माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ५ जून, २०१६

शिवराज्याभिषेक सोहळा २०१६....


उद्या शिवराज्याभिषेक सोहळा....स्वराज्याचा स्वातंत्र्यदिन...
शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे अनेक शिवछत्रपती प्रेमींच्या गर्दीने राजधानी रायगड फुलून जाईल.
पण शिवछत्रपतींच्या समाधीस्थळासमोर उभे राहून स्वतःला प्रश्न विचारले तर बरं होईल....
खरंच आपण राजांना मानतो का..?खरंच आपण शिवछत्रपतींच्या विचारांवर चालतो का..?की फक्त जयंती पुण्यतिथी अन सोहळ्यांकरता मिरवण्यापुरते शिवाजी महाराजांचा वापर करतो..?परस्त्री चा आदर ठेवण्याचा शिवछत्रपतींचा विचार घेऊन आपण वागतो आहे का..?की समोरच्या स्त्री वर टीका टिपणी करतो..?अश्लीलतेचा बाजारात यथेच्छ हिंडतो..?आपण नेमके कोणते विचार पसरवतो..?शिवाजी महाराजांनी कधीही जातीयता पाळली नाही...आपण काय करतो..?माणसामाणसात भेद करणार्‍या जातीचा कशाला हवा आपल्याला एवढा अभिमान..?शिवाजी महाराजांनी कधीही धार्मिक द्वेष केला नाही..?आपण का दुसर्‍या धर्माच्या लोकांना शिव्या घालतो..?आपल्यात का इतका धार्मिक द्वेष भरला आहे..?शिवाजी महाराजांनी सर्वांना सामावून घेणारा विचार दिला..आपण काय करतो..?खरंच पाळतो वागतो शिवछत्रपतींच्या विचाराने..?
याची उत्तरे जेव्हा सकारात्मक येतील तेव्हाच शिवछत्रपतींना मानतो म्हणण्याला अर्थ आहे. 
नसतील येत तर घ्या शपथ महाराजांच्या समाधीस्थळासमोर आणि आपल्यात बदल घडवायला सुरवात करा...

गणेशदादा शितोळे
(०५ जून २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा