नुकताच आमच्या मित्राचा निरोप समारंभ उरकला...
तिची अन त्याची शेवटची भेट होती...
इंजिनियरींगची चार वर्षे उलटली
तिची अन त्याची शेवटची भेट होती...
पण तो फक्त तिच्याकडे बघत राहिला....
वरवर दाखवत नसला तरी आतून प्रेम करत राहिला...
खास त्याच्यासाठी सुचलेली कविता.....
वरवर दाखवत नसला तरी आतून प्रेम करत राहिला...
खास त्याच्यासाठी सुचलेली कविता.....
कधी वाटतं आपलं अफेअर करायचंच राहून गेलं...
पहिल्यांदा तिला पाहिलं अन वाटलं...
आयुष्यात आपल्यालाही प्रेम करायला कुणी भेटलं...
रोज तिला बघण्यातच महिन्याच पान उलटलं...
पण तिनं एकदा वळून बघायचंच राहून गेलं...
प्रत्येक दिवशी तिला बघितलं की वाटायचं..
आजतरी तिच्याशी दोन शब्द बोलावं...
मनात तर भरपूर होतं बोलण्यासारखं...
पण ओठांवर यायचंच राहून गेलं...
फ्रेण्डशीप डे आला अन गेला
आज तरी फ्रेण्डशीपचं विचारावं तिला...
पांढरं गुलाब फूल देवून तिला..
तिचं स्मित हास्य पाहायचंच राहूनच गेलं...
मित्रांच्या मैफिलीत बसलं की...
पक्क व्हायचं उद्या तिच्याशी बोलायचंच...
ह्रदयातल्या भावनेला ओठावर आणायचंच..
पण तिला बघताच मन हिम्मत करायचंच राहून गेलं....
बोलणार्या डोळ्यातले भाव पाहुन घ्यावं तिनंच समजून ...
त्याला कायम तेव्हढंच वाटत राहिलं..
मनातील सार तिच्याशी बोलायचं म्हणत...
पुन्हा एकदा बोलायचंच राहून गेलं...
त्यानं विचारलं नाही तिला मैत्रीचं यावेळीही
तिही बहुतेक वाट पाहत असणार वाटत राहिलं...
कोणी कधी पहिलं विचारायचं म्हणून,
तिला विचारायचं राहून गेलं...
व्हॅलेनटाईन आला अन गेला...
पण मित्र आम्हाचा तिला फक्त बघतच राहिला...
नव्या नात्याचं पाऊलं तर खूपदा टाकायचं होतं त्याला...
पण पहिलं पाऊल टाकायचंच राहून गेलं...
प्रेमात तर होता तिच्या पडलेला...
प्रेम माझं तुझ्यावर कसं सांगायच तिला..
एवढा एकच प्रश्न बाकी होता त्याला...
प्रश्नाचं उत्तर शोधण्यातचं बोलायचं राहून गेलं...
म्हणता म्हणता तिचा वाढदिवस आला...
मित्रांना तोर्यात पार्टी देण्यास तयार झाला...
फायनली तिला बर्थडे विश तरी करायला गेला...
तिला शुभेच्छा देत नात्यांची सुरवात करायचंच राहून गेलं...
वर्षांच पान उलटत राहिलं...
त्याचं तिला बघणंही सुरूच राहिलं...
बर्थडे विश करण्यापुढे काहीच नाही सरकलं...
मैत्रीत चालता चालता प्रेमात चालायचं राहून गेलं...
तिला बघता इंजिनियरींगही संपत आलं..
आज तिला शेवटचं पाहायचं मनात नक्की केलं..
शेवटचं भेटता भेटता बोलू मनातलं...
एकत्र आईस्क्रीम खात पुन्हा बोलायचं राहून गेलं...
असेल कदाचित तीच ही प्रेम कुणावर...
आता तसं उगीचच वाटत राहलं...
लव अॅट फस्ट साईट एकतर्फीच राहिलं...
एका हाताला दुसर्या हातानं साथं करायचंच राहून गेलं...
धाडस नाही केलं प्रत्यक्ष सांगायचं तिला..
वेळही आता निघुन गेली आता काय करायच ...
फक्त दरवेळी एवढंच म्हणत..
आपलं अफेअर करायचं राहून गेलं...
गणेश दादा शितोळे
(२३ मे २०१५)
(२३ मे २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा