माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, १७ मार्च, २०१५

दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

भावनांच्या ओंजळीतूनी स्वप्न मज पडले...
आठवणींच्या पदराला अलगद उलगडू ते लागले...
कुठल्याशा कोपर्‍यात होत एक वाक्य लिहिलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

आयुष्याच्या वाटवरूनी आयुष्यच झाले होते भटकलेले...
वाट चुकली की वाटाड्या उत्तर ना उमजलेले...
भेटेल कोणी सहप्रवासी याच आशेवर चालते झालेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

उद्याच्या मृगजळावर आयुष्य होत क्षणभर मंतरलेले....
क्षितिजाच्या आशेवर होते जरा विसावलेले...
वाट पाहूनी जीव शिनावा ना कधी मनी आलेले....
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

वाट पहाता पहाता वेळचे गणितच चूकू लागलेले...
नवी नाती गुंफण्यात जुने हच्चे विसरलेले..
कितीही वेळा वजा केले तरी थोडे बाकी होते राहिलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

उद्याच्या आनंदासाठी आजचे आनंदी क्षण निघून होते चाललेले...
सोबत आयुष्याची वाट चालावी स्वप्न होते पाहिलेले...
होईल पूर्ण कधीतरी याच आशेवर टिकलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

गणेश दादा शितोळे 
(१७ मार्च २०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा