मरणीय केरळ...

नुकतंच वर्ष उलटून गेलं तरी,
आठवत रहातं बघितलेलं अविस्मरणीय केरळ....
मित्रांसोबत केलेली धमाल मस्ती,
अन घालवलेला एकत्रित वेळ....

आठवतेय रंगलेली मराठी चित्रपटांची अंताक्षरी,
अन सरांसोबत खेळलेलो काही खेळ....
पण लक्षात राहिला ट्रेनमधे चाललेला,
ट्रुथ आणि डेअरचाच खेळ...

आठवतेय पोहचल्यावर उडलेली धांदल,
तरीही जुळवून घेत सगळा मेळ...
आठवत रहाते पज्ञनाभची महती,
अन प्रवासात निघून गेलेला वेळ....

आठवतो डोळे दीपवणारा विवेकानंदाचा पुतळा,
भलताच पाहिलेला रामाचा नसणारा सेतू...
बोटीत घुमलेला शिवछत्रपतींचा नाद,
अन कन्याकुमारीची मावळतीच्या सूर्याची वेळ...

आठवतो तो वळणावळणाचा कंटाळवाणा प्रवास,
अन सोबत पाहिलेला निसर्गाचा वेगळा अविष्कार....
कुडकुडत घेतलेली मुनारच्या सौंदर्याची भेट,
तरीही हुकलेली धबधब्याची मनसोक्त अंघोळ...


आठवतेय पेरीयार लेकची सफर,
अन वन्यप्राण्यांच्या दर्शनाकरता आसूसलेले डोळे...
अवचित पाहिलेले विविध रंगाचे पक्षी
अन माकडासोबत फोटो टिपण्यातच गेलेला वेळ...

आठवतोय तो लांबूनच पाहिलेला इको पाॅईंट,
अन उगाचंच दिलेले भलतेच आवाज....
सोबत केलेली चहाची खरेदी,
अन शहाळं पित घातलेला वेळ....

आठवतंय अननस खात केलेलं फोटोशुट,
अन निसर्गाचं पाण्यात टिपलेलं प्रतिबिंब..
डोंगराच्या कुशीतलं वसलेलं वेगळंच धरणं,
अन पायर्‍यांसोबत दिसणारा त्याचा तळ....

आठवतोय हाऊसबोटींगचा काळ्या पाण्यातला प्रवास,
एकाच सोफासेटवरचे भलतेच फोटोशुट... 
सूर्यास्तासोबत लक्षात राहिला फक्त
हाऊसबोटींगचा झालेला बट्ट्याबोळ...

आठवतोय तो कोच्चीनचा समुद्र,
अन सर्वांनी घेतलेला  फेसाळणार्‍या लाटांसोबतचा आनंद...
पण मी मात्र होतो एकटाच समुद्राकडं पहात,
जणू अथांग सागराला न्याहाळत चालला होता वेळ...

लक्षात राहिलं गरमागरम माशांची घेतलेली चव,
अन खाल्लेली स्पेशल केरला मिल्सची डिश....
आम्ही फक्त सात अन हम साथ साथ म्हणत...
बघितलेलं अविस्मरणीय अनुभव देणारं केरळ...

गणेशदादा शितोळे
(०८ मे २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा