माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, ९ जून, २०१६

पक्षनिष्ठा...!!!

 



पक्षनिष्ठेच्या गप्पा मुळात,
मारूच नयेत कुणी....
निवडणूक आली जवळ की,
उमेदवारीच्या उमळ्या फुटतात मनी...

पक्षनिष्ठा, पक्षनिष्ठा म्हणजे असतं तरी काय...?
सभेत सतरंज्या उचलणे,
चौकात बॅनर लावणे
अन बिनकामाचे नेत्याभोवती गोंडा घोळणे...

गेले ते दिवस केव्हाच,
पक्षाकरता काम करायचे..
महत्त्व उरलेय फक्त आता,
कोणी किती खर्च करायचे....

पक्षनिष्ठेच्या जोरावर तिकट मिळणे,
झालेय आता दिवास्वप्नच....
उमेदवारी ठरते आता फक्त,
पैसे खर्च करण्याच्या श्रीमंतीवरच ...








गणेश दादा शितोळे
(८ जून २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा