माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, १५ जून, २०१६

वेस्ट इंडीजकडून पराभव अन निवृत्तीचे सल्ले

                            नुकताच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उपान्त्य फेरीत वेस्ट इंडिज विरोधात पराभूत झाला अन टिव्ही चॅनेलवर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली. आजी माजी क्रिकेटपटू उगाचच फुकटचे सल्ले देतानाही दिसले. भारतीय संघाच्या पराभवाची जबाबदारी कर्णधार म्हणून धोनीने स्विकारलीही. पण मिडिया आपल्या टिआरपी करता कोणालाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून दोषी ठरविण्याकरता वादळी चर्चा घेताना दिसतात. आर आश्विनने नो बाॅल टाकला म्हणून भारत हारला द्या त्याला डच्चू. पंड्याने नो बाॅल टाकला काढून टाका संघातून. भारत पराभूत झाला करा धोनीची उचलबांगडी असे नानाविध आरोप करून जवळपास प्रत्येक खेळाडू कसा पराभवला जबाबदार आहे याचे उसने घेतलेले सल्ले ऐकून निवड समितीने निर्णय घेतले तर हे आजी माजी खेळाडू आणि मिडिया वालेच मैदानात उतरावावे लागतील. एक नो बाॅल टाकला म्हणून आश्विनला दोष देताना हे कसे विसरले जाते की याच आश्विनच्या भरवशावर भारतीय फिरकी गोलंदाजी अवलंबून आहे. इंग्लंड मधील चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकण्यासाठीचे योगदान एक झटक्यात डोळ्याआड कसे होते समजत नाही. गेल्या चार पाच वर्षात भारताच्या प्रत्येक विजयात याच आश्विनने मोलाचा वाटा उचलला होताच ना.

                           हार्दिक पंड्या. बांगलादेश विरुद्धचा साखळी सामना जिंकला त्यातील निर्णायक ठरलेली शेवटची ओव्हर टाकून याच हार्दिक पांड्याने विजय मिळवून दिला होता. आशिया चषकात केलेल्या तडाखेबंद फटकेबाजीला कसे एवढ्या लवकर विसरले जाते...?

                               महेंद्र सिंग धोनी. भारताचा कर्णधार.  टिव्हीवर फुकटचे सल्ले देणारे हे आजी माजी खेळाडू जणू धोनीच्या निवृत्तीवर टपूनच बसले आहेत. धोनीला निवृत्तीचा सल्ला देताना त्याच्या नेतृत्वाखाली जिंकलेला दोन्ही विश्वचषक विसरून चालणार नाही. आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून निश्चित धोनीची गणना होते. धोनी इतका शहाणा अन समजदार निश्चित आहे की त्याला निवृत्ती कधी घ्यावी हे समजायला. मग हे फुकटचे सल्लागार कशाला आटापिटा करतात हेच कळत नाही. क्रिकेट मधील जाणकार असणारा प्रत्येक जण हेच मानतो की धोनी योग्य वेळी निवृत्ती जाहीर करेन. जशी त्याने अनपेक्षित पणे कसोटी क्रिकेट मधून घेतली तशीच. निदान गांगुली सारखी परिस्थिती ओढावणार नाही. 
असो.

                            भारताच्या पराभवाने भारतीय चाहते नक्की नाराज झाले असतील. अन भारतीय संघावर प्रेम करणार्‍या त्या प्रत्येकाचा तो अधिकार आहे.  जिंकल्यावर डोक्यावर घेणारे हेच चाहते आता हिरमुसले नक्की. पण शेवटी खेळ हा खेळ असतो. कुणी पराभूत झाले तरच कुणी विजेतेपद पटकावते. जसा भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला तसाच खिलाडीवृत्तीचं दर्शन देत पराभवही आनंदात स्विकारला पाहिजे. उपान्त्य फेरीतील सामन्यात भारतापेक्षा वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम खेळ झाला अन विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

                         तसं पाहिलं तर क्रिकेट मधील भारताचा पराभव प्रो कबड्डीच्या तिसरा सिझनमधील फायनलमधे पराभव पत्करावा लागलेल्या युमुंबासारखाच वाटतो. शेवटी या वर्षीची सुरवात अपेक्षाभंगाने झाली आहे. 

प्रो कबड्डीच्या मैदानात यु मुंबाचा पराभव

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव....

पण यातूनही यशस्वी वाटचाल सुरू होत रहणार....

आता प्रतिक्षा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदकाची....

रियो ऑलंपिक २०१६

गणेशदादा शितोळे
(१५ जून २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा