माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, ६ जून, २०१६


रायगड




आयुष्यात एकदाच रायगडावर गेलो होतो. 


समाधीस्थळासमोर उभा राहून महाराजांना मुजरा केला.
 

परंतु आजवर मनातच नाही पण छातीतही ती उर्मी नाही की 
महाराजांच्या समाधीस्थळासमोर जाऊन मुजरा करावा...
 

कारण मनात कायम एक विचार येतो..

महाराजांच्या समाधीस्थळासमोर जाऊन मुजरा करावा इतकी आपली लायकीही नाही....

बहलोल खानाला अभय देऊन त्यानेच स्वराज्याशी दगाफटका केला म्हणून आता महाराजांना तोंड दाखवायची आपली लायकी नाही समजून प्रतापराव गुजर यांनी केवळ सहा मावळ्यांसोबत सातशे मुघलांचा खातमा केला अन लढता लढता स्वराज्याकरता आहूती देत महाराजांना शेवटचा मुजरा केला. 
तितकी स्वामीनिष्ठता आपल्यात नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करून ज्या दिवशी वाटेल की आता महाराजांच्या समाधीस्थळासमोर जाऊन मुजरा करावा त्यादिवशीच पुन्हा एकदा रायगडावर....
मनात शिवछत्रपती आहेत ना बास..
तोपर्यंत आपले प्रयत्न सुरू ठेवायचे...


गणेशदादा शितोळे
(०६ जून २०१६) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा