माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २६ मार्च, २०१५

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आहे...
माझ्या सारख्याच प्रत्येक भारतीयाची भारत जिंकावा म्हणून शुभेच्छा असतील ही अपेक्षा आहे....
भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि तमाम भारतीय क्रिकेट संघाला या उपांत्य सामन्याकरता शुभेच्छा देणारी ही एक शुभेच्छात्मक कविता.....



बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...


तुने तो जगाया है जज्बा जितनेका...
अब फिक्र ना कर सेमी फायनल का...
देगा साथ हर खिलाडी है तुझे लढाई जितनी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

है साथ तेरे गब्बर भी देने को रोहित का साथ...
फिक्र ना कर ना बिगडेगी कोई बात....
उठेगा बल्ला जायेगी गेंद बाॅण्ड्री के पार...
देंगे ऐसी ओपनिंग देंगे सब के छक्के छुडानी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

खेलेगा कोहली ऐसी विराट इनिंग...
बतायेगा अजिंक्य अपने नाम का सही मिनिंग...
देगा साथ रैना भी खेलकर पारी मॅचविनिंग...
होगी बरसात रनो की ओर मैदान पाणी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

उडायेगा गिल्लीया फिंच वाॅर्नर की...
पाॅवर प्लेमेही ओपनर की वापसी कराना...
खासियत है अपने गेंदबाजो की...
लहरायगा शामी गेंद ऐसी...
देगा स्मिथ कॅच मुंह मे प्रसाद जैसी..
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

फेकेंगा यादव अपना नागपुरी स्पेल...
उडेगा दंडा हो जायेंगे आऊट वाटसन मॅक्सवेल....
क्लार्क का भी डिफेन्स हो जायेगा फेल...
लेगा तू आश्विन के गेंदपर हॅडीन का झेल...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

करेगा अपने गेंदबाजीसे शर्मा भी मोहित...
निकालेगा सर जडेजा भी किसी का तो विकेट...
होगी बीच मे अगर भी बरसात...
देगा डकवर्थ लुईस भी तेरा साथ...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

लायेगा तू फिर से वर्डकप....
बस हौसला तू रख...
जितेगा कल भी भारत...
बस जितने का जज्बा रख...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...





गणेश दादा शितोळे
(२६ मार्च २०१५)


आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आहे...
माझ्या सारख्याच प्रत्येक भारतीयाची भारत जिंकावा म्हणून शुभेच्छा असतील ही अपेक्षा आहे....

भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि तमाम भारतीय क्रिकेट संघाला या उपांत्य सामन्याकरता शुभेच्छा देणारी ही एक शुभेच्छात्मक कविता.....


बस दो कदम दूर है मंझिल धोनी...तेरे साथ है हर हिंदुस्थानी...


तुने तो जगाया है जज्बा जितनेका...
अब फिक्र ना कर सेमी फायनल का...
देगा साथ हर खिलाडी है तुझे लढाई जितनी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

है साथ तेरे गब्बर भी देने को रोहित का साथ...
फिक्र ना कर ना बिगडेगी कोई बात....
उठेगा बल्ला जायेगी गेंद बाॅण्ड्री के पार...
देंगे ऐसी ओपनिंग  देंगे सब के छक्के छुडानी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

खेलेगा कोहली ऐसी विराट इनिंग...
बतायेगा अजिंक्य अपने नाम का सही मिनिंग...
देगा साथ रैना भी खेलकर पारी मॅचविनिंग...
होगी बरसात रनो की ओर मैदान पाणी...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

उडायेगा गिल्लीया फिंच वाॅर्नर की...
पाॅवर प्लेमेही ओपनर की वापसी कराना...
खासियत है अपने गेंदबाजो की...
लहरायगा शामी गेंद ऐसी...
देगा स्मिथ कॅच मुंह मे प्रसाद जैसी..
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

फेकेंगा यादव अपना नागपुरी स्पेल...
उडेगा दंडा हो जायेंगे आऊट वाटसन मॅक्सवेल....
क्लार्क का भी डिफेन्स हो जायेगा फेल...
लेगा तू आश्विन के गेंदपर हॅडीन का झेल...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

करेगा अपने गेंदबाजीसे शर्मा भी मोहित...
निकालेगा सर जडेजा भी किसी का तो विकेट...
होगी बीच मे अगर भी बरसात...
देगा डकवर्थ लुईस भी तेरा साथ...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...

लायेगा तू फिर से वर्डकप....
बस हौसला तू रख...
जितेगा कल भी भारत...
बस जितने का जज्बा रख...
बस दो कदम दूर है मंझिल धोनी...
तेरे साथ है हर हिंदुस्थानी...



गणेश दादा शितोळे
(२६ मार्च २०१५)


मंगळवार, २४ मार्च, २०१५



इंजिनिअरींगचा निरोप समारंभ

(डावीकडून आण्णा वाबळे, तिसरे श्रीकांत महाडीक सर, रोडे सर, सागर सर, लडकत सर, भगत सर,  जगताप सर, तोडकरी सर, घोडके सर, उंडे सर, खामकर सर, घोलप सर,
देशपांडे सर, घाडगे सर, हिरडे, जानकर ) 
(काळे सर, बाचकर सर राहूनच गेले...),
(स्पेशल २६ :-  सुहास जगताप, वैभव कोकाटे, निलेश कदम, श्रीराम पवळे, महेंद्र जाधव, प्रमोद मुरकुटे,
प्रशांत पाचपुते, संजय शेळके, प्रदीप रोकडे, सुनिल काळे, इजाज अत्तार, जयदीप नलावडे,
सागर गाडे, ज्ञानेश्वर आमले, अमोल भालसिंग, स्वप्निल साळुंखे, संभाजी चेमटे, रोहीत साठे,
 ज्ञानदेव तांबे, पुरुषोत्तम सिंग, आभाश शुक्ला आणि मंगेश मोरे.)
(पंकज चिखले यांनी कुठं टांग मारली होती)



(या स्पेशल २६ मधे आमची जागा कधीच नव्हती....)

(स्पेशल २६ - मंगेश मोरे, रोहीत साठे, प्रशांत पाचपुते)

(स्पेशल २६ - स्वप्निल साळुंखे, संजय शेळके, निलेश शितोळे)

(स्पेशल २६ - स्वप्निल साळुंखे, रोहीत साठे)

(स्पेशल २६ :- डावीकडून  महेंद्र जाधव, संभाजी चेमटे, निलेश कदम, आभाश शुक्ला,
पुरूषोत्तम सिंग, जयदीप नलावडे, स्वप्निल साळुंखे)

(स्पेशल २६ :- डावीकडून संजय शेळके, आभाश शुक्ला, निलेश कदम, 
सुहास जगताप, निलेश शितोळे, इजाज अत्तार)

(स्पेशल २६ :- डावीकडून महेंद्र जाधव, ज्ञानदेव तांबे, रोहीत साठे, जयदीप नलावडे)

(स्पेशल २६ :- डावीकडूनआभाश शुक्ला, महेंद्र जाधव, ज्ञानदेव तांबे, प्रशांत पाचपुते, रोहीत साठे)

(स्पेशल २६ :- डावीकडून कृष्णा साठे, विकास डोंगरे, संभाजी चेमटे, निलेश शिवरकर,
ज्ञानेश्वर आमले, ज्ञानेदेव तांबे, श्रीकांत नागवडे, जयदीप नलावडे, राहीत साठे, प्रदीप रोकडे)

(श्री विकीदादा पाचपुतेंसह स्पेशल २६)

(कॉलेज संपलं आणि अशीच परतीची पावले टाकून निघून गेली पाखरे उंच झेप घेण्याकरता....)

(सांजवेळी निरोप घेतलेलं हेच कॉलेजचं प्रवेशद्वार)



(कॉलेज सारखाच त्या दिवशी सूर्यानेही आमचा निरोप घेतला...)

(येऊ परत इथे कधी.....?)






                       नुकताच इंजिनिअरींगचा निरोप समारंभ (सेण्डाॅफ) झाला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या "स्पेशल 26" च्या सेण्डॉफ ला बरच काही बोलायचं होतं. पण आमच्याच काही मित्रांना कदाचित मी बोलू नये असं वाटत असल्यानं ते तसंच राहून गेले. आमच्याच मित्रांच्या दुनियादारीनं ते राहिलं अन राहूनच गेलं. खरंतर खूप राग आला होता. म्हटलं आपल्या निरोप समारंभात बोलावं पण तिथं अगोदर ढीगभर गोल लक्ष टारगेट वरच्या लेक्चर्स नं बोअर झालेला अन "सिक्वेन्स हुकलेल्या" कार्यक्रमात वेळे अभावी राहूनच गेलं.  शेवटी काय तर माझ्या नशिबात ते नव्हतेच...
वाटलं यंदा तरी काही बोलावं पण अधीच दिवसभरातल्या कार्यक्रमानं उशीर झाला अन पुन्हा एकदा बोलायचे शब्द ओठांवरच राहिले. म्हणून जाता जाता राहून गेलेलं उधारीचे दोन शब्द. ....

             "आज माझा आणि माझ्या जीवलग मित्रांचा सेण्डॉफ. खरचं कशी गेली ही वर्षे हे फक्त त्यांना आणि मलाच माहिती. सेण्डॉफ झाला की आता परीक्षांची धास्ती बसणार आहे. कदाचित पेपरवर परीक्षा द्यायची त्यांची ही शेवटची वेळ असेल. पण केवळ पदवी घेऊन अनुभव संपन्न होता येत नाही, त्यासाठी अभ्यासाबाहेरचं कॉलेज कॅम्पसच लागते.
             एक 'खच्याक' असा आवाज आणि कॉलेज कॅम्पसमधले हे मित्र माझ्या मनातील कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेत. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार येतो की, मागच्या दोन वर्षाँपूर्वी इथं माझ्या जीवलग मित्रांचा सेण्डॉफ होता पण आज आपल्याला निरोप द्यायला आपले जीवलग मित्र येणार नाहीत. 
         सेण्डॉफ का द्यायचा आणि सेण्डॉफ म्हणजे काय? हे माझ्या जीवलग मित्रांसोबतचे एकत्रीत कॉलेजमधले शेवटचेच वर्ष ना. आता आपलेचं 'कॉलेज लाइफ संपलं' आहेच असे वाटते. कससंच होतं या वाक्याने. कारण कॉलेज लाइफ संपणं म्हणजे काय हे आम्ही कॉलेजवर आणि तिथे एकत्रीत जगलेल्या प्रत्येक क्षणावर भरपूर प्रेम केल्याने कॉलेज लाइफ संपणं काय असेल कळून चुकले आहे. 
           पुढल्याच महिन्यात परीक्षा सुरू होतील आणि मग कॉलेज लाईफ नावाचं चॅप्टर आठवणींच्या खोलीत बंद होईल, निर्णयांच्या जबाबदारीचं भान ठेवूनच स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी एका नव्या स्पधेर्चा डाव खेळायला लागणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे स्वत: कमावलेल्या पैशांवर फक्त आपलाच हक्क असणार आहे. आम्ही वयाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर असताना या कॉलेज लाइफमधल्या तीन वर्षांचा आमचे करिअर घडवण्याचा दृष्टीने महत्त्वाचा वाटा आहे. फक्त पदवीच मिळवायची असती तर ती युनिव्हसिर्टीमधून परीक्षा देऊनही मिळवता येत होती, पण अनुभवसंपन्न होण्यासाठी आणि भविष्याच्या प्रवासासाठी तयारी म्हणून हे दिवस खूप काही शिकवून गेले. माणसं आणि घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, मैत्री-प्रेमातला फरक, काही बाबतीत घ्यावा लागणारा तटस्थपणा अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. या गोष्टी शिकण्यासाठी, अनुभवण्यासाठी कॉलेजलाइफच लागते. 
              डिप्लोमातून या कॉलेजमध्ये आल्यावर कॉलेजने काय दिलं, या प्रश्नाचा विचार केला तर मोठ्ठी यादीच होईल. सगळ्यात पहिलं आठवते ते मित्रांचे प्रेम, त्यांच्यासोबत घालवलेला सुंदर वेळ, तासन्तास गप्पांत रंगणं, गॅदरींगमधली धावपळ आणि त्या धावपळीत एकत्र घालवलेला वेळ, कॅण्टीनमधला केकचा राडा आणि बर्थडे बम्सची धमाल. कॉलेज सुटले तरी कॅम्पसमध्येच रेंगाळायचो. ती मस्तीभरी लाईफ अप्रतिमच होती. कदाचित मित्रांच्या नात्याची चव त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळलेली असावी म्हणूनच कॉलेजमधला प्रत्येक दिवस इतका महत्वाची वाटत असावा. 
                कॉलेजमधली मैत्री पुढे टिकत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण माझ्या मते, अशी अपेक्षाच का बाळगावी? टिकली तर उत्तमच पण नाही टिकली तर नात्यांच्या विविध रूपांपैकी असंही एक रूप हा अनुभव नाही का मिळत आणि अशा अनुभवांचा स्टॉकच पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतो. आता आमच्याबाबतीत म्हणायचं झाले तर आजपर्यंत किती ग्रुप झाले आमचं आम्हालाच माहिती नाही. तरी पण “डी कंपणी, अचानक भयानक, पिजे ग्रुप, जीएस ग्रूप” अशी कितीतरी नावं झाली. पण लक्षात राहाणारा तो “जिएस ग्रुपच” होता आणि भविष्यातही तो असेल. ग्रुपमधील आम्ही सगळे अभ्यासू होतो असे नव्हते मात्र ती कोणती गोष्ट होती जी आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवायची ते आजही न उमगलेले कोडे आहे. शिक्षकांची खेचण्यातही पुढं होतो हे सांगताना काही विशेष वाटत नाही. 
                   डिप्लोमानंतर वेगवेगळे मार्ग शोधून लांब झाल्याने त्या सख्यांची साथ आता राहिली नाही. याचं आम्हाला दु:ख वाटतं नाही, कारण या मित्रांच्या सहवासात घालवलेल्या त्या क्षणानं आम्हाला नात्याचे अनेक कंगोरे उघडून दाखवलेत. खरं तर तेव्हाच सेण्डऑफला सुरुवात झाली होती. 
                     कॉलेजमधल्या मैत्रीचा खऱ्या अर्थाने अर्थ समजला. एकमेकांची काळजी घेणं, दुसऱ्यांचा विचार करणं, भावनिक आधार देणं, मैत्रीसाठी 'कुछ भी' ही वृत्ती त्यांच्यामुळे विकसित झाली असावी. तोडकरी सरांकडूनच शिक्षक-विद्यार्थी या नात्यामधलं गहिरेपण आम्ही कॉलेजमध्येच अनुभवले. प्रत्येक वर्षी आमचे शिक्षकांशी बंध जुळत गेले आणि तेही चढत्या क्रमाने. कारण नवीन आल्यानंतर असणारे शिक्षक आता केवळ शिक्षक न राहता मार्गदर्शक, मित्र  , टीकाकार, हितचिंतक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्हाला भेटले. त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीतून मी तावून सलाखून बाहेर पडलो. त्याच्याच जोरावर आयुष्यातलं प्रत्येक चॅलेंज आम्ही चांगल्या प्रकारे हाताळू शकतो याचा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. 
                    असे शिक्षक कॉलेजनंतर लाभणार नाहीत, यापुढे असतील ते फक्त बॉस. कॉलेजमध्ये गुणांचं कौतुक झाले. चुका सुधारण्याचे प्रयत्नही झाले. पण यापुढे कदाचित लोक बोट ठेवतील ते फक्त चुकांवर, दाखवतील ते फक्त दोषच. मानसिक, शारीरिक, कौटुंबिक असे पर्सनल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आम्हाला याच शिक्षकांनी आणि मित्रांनी मदत केली, आधार दिला. प्रोफेशनल लाइफमध्ये आधार देणं नसेलच पण पर्सनल प्रॉब्लेम्सही विचारत घेतले जाणार नाहीत, तिथे महत्त्व असेल ते फक्त कामाला, आपल्या परफॉर्मन्सला. सहकाऱ्यांबरोबर प्रोफेशनली अटॅचमेण्ट असेल, भावनिकदृष्ट्या मात्र फार दूर असू... 'तू हे करू शकतोस' असं म्हणणाऱ्या शिक्षकांऐवजी 'करून दे' म्हणणारे बॉस, कॉम्पिटिटर्स असतील... बापरे! कॉलेजबाहेरचं विश्व किती भयानक आहे याची आता जाणीव होऊ लागली आहे. 
                खरंच, कॉलेज किती सुरक्षेची भावना देते, हे आता प्रकर्षाने जाणवते आहे. थोड्याच दिवसात परीक्षा सुरू होतील. पेपरवर लिहिण्याची कदाचित ही शेवटची परीक्षा असेल. यानंतरच्या परीक्षा मात्र 'जगाव्या' लागतील. पण त्याआधी एकीकडे परीक्षेचा ताण, दुसरीकडे करिअरची स्वप्नं आणि सोबतच कॉलेजला 'अलविदा' म्हणताना दाटून येणारा कंठ अशी त्रिशंकू अवस्था म्हणजे एकप्रकारची परीक्षाच म्हणावी लागेल. 
               खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही. आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?  जगायला खरोखरीच्या जगण्याला अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं.  आयुष्यामध्ये बरेच अडथळे येत असतात. नवीन जुने मित्रमैत्रीणी सतत भेटतात. काहींना दिलेली आश्‍वासनं पाळायची असतात, मित्रमैत्रीणींलाही वेळ द्यायचा असतो, त्यांचेही ऋण फेडायचं असतं. आणि अगदी शेवटी कळतं, की त्यांच्याबरोबर जे आयुष्य जगतोय म्हणजेच जीवन होतं. या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं, आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.  आनंद हाच एक महामार्ग आहे. म्हणून आयुष्यामध्ये भेटलेल्या प्रत्येक मित्रमैत्रीणींसह आनंदाकडे जाणारा क्षण साजरा करा. 
              माणूस आयुष्यात जिंकला की त्याला झळाळी येते आणि हरला की शहाणपण येतं. मला झळाळी नकोच होती पण मला एवढं शहाणंसुद्धा व्हायचं नव्हतं...मला फक्त जगायचं होतं. मैत्रीचे ते दोन श्वास सुद्धा कधी सुखाने घ्यायला जमले नाहीत. राग येत नाही पण...बस्स कधी कधी वाईट वाटतं.असं म्हणतात तुमच्या डोळ्यात दोन आश्रू आले तर तो टिपायला किती मित्रमैत्रीणींच्या ओंजळी पुढे येतात यावर ठरते माणसाची श्रीमंती. 
                           आपण सारे असेच श्रीमंत होऊ.... 
                  हे सगळे विचार फक्त आमच्याच डोक्यात घुमत नाहीयेत. प्रत्येक कॉलेज सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात रेंगाळत असणारच. आज आमच्या मित्रांचा सेण्डॉफ झाला. आता हे सगळे जण येणाऱ्या आयुष्याकडे उत्सुकतेने, आशेने अन् काहीशा भीतीने पाहत असतील. प्रत्येकाला संवेदना, भावना, आत्मविश्वास, चिकाटी आणि प्रेम याचं कम्प्लिट पॅकेज कॉलेजने त्यांना आणि आम्हालाही दिलेले आहे. पुढच्या स्पधेर्च्या युगात ही शिदोरी कामी येणारच... कॉलेजच्या या आठवणी कायमचं ताज्या राहणार आहेत, कधी हेक्टिक शेड्यूल्डमधून मोकळा श्वास घेण्यासाठी आठवणींच्या या फ्लॅशबॅकमध्ये जाताना मन सुखावणार हे निश्चित. 

                      जाता जाता कॉलेजमधली शेवटच्या दोन जून्याच पण नवीन वाटणार्‍या कविता...


हिशोब आयुष्याचा....


बसलो होतो एकदा आयुष्याचा हिशोब करायला
सुखदुःखाचा ताळमेळ लागतोय का बघायला...
सुरवात केली मी आयष्याचं पान पलटायला...
आयुष्यातल्या वळणावर बाकी काय राहिलं बघायला....

करत होतो फक्त सुखाची बेरीज
अन दुखःची वजाबाकी...
सुंदर क्षणांचा करून करून गुणाकार भागाकार
वाटत होतं आयुष्यात येईल शुन्य बाकी...

आठवले काही मग मित्र अन
जोपसलेले त्यांच्यासोबतचे छंद...
आठवून जूनं सगळं नव्यानं
मिळाला फक्त निखळ आनंद...
जून्या आठवणीत रमत हिशोब झाला मंद...

हिशोब करता करता वाटलं
आयुष्याच्या पहिल्या वळणावर केलं सर्व काही...
क्षणांची आकडेमोड करता करता लक्षात आलं...
आपण थोडसं जगलो राहून गेलं बरंच काही...










कॉलेजमधे एकेक क्षण जगता जगता...

कॉलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही...


कॉलेज लाईफ जगता जगता भेटत गेली बरीच माणसं
कोणी वाटलं हक्काचं तर कोणी परकं कधी वाटलंच नाही...
जूळून आल्या नात्यांच्या अशा गुंफलेल्या रेशीमगाठी...
रक्ताच्या नाहीत असं कधी वाटलंच नाही...

जगलो दुनियादारी सोबत काही क्षण अविस्मरणीय....
आयुष्यात कधी असं जगेल वाटलंच नाही....
साथ सोबत क्लासमेट्सची लाभली न्यारी...
मित्रांसोबतचा असाही कॅम्पसकट्टा कधी मिळेल वाटलं नाही...

गॅदरींगच्या राजकारणाचा डाव शिकलो
पण कधी मैत्रीत राजकारण करावसं वाटलं नाही...
मित्र जोडत गेलो कायम चढत्या क्रमाने....
पण मैत्रीत कोणाला दगा द्यावा कधी वाटलं नाही...

पैशानं समाजात श्रीमंत होता येतं म्हणून...
आयुष्यात पैसा कमवण्याच्या मागे धावलो नाही...
आयुष्यात फक्त हक्काची माणसं कमावत गेलो...
म्हणून मैत्रीत गरीब असल्याचं कधी वाटलं नाही....

मित्रांसोबत दिल दोस्ती दुनियादारी करत
कॉलेज कॅम्पस कट्ट्यावर आयुष्य जगलो बरंचकाही...
कॉलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
कॉलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही........!!!




(श्रीकांत नागवडे, रोहीत ननावरे, महेश वारे, महेश बांडे, विकास डोंगरे, प्रेवीण गाडे आपण नक्कीच काहीतरी पाप केलं असावं यात आपल्याला जागा मिळाली नाही. असो मैत्रीच्या ओंजळीत जागा आहे ना. बस्स तेच आपल्याला समाधान. )

 गणेशदादा शितोळे
(२४ मार्च २०१५)


शनिवार, २१ मार्च, २०१५

काल खुप दिवसांनी पुन्हा एकदा मराठी चित्रपट मनापासून बघितला अन आठवले संपत चाललेले काॅलेजचे आयुष्य अन तूटत गेलेले "क्लासमेट्स"...



विश्वासाला तडा गेला की
नात्यात काहीही राहात नाही...


विश्वासाला तडा गेला की
नात्यात काहीही राहात नाही...
सगळीकडे अंधार वाटतो
प्रकाशाचा कवडसाही कुठून डोकावत नाही...

आठवणींच्या रमण्यात
डोळ्यातली आसवे विरून जातात...
ओल्या जखमांची सल मात्र
काहीही करून सुकून जात नाही...

दुःख तेवढी सावलीसारखी सोबत असतात...
सुखांची झुळूक क्षणभरही येत नाही...
समजवायला भोवताली असतात अनेक आपली वाटणारी माणसं...
मात्र समजून घ्यायला कोणी धजावतच नाही...

वाटलं मग देव तरी आपल्याला समजून घेईल...
कारण भावना नाहीत आपल्या इतक्याही वाईट...
पण अचानक मन देव संकल्पनेला माननं सोडून देतं...
अन वेडं मन एकटंच कुढल्याशिवाय राहत नाही....

वाटलं जरी देव नावाची व्यक्ती आपली असेल...
तरी न दिसणार्‍या देवाला प्रार्थना करून...
मन मात्र विटून जात असतं
कारण आपलं मन आपल्याला सोडून कोणालाच कळत नाही....

विसरून जावे वाटते सगळे गेलेलं आयुष्य...
पण आठवण आल्याशिवाय मनाला राहवत नाही...
माझीच माणसं आहेत ती सगळी...
मी त्यांचा अन ती माझी हक्काची माणसं....

नाती तुटून जातात
बंधाची गोफ उसवत गेली की...
नाती तुटली तरी ती माणसं आपली आहेत...
मनाला याशिवाय काही सुचतच नाही....


गणेश दादा शितोळे
(२१ मार्च २०१५)
 


शुक्रवार, २० मार्च, २०१५

आज फाल्गुन आमवस्या
सह्याद्रीचा छावा...
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
रूद्रशंभू शिवपुत्र
स्वराज्याचे दुसरे छत्रपती
युवराज संभाजी राजे यांचा बलिदान दिवस...

शिवछत्रपती नंतर महाराजांच्या स्वराज्याची तेजस्वी मशाल शेवटच्या श्वासापर्यंत जपणारा आणि आयुष्यात कधीही पराभवाचं तोंड न पहाणारा हा छावा आपल्याच काही माणसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने धारातीर्थी पडला...
अशा शिवपुत्र शंभुराजास या मावळ्याचा मानाचा मुजरा....

पाठीवर वार केला म्हणूनीच,माझा राजा आजच्या दिनी धारातीर्थी पडला....


दिवस ऐसा उगवला
अन राजांचा मुक्काम संगमेश्वरी पडला...
मित्र म्हणावा की अजून काही
होता कलुषा साथीला
अन संताजी धनाजी दिमतीला...

आपल्यांनीच होता पाठीत खंजीर खुपसला....
औरंग्याला राजं संगमेश्वरी थांबल्याचा निरोप धाडीला.... 
मुकर्रब खान राजांना पकडण्याचा पण करूनी निघाला...
सोबत गणोजी होता मार्ग दाखवायला...

राजांनी होतं पाठवलं संताजी धनाजीला
राजधानीचं रायगडाचं संरक्षण करायला...
सोबत ठेवले होते फक्त मुठभर मावळे..
अन सरलष्कर म्हालोजी घोरपडेंला...

अचानक समोरूनी धुळीचा लोट उठला...
मुकर्रब खान संगमेश्वरी येऊनी धडकला...
लाखभर फौजेशी झुंजाया तरणाबांड सह्याद्रीचा छावा
अन ऐंशीच्या उंबरठ्यावरचा म्हातारा उभा ठाकला...

सपसप करत एकेक मुघल कापला जाऊ लागला...
राजांनी मांडवी नदीचा धावा दिला..
अचानक कैसा कलुषा घोड्यावरूनी कोसळला
अन स्वराज्याचा छत्रपती थांबला...
मृत्यू दिसतानाही मैत्री निभावत राहिला...

लढता लढता म्हाळोजी बाबा वीरमरण पावला...
जाता जाता राजाला शंभर मुघलांच्या रक्ताचा अभिषेक घालून गेला...
शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढला..
मराठ्यांचा सरलष्कर रणांगणात धारातीर्थी पडला...

मुकर्रब खानानं जाळ्याचा दोर ओढला...
अन मराठ्यांचा राजा कैद झाला...
सोबत कलुषा ही पकडला गेला...
आयुष्यात राजांच्या नजरेला नजर न देणारा
गणोजी मनमुराद हसला...

मजलदरमजल करत बहादूर गडाचा प्रवास सुरू झाला...
मराठ्यांचा राजा कैद झाल्याचं कोणालाच नाही कळला...
दीडशे कोसांचा प्रवास करत मुकर्रब बहादूर गडासी पोहचला...
साथीने गणोजी च्या कैद राजा दरबारी पेश केला...

भीमेच्या किनारी विदूषकी झबल्याचा खेळ सुरू झाला...
मराठ्यांचा राजा बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला...
राजांचा स्वाभिमान तरी ना भंग पावला...
पाहूनी अपमान भीमा सरस्वती च्या डोळ्याला पाझर फुटला...

अत्याचाराचा खेळ रोजचा नियमित झाला...
रोज औरंग्या एकच प्रश्न विचारी राजाला...
कोण गद्दार होता आमच्यातला तुमच्या साथीला. ..
राजांच्या उत्तराने संताप येई औरंग्याला...

उंचपुर्‍या धडाऐवजी औरंग्या तळवाभर जिव्हेला घाबरला...
रोखूनी बघाणार्‍या डोळ्यांचा धसका घेतला...
अचानक राजा एकदिनी स्तंभाला बांधला...
तप्त सळ्यांनी डोळ्यांचा खोबण्या केला...


पुन्हा पुन्हा जिव्हेला बाहेर ओढण्या झाला...
वाचेला त्या राजाच्या ना कैद करू शकला...
चिमटीत स्वराज्याचा श्वास दाबून धरला...
स्वराज्याचा बुलंद आवाज बंद झाला...

सुरू झाला प्रवास वढू तुळापूरला...
टाकत होता औरंग्या प्रत्येक पाऊल
जणू स्वराज्याचा प्राण घेण्याच्या निश्चयाला
स्वराज्य घेऊ कवेत ठार करूनी सह्याद्रीच्या छाव्याला

दिन ऐसा कोणता तो निवडला...
पडला धारातीर्थी राजा फाल्गुन आमवस्येला
शिरापासूनी केलं वेगळं तेजस्वी धडाला...
भाल्याच्या टोकाशी लटकवलं शिराला...
मरणानंतरही सीमा नव्हती अत्याचाराला...

फेकून भीमेच्या डोहात देह परी
एवढा अपमान माझ्या राजाच्या पदरी का आला...
मराठी नववर्षांच्या पूर्वसंधेला..
अवघा स्वराज्य छत्रपती विना झाला...

मृत्यू ला समोर पाहूनी भी मैत्री निभावत गेला...
परी मित्रांनं आघात केला की
नात्यानं दगा दिला...
पाठीवर वार केला म्हणूनीच
माझा राजा आजच्या दिनी धारातीर्थी पडला....


गणेश दादा शितोळे 
(२० मार्च २०१५)


तू गेली जरी दूर....


तू गेली जरी दूर त्या वाटेवरी....
जीव होता तिथेही टांगलेला तुझ्यावरी...
साद घालतो मी कोवळी ऐकू येते का बघ तुला उरी...
धाव घेई मन पुन्हा पुन्हा त्या वाटेवरी...
बावरंलेले मन सावरू मी कसे क्षणभर तु मला सांगना सांगना
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

बांधता प्रेम ओढीचे हे परस्परांसवे...
रेशीमगाठ बांधत जुळले नाते नवे...
अबोल शब्दातही नात्याला बोल सुचावे...
हरवलेल्या क्षणात त्या तू मला होकार द्यावे....
दे ते क्षण पुन्हा अन सावरू दे माझ्या या मना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

ठसे कोरले तू प्रेमाचे हळव्या ह्रदयावरी...
शोधतो तुला भटकलेल्या वाटांवरी...
सोबतीला ना कोणी चालताना तरी...
शोधतंय मन माग उरले का या वाटांवरी...
मी शोधावी कशी हरवलेली वाट तु सांगना सांगना....
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

येऊनी मनी आठवणी भेटती चोरून आसवे...
जुनेच भास अन जुनेच क्षण का आठवे...
आघात हे असे खोलवर का रूतावे...
जखम ही कसला मनाला ठाव नसावे..
ते क्षण कसे सतवत रहाते पुन्हा पुन्हा मना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

आसवे ती प्रेमाची ओघाळत रहाती गालावरी...
अन बोलण्या शब्दही आज ते आतुरलेत ओठांवरी...
अडखळत श्वास रोखून जगतो तरी...
वाट बघते मन तू परत येशील माघारी...
घेण्या श्वास बोलण्या तुझ्या मना कधी येशील सांगना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

खोल प्राणातली ऐकू येतेय मैहफील सुनीसुनी...
अडखळता श्वास गुंतलेलं मन साद देत आहे जुनी...
ओढ लागली क्षणात भेटण्या मनी...
तू ये तू ये पुन्हा भेटाया मज मागे परतूनी...
बावरंलेले मन सावरू मी कसे क्षणभर तु मला सांगना सांगना
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...

कवितेतलीही कडवी बोलती...
मला वेडं लागावे लिहण्यताचे की प्रीती
शब्दांनीही फुंकर घालावी खोलवरच्या जखमांना किती
भास तुझे होती आठवण दरवळती भोवती
वेडा मी उभा इथे या क्षणी अन दूर तू का सांगना...
वाट बदलली का हरवून गेली का अशी तू मला सांगना सांगना...


गणेश दादा शितोळे
(२० मार्च २०१५)


बुधवार, १८ मार्च, २०१५

केरळच्या प्रवासात आमचे जिवलग मित्र आम्हाला मित्रपरिवाराला सोडून जेव्हा मैत्रीणीच्या मागे लागले होते तेव्हा वैतागून आम्ही सगळ्यांनी लिहीलेला हा पाळणा....
(मुद्दामहून नावं टाकली नाहीत. परत सगळंच अवघड व्हायचं...)

जा बाबा जा रे जा...तिच्याच मागे जा...


ट्रेन मधे गेली एका सोबत...
तो मात्र बसला फक्त मागे हिंडत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

विंडो सीट वेळी दिसली दुसऱ्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त डबा नेऊन देत...
जा तोजा रे जा...
तिच्याच मागे जा...

अंताक्षरी वेळी दिसली सरांसोबत ...
तो मात्र बसला अंताक्षरी बघत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

लंच वेळी गेली अजून तिसऱ्याचसोबत...
तो मात्र बसला फक्त भूक लागली करत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

पद्मनाभला गेली चौथ्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त मागे मागे हिंडत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

बोटीत बसायला परत गेली पाचव्याच सोबत...
तो मात्र बसला फक्त पुढे टिकटं काढंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

विवेकानंद टेम्पल ला परत गेली भलत्यासोबत...
तो मात्र बसला फक्त एका फोटोसाठी वाट बघंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...

शेवटी डिनरला बसली त्याच्यासोबत...
पण तो बसला फक्त तिलाच खायला घालंत...
जा बाबा जा रे जा...
तिच्याच मागे जा...


गणेशदादा शितोळे
(१८ मार्च २०१५)


मंगळवार, १७ मार्च, २०१५

दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....


भावनांच्या ओंजळीतूनी स्वप्न मज पडले...
आठवणींच्या पदराला अलगद उलगडू ते लागले...
कुठल्याशा कोपर्‍यात होत एक वाक्य लिहिलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

आयुष्याच्या वाटवरूनी आयुष्यच झाले होते भटकलेले...
वाट चुकली की वाटाड्या उत्तर ना उमजलेले...
भेटेल कोणी सहप्रवासी याच आशेवर चालते झालेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....


उद्याच्या मृगजळावर आयुष्य होत क्षणभर मंतरलेले....
क्षितिजाच्या आशेवर होते जरा विसावलेले...
वाट पाहूनी जीव शिनावा ना कधी मनी आलेले....
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

वाट पहाता पहाता वेळचे गणितच चूकू लागलेले...
नवी नाती गुंफण्यात जुने हच्चे विसरलेले..
कितीही वेळा वजा केले तरी थोडे बाकी होते राहिलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....

उद्याच्या आनंदासाठी आजचे आनंदी क्षण निघून होते चाललेले...
सोबत आयुष्याची वाट चालावी स्वप्न होते पाहिलेले...
होईल पूर्ण कधीतरी याच आशेवर टिकलेले...
दोन मिनिटांच्या होकारासाठी आयुष्य होते थांबलेले....





गणेश दादा शितोळे 
(१७ मार्च २०१५)


शुक्रवार, १३ मार्च, २०१५

आत्ताच केरळची ट्रीपवरून जाऊन आलो....
मुन्नार मनुपट्टी डॅम दरम्यानच्या प्रवासात
साथीला होता बरसणारा पाऊस..
अन सोबतीला होती शब्दांची साथ...
गुंफत गेली एकेक ओळ....
अन अलगद उतरली मनातली बात....

आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात

आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात
निराशेच्या दुख:त सगळेच सेन्स हरवून जातात

कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेत होतं
आठवणींच्या कड्यावरून स्वत:लाच झोकून देत होतं

कोसळत होत्या सरी आणि धुंद झालेली हवा
आपसूकच कोणीतरी छेडलेला ढगांचा थवा

पण चिंब भिजलं तरी अंग कोरंच वाटत होतं
मनावर आलेलं मळभ मात्र अजूनही दाटलेलं होतं

मोकळया हवेत पण कधी अडखळत होता श्वास
गर्दीत असतानाही होत होता एकटेपणाचा भास

मित्रांच्या संगतीतही कधी मन मात्र एकटंच राहत होतं
ट्रिपमधेही एकांतात मोकळीक शोधत होतं

वेडया मनाला वाटतंय माझ्यापासून काहीतरी दुरावलंय
जणू काही काळाकरता माझं सर्वस्व हरवलंय

मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर

पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं
अश्रू मधून कधी ते नकळत गळतं...

गणेश दादा शितोळे
(१३ मार्च २०१५)



काॅलेज कट्टा




आयुष्य हे रमलेले काॅलेजच्या कट्ट्यावर. ...
नेहमीच्या त्या अड्ड्यावर...
गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीत....
आठवत राहते काॅलेज लाईफ नेमकं संपल्यावर....

लेक्चर बंक करोनी जमतो असा कॅन्टीनमधे अड्डा...
कधीचा फस्त होता मिसळ पाव अन वडा...
होतो थोडा हसी मजाक अन राडा...
आठवणीत उरतो मग केलेला कल्ला तेवढा...

कोणी एकच असते इथं ऐश्वर्या
अन ढीगभर असतात सलमान...
प्रत्येकालाच वाटते तीच आपली काजोल...
अन मीच तिचा शाहरुख खान...

तिला मिळवण्यासाठी समजतो,
प्रत्येकजण स्वतःला सिंघम...
मोहबते अन रब ने बना दी जोडी करता करता
होऊन जातो तेरे नाम अन बेवफा सनम...

प्रेमही होत नाही अन नाही होत मग अफेअरही...
मात्र एका टाईमपाससाठी लढतात सख्खे मित्रही...
आयटमवरच्या भांडणात संपून जाते मैत्रीही...
आता वाटतं राहून गेलं निभावणं मैत्री अन करायला प्रेमही...


गणेशदादा शितोळे
(१३ मार्च २०१५)


शनिवार, ७ मार्च, २०१५

ट्रेनच्या प्रवासादरम्यान रंगलेल्या " ट्रुथ अॅण्ड डेअर " खेळताना विचारलेला " आयुष्यात कधी काही मिस केलं असं वाटतं का ? "
या प्रश्नाचं त्यावेळी मी उत्तर तर दिलं पण तो प्रश्न तसाच मनात राहिला अन सुचली नवी कोरी एक कविता....

अजूनतरी कधी वाटलं नाही, 
आपण आयुष्यात काही मिस केलं...

मी लहानपणापासूनच असा
कसाही राहणारा अन तब्बेतीनी वाढलेला बराचसा...
कित्येक जणांनी बरचसं सांगितलं..
मात्र नाही कधी मला बदलता आलं...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं...

वर्ष गेली दिवसांचं पान पलटत राहिलं...
जूनंच आयुष्य नवीन असल्यासारखं फक्त वाटत राहिलं...
वय वाढत गेलं पण मला नाही बदलता आलं..
फक्त जिन्स टी शर्ट्स रूप फाॅर्मलनं घेतलं...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं...

आपल्या दिसण्यावरून अन असण्यावरून
म्हणे स्टेटस कळतं असं लोकांना वाटत असेल...
पण यातून फक्त लोकांना पैशाची श्रीमंती दिसत असेल...
मला पाहून लोकांना कदाचित मी गरीब वाटत असेल...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं असेल...

बघाणारांना पैशाची श्रीमंती दिसत असेल....
म्हणून मला कित्येकदा बिलो स्टेटस समजलं असेल...
मी फक्त आयुष्यात माणसं कमावत गेलो..
मात्र बघाणारांना मला मैत्रीने खुप श्रीमंत केलेलं दिसलं नसेल...
पण म्हणून अजूनतरी कधी वाटलं नाही
आपण आयुष्यात काही मिस केलं असेल...



गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)


केरळ ट्रिप दरम्यान सुचलेली आणखी एक कविता. ...

माफ कर मित्रा ,
आमचंच मैत्री निभावताना काहीतरी चुकलं..

आज पहिल्यांदा मनाला वाटलं..
मित्रा आमचंच मैत्री निभावताना काहीतरी चुकलं..
दोस्ती यारी मित्रांची दुनियादारी करत..
मैत्रीत स्पेस द्यायचंच राहून गेलं...
मित्रा मैत्री निभावताना एवढंच राहून गेलं..
माफ कर मित्रा आमचंच मैत्री निभावताना काहीतरी चुकलं..

मैत्रीमधे मी फक्त माझंच बघायचं नाही आम्हाला कळलं..
मैत्रीने फक्त मी नाही आपण एवढंच शिकवलं...
आयुष्यात फार लवकर तू मला मैत्रीचं नवीन रूप शिकवलं
माफ कर मित्रा आमचंच मैत्री निभावताना काहीतरी चुकलं..

मैत्री म्हणजे नसतं गर्लफ्रेंड की मित्र यातलं भांडण...
इतक्या दिवसांच्या मैत्रीत एवढंच आहे कळलं...
आता वाटतंय मैत्रीत गर्लफ्रेंडवरून भांडण सुरू झालं...
माफ कर मित्रा आमचंच मैत्री निभावताना काहीतरी चुकलं..




गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)


कोणी हक्काचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!

आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम माझ्याशीच बोलत बसावं...!!
फक्त कधी दोन शब्द बोलावेसे वाटले तर
कोणी हक्कचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!

आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम माझंच ऐकून घ्यावं...!!
फक्त कधी मन मोकळं करावसं वाटलं तर
कोणी हक्कचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!

आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही माझ्या शब्दाला किंमत द्या...!!
फक्त हाक दिलीच कधी तर
ओह द्यावी इतकीच अपेक्षा होती...!!

आम्ही कधी म्हणालो नव्हतो की
तुम्ही कायम सोबतच रहा...!!
फक्त पाठीमागं वळून बघितलं तर
कोणी हक्काचं असावं इतकीच अपेक्षा होती...!!


गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)



काॅलजेचा कट्टा
खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात ही अशी गोष्ट असते की ती कधी विसरली जात नाही. ...
या कट्यासोबत असतात अनेक आठवणी....
काहीशा मजेदार तरी डोळे ओले करणार्‍या....

लवकरच या काॅलेज कट्ट्याचा मी खरंतर निरोप घेणार आहे पण फक्त फाॅरमली...
तसा हा कट्टा कायम सोबतच राहणार आहे हे नक्की. ..
मित्रांची आठवण ठेवत अन मैत्रीला साद घालत....

याच काॅलेज कट्ट्यावर केरळ ट्रीपमध्ये सुचलेली कविता....




काॅलेजच्या कट्ट्यावर...
.

आयुष्य हे रमलेले काॅलेजच्या कट्ट्यावर. ...
नेहमीच्या त्या अड्यावर...
गप्पांच्या रंगलेल्या मैफिलीत....
आठवत राहते काॅलेज लाईफ नेमकं संपल्यावर....

लेक्चर बंक करोनी जमतो असा कॅन्टीनमधे अड्डा...
कधीचा फस्त होता मिसळ पाव अन वडा...
होतो थोडा हसी मजाक अन राडा...
आठवणीत उरतो मग केलेला कल्ला तेवढा...

कोणी एकच असते इथं ऐश्वर्या राय
अन ढीगभर असतात सलमान खान...
प्रत्येकालाच वाटते तीच आपली काजोल...
अन मीच तिचा शाहरुख खान...
तिला मिळवण्यासाठी समजतो स्वतःला बाजीराव सिंघम...
मोहबते अन रब ने बना दी जोडी करता करता
होऊन जातो तेरे नाम अन बेवफा सनम...

प्रेमही होत नाही अन नाही होत मग अफेअरही...
मात्र एका टाईमपाससाठी लढतात सख्खे मित्रही...
आयटमवरच्या भांडणात संपून जाते मैत्रीही...
आता वाटतं राहून गेलं निभावणं मैत्री अन करायला प्रेमही...


गणेश दादा शितोळे
(०७ मार्च २०१५)