माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, ७ मार्च, २०१५

ट्रेनच्या प्रवासादरम्यान रंगलेल्या " ट्रुथ अॅण्ड डेअर " खेळताना विचारलेला " आयुष्यात कधी काही मिस केलं असं वाटतं का ? "
या प्रश्नाचं त्यावेळी मी उत्तर तर दिलं पण तो प्रश्न तसाच मनात राहिला अन सुचली नवी कोरी एक कविता....

अजूनतरी कधी वाटलं नाही, 
आपण आयुष्यात काही मिस केलं...

मी लहानपणापासूनच असा
कसाही राहणारा अन तब्बेतीनी वाढलेला बराचसा...
कित्येक जणांनी बरचसं सांगितलं..
मात्र नाही कधी मला बदलता आलं...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं...

वर्ष गेली दिवसांचं पान पलटत राहिलं...
जूनंच आयुष्य नवीन असल्यासारखं फक्त वाटत राहिलं...
वय वाढत गेलं पण मला नाही बदलता आलं..
फक्त जिन्स टी शर्ट्स रूप फाॅर्मलनं घेतलं...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं...

आपल्या दिसण्यावरून अन असण्यावरून
म्हणे स्टेटस कळतं असं लोकांना वाटत असेल...
पण यातून फक्त लोकांना पैशाची श्रीमंती दिसत असेल...
मला पाहून लोकांना कदाचित मी गरीब वाटत असेल...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं असेल...

बघाणारांना पैशाची श्रीमंती दिसत असेल....
म्हणून मला कित्येकदा बिलो स्टेटस समजलं असेल...
मी फक्त आयुष्यात माणसं कमावत गेलो..
मात्र बघाणारांना मला मैत्रीने खुप श्रीमंत केलेलं दिसलं नसेल...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं असेल...



गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा