आत्ताच डिप्लोमॅटच्या लग्नाला जाऊन आलो. बर्याच दिवसांनी जुने मित्र
भेटले. त्या दोन मिनिटांच्या भेटीत काॅलेजचे ते जूने एकत्रित घालवलेले दिवस
आठवले अन पुन्हा एकदा काॅलेजच्या कट्ट्यावर जावंस वाटलं. अशाच डिप्लोमॅट
सोबतच्या आठवणी जाग्या करताना लिहलेली ही कविता. ...
चंद्राच्या साक्षीने जागत होतो रात्र...
शोधत होतो आयुष्याच्या नाटकातील काही पात्र....
अन आयुष्याच्या वाटेत सापडत गेले हरवत चाललले मित्र...
मनाच्या कोपर्यात आठवणीत उरलेत तेवढेच मात्र..
होते काही कधी जीवाला जीव देणारे...
तर कधी माझ्या साठी कानाखाली खाणारे...
दुनियादारी सोबत जगणारं आयुष्य
सात दिवसं बहिरं होऊन जगणारे...
होते काही मला माझे सच्चे मित्र वाटणारे...
पण काॅलेज संपलं की संवाद संपवणारे...
आयुष्यात अर्ध्यावरच साथ सोडणारे...
मैत्रीचा एक असाही अनुभव देऊन जाणारे...
होते काही ऑनलाईन मैत्री झालेले..
स्वतःहून फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवलेले...
लपून रहाण्यासाठी इनव्हिजीबलचा आडोसा घेतलेले...
फेसबुक व्हाट्स अप पुरतेच मैत्री मानत असलेले..
होते काही नात्यांची पकड घट्ट करणारे...
खांद्यावरचा हात कायम सोबत ठेवणारे...
मित्रांच्या गर्दीतही आपलं अस्तित्व ठिकून ठेवणारे...
मैत्रीचं सामर्थ्य विश्वासानं जपणारे....
गणेश दादा शितोळे
(१२ मे २०१५)
(१२ मे २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा