पाऊस…!!!
पाऊस म्हणजे आभाळगारूडंच
उथळ मनावर थाटलेलं...
जणू ऋतूनं कूस बदलताच
अंग ओसांडून चींब झालेलं...
क्षितीजालाही समांतर रेषांमधे
आभाळानं व्यापून टाकलेलं...
आयुष्याच्या गाभ्यात रुजवून जगणं
चाहुलीनंच मन आनंदून गेलेलं...
थुईथुई नाचत नाचत
पावसाचे शालीन सौंदर्य नटलेलं...
साठवून मन तृप्त होऊन
ढगांच्या सावलीला विसावलेलं....
शहारणाऱ्या गारव्यासोबत
इकडून तिकडं मन भिरभिरलेलं
चातकासारखा आभाळथेंब शोषताना
जलतपस्येत ध्यानस्थ होतं झालेलं...
गणेश
शितोळे
०४ जून २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा