माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २१ मार्च, २०१५

काल खुप दिवसांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपट मनापासून बघितला अन आठवले संपत चाललेले काॅलेजचे आयुष्य अन तूटत गेलेले "क्लासमेट्स"...



विश्वासाला तडा गेला की
नात्यात काहीही राहात नाही...


विश्वासाला तडा गेला की
नात्यात काहीही राहात नाही...
सगळीकडे अंधार वाटतो
प्रकाशाचा कवडसाही कुठून डोकावत नाही...

आठवणींच्या रमण्यात
डोळ्यातली आसवे विरून जातात...
ओल्या जखमांची सल मात्र
काहीही करून सुकून जात नाही...

दुःख तेवढी सावलीसारखी सोबत असतात...
सुखांची झुळूक क्षणभरही येत नाही...
समजवायला भोवताली असतात अनेक आपली वाटणारी माणसं...
मात्र समजून घ्यायला कोणी धजावतच नाही...

वाटलं मग देव तरी आपल्याला समजून घेईल...
कारण भावना नाहीत आपल्या इतक्याही वाईट...
पण अचानक मन देव संकल्पनेला माननं सोडून देतं...
अन वेडं मन एकटंच कुढल्याशिवाय राहत नाही....

वाटलं जरी देव नावाची व्यक्ती आपली असेल...
तरी न दिसणार्‍या देवाला प्रार्थना करून...
मन मात्र विटून जात असतं
कारण आपलं मन आपल्याला सोडून कोणालाच कळत नाही....

विसरून जावे वाटते सगळे गेलेलं आयुष्य...
पण आठवण आल्याशिवाय मनाला राहवत नाही...
माझीच माणसं आहेत ती सगळी...
मी त्यांचा अन ती माझी हक्काची माणसं....

नाती तुटून जातात
बंधाची गोफ उसवत गेली की...
नाती तुटली तरी ती माणसं आपली आहेत...
मनाला याशिवाय काही सुचतच नाही....


गणेश दादा शितोळे
(२१ मार्च २०१५)
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा