माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ मार्च, २०१५



इंजिनिअरींगचा निरोप समारंभ

(डावीकडून आण्णा वाबळे, तिसरे श्रीकांत महाडीक सर, रोडे सर, सागर सर, लडकत सर, भगत सर,  जगताप सर, तोडकरी सर, घोडके सर, उंडे सर, खामकर सर, घोलप सर,
देशपांडे सर, घाडगे सर, हिरडे, जानकर ) 
(काळे सर, बाचकर सर राहूनच गेले...),
(स्पेशल २६ :-  सुहास जगताप, वैभव कोकाटे, निलेश कदम, श्रीराम पवळे, महेंद्र जाधव, प्रमोद मुरकुटे,
प्रशांत पाचपुते, संजय शेळके, प्रदीप रोकडे, सुनिल काळे, इजाज अत्तार, जयदीप नलावडे,
सागर गाडे, ज्ञानेश्वर आमले, अमोल भालसिंग, स्वप्निल साळुंखे, संभाजी चेमटे, रोहीत साठे,
 ज्ञानदेव तांबे, पुरुषोत्तम सिंग, आभाश शुक्ला आणि मंगेश मोरे.)
(पंकज चिखले यांनी कुठं टांग मारली होती)



(या स्पेशल २६ मधे आमची जागा कधीच नव्हती....)

(स्पेशल २६ - मंगेश मोरे, रोहीत साठे, प्रशांत पाचपुते)

(स्पेशल २६ - स्वप्निल साळुंखे, संजय शेळके, निलेश शितोळे)

(स्पेशल २६ - स्वप्निल साळुंखे, रोहीत साठे)

(स्पेशल २६ :- डावीकडून  महेंद्र जाधव, संभाजी चेमटे, निलेश कदम, आभाश शुक्ला,
पुरूषोत्तम सिंग, जयदीप नलावडे, स्वप्निल साळुंखे)

(स्पेशल २६ :- डावीकडून संजय शेळके, आभाश शुक्ला, निलेश कदम, 
सुहास जगताप, निलेश शितोळे, इजाज अत्तार)

(स्पेशल २६ :- डावीकडून महेंद्र जाधव, ज्ञानदेव तांबे, रोहीत साठे, जयदीप नलावडे)

(स्पेशल २६ :- डावीकडूनआभाश शुक्ला, महेंद्र जाधव, ज्ञानदेव तांबे, प्रशांत पाचपुते, रोहीत साठे)

(स्पेशल २६ :- डावीकडून कृष्णा साठे, विकास डोंगरे, संभाजी चेमटे, निलेश शिवरकर,
ज्ञानेश्वर आमले, ज्ञानेदेव तांबे, श्रीकांत नागवडे, जयदीप नलावडे, राहीत साठे, प्रदीप रोकडे)

(श्री विकीदादा पाचपुतेंसह स्पेशल २६)

(कॉलेज संपलं आणि अशीच परतीची पावले टाकून निघून गेली पाखरे उंच झेप घेण्याकरता....)

(सांजवेळी निरोप घेतलेलं हेच कॉलेजचं प्रवेशद्वार)



(कॉलेज सारखाच त्या दिवशी सूर्यानेही आमचा निरोप घेतला...)

(येऊ परत इथे कधी.....?)






                       नुकताच इंजिनिअरींगचा निरोप समारंभ (सेण्डाॅफ) झाला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या "स्पेशल 26" च्या सेण्डॉफ ला बरच काही बोलायचं होतं. पण आमच्याच काही मित्रांना कदाचित मी बोलू नये असं वाटत असल्यानं ते तसंच राहून गेले. आमच्याच मित्रांच्या दुनियादारीनं ते राहिलं अन राहूनच गेलं. खरंतर खूप राग आला होता. म्हटलं आपल्या निरोप समारंभात बोलावं पण तिथं अगोदर ढीगभर गोल लक्ष टारगेट वरच्या लेक्चर्स नं बोअर झालेला अन "सिक्वेन्स हुकलेल्या" कार्यक्रमात वेळे अभावी राहूनच गेलं.  शेवटी काय तर माझ्या नशिबात ते नव्हतेच...
वाटलं यंदा तरी काही बोलावं पण अधीच दिवसभरातल्या कार्यक्रमानं उशीर झाला अन पुन्हा एकदा बोलायचे शब्द ओठांवरच राहिले. म्हणून जाता जाता राहून गेलेलं उधारीचे दोन शब्द. ....

             "आज माझा आणि माझ्या जीवलग मित्रांचा सेण्डॉफ. खरचं कशी गेली ही वर्षे हे फक्त त्यांना आणि मलाच माहिती. सेण्डॉफ झाला की आता परीक्षांची धास्ती बसणार आहे. कदाचित पेपरवर परीक्षा द्यायची त्यांची ही शेवटची वेळ असेल. पण केवळ पदवी घेऊन अनुभव संपन्न होता येत नाही, त्यासाठी अभ्यासाबाहेरचं कॉलेज कॅम्पसच लागते.
             एक 'खच्याक' असा आवाज आणि कॉलेज कॅम्पसमधले हे मित्र माझ्या मनातील कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेत. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार येतो की, मागच्या दोन वर्षाँपूर्वी इथं माझ्या जीवलग मित्रांचा सेण्डॉफ होता पण आज आपल्याला निरोप द्यायला आपले जीवलग मित्र येणार नाहीत. 
         सेण्डॉफ का द्यायचा आणि सेण्डॉफ म्हणजे काय? हे माझ्या जीवलग मित्रांसोबतचे एकत्रीत कॉलेजमधले शेवटचेच वर्ष ना. आता आपलेचं 'कॉलेज लाइफ संपलं' आहेच असे वाटते. कससंच होतं या वाक्याने. कारण कॉलेज लाइफ संपणं म्हणजे काय हे आम्ही कॉलेजवर आणि तिथे एकत्रीत जगलेल्या प्रत्येक क्षणावर भरपूर प्रेम केल्याने कॉलेज लाइफ संपणं काय असेल कळून चुकले आहे. 
           पुढल्याच महिन्यात परीक्षा सुरू होतील आणि मग कॉलेज लाईफ नावाचं चॅप्टर आठवणींच्या खोलीत बंद होईल, निर्णयांच्या जबाबदारीचं भान ठेवूनच स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी एका नव्या स्पधेर्चा डाव खेळायला लागणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे स्वत: कमावलेल्या पैशांवर फक्त आपलाच हक्क असणार आहे. आम्ही वयाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर असताना या कॉलेज लाइफमधल्या तीन वर्षांचा आमचे करिअर घडवण्याचा दृष्टीने महत्त्वाचा वाटा आहे. फक्त पदवीच मिळवायची असती तर ती युनिव्हसिर्टीमधून परीक्षा देऊनही मिळवता येत होती, पण अनुभवसंपन्न होण्यासाठी आणि भविष्याच्या प्रवासासाठी तयारी म्हणून हे दिवस खूप काही शिकवून गेले. माणसं आणि घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, मैत्री-प्रेमातला फरक, काही बाबतीत घ्यावा लागणारा तटस्थपणा अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. या गोष्टी शिकण्यासाठी, अनुभवण्यासाठी कॉलेजलाइफच लागते. 
              डिप्लोमातून या कॉलेजमध्ये आल्यावर कॉलेजने काय दिलं, या प्रश्नाचा विचार केला तर मोठ्ठी यादीच होईल. सगळ्यात पहिलं आठवते ते मित्रांचे प्रेम, त्यांच्यासोबत घालवलेला सुंदर वेळ, तासन्तास गप्पांत रंगणं, गॅदरींगमधली धावपळ आणि त्या धावपळीत एकत्र घालवलेला वेळ, कॅण्टीनमधला केकचा राडा आणि बर्थडे बम्सची धमाल. कॉलेज सुटले तरी कॅम्पसमध्येच रेंगाळायचो. ती मस्तीभरी लाईफ अप्रतिमच होती. कदाचित मित्रांच्या नात्याची चव त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळलेली असावी म्हणूनच कॉलेजमधला प्रत्येक दिवस इतका महत्वाची वाटत असावा. 
                कॉलेजमधली मैत्री पुढे टिकत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण माझ्या मते, अशी अपेक्षाच का बाळगावी? टिकली तर उत्तमच पण नाही टिकली तर नात्यांच्या विविध रूपांपैकी असंही एक रूप हा अनुभव नाही का मिळत आणि अशा अनुभवांचा स्टॉकच पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतो. आता आमच्याबाबतीत म्हणायचं झाले तर आजपर्यंत किती ग्रुप झाले आमचं आम्हालाच माहिती नाही. तरी पण “डी कंपणी, अचानक भयानक, पिजे ग्रुप, जीएस ग्रूप” अशी कितीतरी नावं झाली. पण लक्षात राहाणारा तो “जिएस ग्रुपच” होता आणि भविष्यातही तो असेल. ग्रुपमधील आम्ही सगळे अभ्यासू होतो असे नव्हते मात्र ती कोणती गोष्ट होती जी आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवायची ते आजही न उमगलेले कोडे आहे. शिक्षकांची खेचण्यातही पुढं होतो हे सांगताना काही विशेष वाटत नाही. 
                   डिप्लोमानंतर वेगवेगळे मार्ग शोधून लांब झाल्याने त्या सख्यांची साथ आता राहिली नाही. याचं आम्हाला दु:ख वाटतं नाही, कारण या मित्रांच्या सहवासात घालवलेल्या त्या क्षणानं आम्हाला नात्याचे अनेक कंगोरे उघडून दाखवलेत. खरं तर तेव्हाच सेण्डऑफला सुरुवात झाली होती. 
                     कॉलेजमधल्या मैत्रीचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला. एकमेकांची काळजी घेणं, दुसऱ्यांचा विचार करणं, भावनिक आधार देणं, मैत्रीसाठी 'कुछ भी' ही वृत्ती त्यांच्यामुळे विकसित झाली असावी. तोडकरी सरांकडूनच शिक्षक-विद्यार्थी या नात्यामधलं गहिरेपण आम्ही कॉलेजमध्येच अनुभवले. प्रत्येक वर्षी आमचे शिक्षकांशी बंध जुळत गेले आणि तेही चढत्या क्रमाने. कारण नवीन आल्यानंतर असणारे शिक्षक आता केवळ शिक्षक न राहता मार्गदर्शक, मित्र  , टीकाकार, हितचिंतक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्हाला भेटले. त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीतून मी तावून सलाखून बाहेर पडलो. त्याच्याच जोरावर आयुष्यातलं प्रत्येक चॅलेंज आम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. 
                    असे शिक्षक कॉलेजनंतर लाभणार नाहीत, यापुढे असतील ते फक्त बॉस. कॉलेजमध्ये गुणांचं कौतुक झाले. चुका सुधारण्याचे प्रयत्नही झाले. पण यापुढे कदाचित लोक बोट ठेवतील ते फक्त चुकांवर, दाखवतील ते फक्त दोषच. मानसिक, शारीरिक, कौटुंबिक असे पर्सनल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्हाला याच शिक्षकांनी आणि मित्रांनी मदत केली, आधार दिला. प्रोफेशनल लाइफमध्ये आधार देणं नसेलच पण पर्सनल प्रॉब्लेम्सही विचारत घेतले जाणार नाहीत, तिथे महत्त्व असेल ते फक्त कामाला, आपल्या परफॉर्मन्सला. सहकाऱ्यांबरोबर प्रोफेशनली अटॅचमेण्ट असेल, भावनिकदृष्ट्या मात्र फार दूर असू... 'तू हे करू शकतोस' असं म्हणणाऱ्या शिक्षकांऐवजी 'करून दे' म्हणणारे बॉस, कॉम्पिटिटर्स असतील... बापरे! कॉलेजबाहेरचं विश्व किती भयानक आहे याची आता जाणीव होऊ लागली आहे. 
                खरंच, कॉलेज किती सुरक्षेची भावना देते, हे आता प्रकर्षाने जाणवते आहे. थोड्याच दिवसात परीक्षा सुरू होतील. पेपरवर लिहिण्याची कदाचित ही शेवटची परीक्षा असेल. यानंतरच्या परीक्षा मात्र 'जगाव्या' लागतील. पण त्याआधी एकीकडे परीक्षेचा ताण, दुसरीकडे करिअरची स्वप्नं आणि सोबतच कॉलेजला 'अलविदा' म्हणताना दाटून येणारा कंठ अशी त्रिशंकू अवस्था म्हणजे एकप्रकारची परीक्षाच म्हणावी लागेल. 
               खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?  जगायला खरोखरीच्या जगण्याला अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.  आयुष्यामध्ये बरेच अडथळे येत असतात. नवीन जुने मित्रमैत्रीणी सतत भेटतात. काहींना दिलेली आश्‍वासनं पाळायची असतात, मित्रमैत्रीणींलाही वेळ द्यायचा असतो, त्यांचेही ऋण फेडायचं असतं. आणि अगदी शेवटी कळतं, की त्यांच्याबरोबर जे आयुष्य जगतोय म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.  आनंद हाच एक महामार्ग आहे. म्हणून आयुष्यामध्ये भेटलेल्या प्रत्येक मित्रमैत्रीणींसह आनंदाकडे जाणारा क्षण साजरा करा. 
              माणूस आयुष्यात जिंकला की त्याला झळाळी येते आणि हरला की शहाणपण येतं. मला झळाळी नकोच होती पण मला एवढं शहाणंसुद्धा व्हायचं नव्हतं...मला फक्त जगायचं होतं. मैत्रीचे ते दोन श्वास सुद्धा कधी सुखाने घ्यायला जमले नाहीत. राग येत नाही पण...बस्स कधी कधी वाईट वाटतं.असं म्हणतात तुमच्या डोळ्यात दोन आश्रू आले तर तो टिपायला किती मित्रमैत्रीणींच्या ओंजळी पुढे येतात यावर ठरते माणसाची श्रीमंती. 
                           आपण सारे असेच श्रीमंत होऊ.... 
                  हे सगळे विचार फक्त आमच्याच डोक्यात घुमत नाहीयेत. प्रत्येक कॉलेज सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असणारच. आज आमच्या मित्रांचा सेण्डॉफ झाला. आता हे सगळे जण येणाऱ्या आयुष्याकडे उत्सुकतेने, आशेने अन् काहीशा भीतीने पाहत असतील. प्रत्येकाला संवेदना, भावना, आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रेम याचं कम्प्लिट पॅकेज कॉलेजने त्यांना आणि आम्हालाही दिलेले आहे. पुढच्या स्पधेर्च्या युगात ही शिदोरी कामी येणारच... कॉलेजच्या या आठवणी कायमचं ताज्या राहणार आहेत, कधी हेक्टिक शेड्यूल्डमधून मोकळा श्वास घेण्यासाठी आठवणींच्या या फ्लॅशबॅकमध्ये जाताना मन सुखावणार हे निश्चित. 

                      जाता जाता कॉलेजमधली शेवटच्या दोन जून्याच पण नवीन वाटणार्‍या कविता...


हिशोब आयुष्याचा....


बसलो होतो एकदा आयुष्याचा हिशोब करायला
सुखदुःखाचा ताळमेळ लागतोय का बघायला...
सुरवात केली मी आयष्याचं पान पलटायला...
आयुष्यातल्या वळणावर बाकी काय राहिलं बघायला....

करत होतो फक्त सुखाची बेरीज
अन दुखःची वजाबाकी...
सुंदर क्षणांचा करून करून गुणाकार भागाकार
वाटत होतं आयुष्यात येईल शुन्य बाकी...

आठवले काही मग मित्र अन
जोपसलेले त्यांच्यासोबतचे छंद...
आठवून जूनं सगळं नव्यानं
मिळाला फक्त निखळ आनंद...
जून्या आठवणीत रमत हिशोब झाला मंद...

हिशोब करता करता वाटलं
आयुष्याच्या पहिल्या वळणावर केलं सर्व काही...
क्षणांची आकडेमोड करता करता लक्षात आलं...
आपण थोडसं जगलो राहून गेलं बरंच काही...










कॉलेजमधे एकेक क्षण जगता जगता...

कॉलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही...


कॉलेज लाईफ जगता जगता भेटत गेली बरीच माणसं
कोणी वाटलं हक्काचं तर कोणी परकं कधी वाटलंच नाही...
जूळून आल्या नात्यांच्या अशा गुंफलेल्या रेशीमगाठी...
रक्ताच्या नाहीत असं कधी वाटलंच नाही...

जगलो दुनियादारी सोबत काही क्षण अविस्मरणीय....
आयुष्यात कधी असं जगेल वाटलंच नाही....
साथ सोबत क्लासमेट्सची लाभली न्यारी...
मित्रांसोबतचा असाही कॅम्पसकट्टा कधी मिळेल वाटलं नाही...

गॅदरींगच्या राजकारणाचा डाव शिकलो
पण कधी मैत्रीत राजकारण करावसं वाटलं नाही...
मित्र जोडत गेलो कायम चढत्या क्रमाने....
पण मैत्रीत कोणाला दगा द्यावा कधी वाटलं नाही...

पैशानं समाजात श्रीमंत होता येतं म्हणून...
आयुष्यात पैसा कमवण्याच्या मागे धावलो नाही...
आयुष्यात फक्त हक्काची माणसं कमावत गेलो...
म्हणून मैत्रीत गरीब असल्याचं कधी वाटलं नाही....

मित्रांसोबत दिल दोस्ती दुनियादारी करत
कॉलेज कॅम्पस कट्ट्यावर आयुष्य जगलो बरंचकाही...
कॉलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
कॉलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही........!!!




(श्रीकांत नागवडे, रोहीत ननावरे, महेश वारे, महेश बांडे, विकास डोंगरे, प्रेवीण गाडे आपण नक्कीच काहीतरी पाप केलं असावं यात आपल्याला जागा मिळाली नाही. असो मैत्रीच्या ओंजळीत जागा आहे ना. बस्स तेच आपल्याला समाधान. )

 गणेशदादा शितोळे
(२४ मार्च २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा