मला भेटलेला आनंदयात्री - राहुल गिऱ्हे...!!!
आज त्याचा वाढदिवस. खरंतर आमची ओळख कशी झाली तिथपासून सुरू झालेला मैत्रीचा प्रवास आज या उंबरठ्यावर न्याहाळला तरी अगदी तसाच कोरा करकरीत आठवतो. आयुष्यात भेटलेल्या आनंदयात्री रेखाटण्याइतका सुस्पष्ट. डिप्लोमा संपला आणि आमच्यातील नियमित होणारा संपर्कही संपला. अधूनमधून भेटी होत राहिल्या. पण दोघे दोन वेगळ्या वाटेने पुढे गेलो. संवाद तुटला असं म्हणता येणार नाही. कारण आजही माझ्या मनातील त्याची जागा तशीच अबाधित आहे. अगदी त्याचा हरवलेला मोबाईल क्रमांक लक्षात राहिला तसाच. ९९७५३१५४३४ उर्फ राहुल आणि त्याला आवडणारं नाव म्हणून राज... आजही त्याची देण असलेला शब्द प्रियराज माझ्या कवितासंग्रहाला एकत्रित करून ठेवत आहे.
आमची शेवटची भेट झाली ती त्याच्या लग्नात. त्यानंतर अजूनही भेट प्रतिक्षायादीतच आहे. हा दोष त्याचा नाहीच मुळी. मीच असा एकलकोंडा झालोय की गेली दोन वर्षे झाली मित्रांना भेटणं टाळतो. स्वतःला बांधून टाकलंय. मनातून बिलकुल आवडत नसणार्या एका विश्वाय बंदिस्त केले आहे. मित्रांच्या गराड्यात राहाण्याचे दिवस पालटले आणि मी एकटा झालो. पण आजही कधी काही बोलावसं वाटलं तर पहिला विचार नक्की त्याचाच येतो. तो असता तर..?
![]() |
| स्टाईल आयकॉन जगण्याची अन रहाण्याचीही स्टाईल वेगळीच.... |
![]() |
| दोन चांगले मित्र आयुष्यभराचे साथीदार झाल्याचा आनंद वेगळाच...Keep Smiling राहुल आणि अबोली.. |
अंगावरचा वार झेलणारी मैत्री सहजपणे विसरत नाही. तसाच त्याचा काही दिवस बहिरा झालेला कान लक्षात आहे. त्याच्या विषयी तसं लिहिलं तर दोन वर्षे सोबत जगलेलं माझं वेगळं जग लिहायला लागेल. तूर्तास इतकेच. राहुल वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. चिरंजीव मधून श्री झाला आहे. अंगावर पडेल ती जबाबदारी मुलगा अन नवरा म्हणून मित्राइतकीच जबाबदारीने पार पाडशील हा विश्वास आहे. आजवर तुझा कोणताच वाढदिवस साजरा करताना मी उपस्थित राहू शकलो नाही. तसाच ह्या ही वर्षीचा गेला. पण पुढच्या वाढदिवसाला नक्की शुभेच्छा द्यायला प्रत्यक्ष उपस्थित असेल. लवकरच आपली भेट होईलच.
गणेश दादा शितोळे
(२४ जून २०१८)
(२४ जून २०१८)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा