नातं टिकतं विश्वासावरच...
प्रेम ही गोष्ट तितकीच सुंदर आहे फक्त प्रेम कोणावर करतो महत्वाचं असतं...इथं लोक पुढच्या क्षणी काय करतील याचा भरवसा देता येत नसेल तर आयुष्यभराची कमिटमेंट काय देणार. ...
पण नातं कोणतंही असू
मैत्रीचं की प्रेमाचं...
मैत्रीतही असते प्राॅमिस दिलेला शब्द पाळायचं बंधन...
जितकं प्रेमाचं नातं निभावून नेणे कठीण असते ना त्याहून अधिक कठीणता मैत्रीच्या नात्यात असते... फक्त मैत्रीचं नातं निभावता आलं पाहिजे....
दुर्योधनाला दिलेला शब्द कर्णाने शेवटच्या श्वासापर्यंत पाळलाच ना...
हा असतो मैत्रीतला विश्वास अन मैत्री निभावण्याची धमक....
आयुष्यात कोणतेही नाते अविश्वास व खोटेपणावर आधारलेले असेल तर ते एक तुटणारच...
पण कमिटमेंट पाळली नाही की ती खोटी असते असाही अर्थ प्रत्येकवेळी नसतो...
समोरची व्यक्ती कमिटमेंट पाळणार हा विश्वास असायलाच लागतो...
जेव्हा आपल्याला वाटते ती व्यक्ती आपल्याला दिलेली कमिटमेंट प्राॅमिस विसरलीए तेव्हा एक तर नक्कीच आहे की मग त्या व्यक्तीवर विश्वास उरला नाही..
जर नात्यात विश्वास नसेल तर मुळात टिकणारच कसे..
मग विरहाच्या दु:खात रडून काय फायदा...
जसं आपण प्रेम करणारी व्यक्ती कमिटमेंट न पाळता सोडून गेली की दु:ख होतंच...
आपण मैत्रीचं नातं निभावत असणारी व्यक्ती सोडून केली की त्याचं दुःख निश्चित अधिक आहे....
या दोन्ही नात्यात समोरची व्यक्ती सोडून जाण्याची कारणंही तशीच आहेत...
प्रेमात व्यक्ती सोडून जाते असं वाटणं अन असणं म्हणजे हा असतो अविश्वास....
मैत्रीत व्यक्ती सोडून जाणं म्हणजे असतो विश्वासघात...
समानार्थी शब्द असतील पण दोन नात्यांकरता वेगळा अर्थ देऊन जातात...
गरज पडली म्हणून नाती नक्कीच जोडू नका...
कारण गरज संपली की त्या नात्यांची किम्मत उरत नाही....
नातं कोणतंही जोडा...
पण विश्वास अन समजुतदारपणानंच...
असं काहीच नसतं की प्रेमात शब्द प्राॅमिस कमिटमेंट पाळणं असतं अन मैत्रीत ते तसं नसतं..
शब्द प्राॅमिस कमिटमेंट पाळणं हे प्रत्येक नात्यात असतं...
जसं एखाद्याकडून अपेक्षा करण्याचा हक्क नातं देतं तसंच आपल्या कडून असणार्या अपेक्षा पुर्ण करण्याचं कर्तव्यही देतं...
कोणत्याही नात्याची सुरवात मैत्रीच्या नात्यापासून करा...
कारण मैत्रीच्या नात्यातून सर्व नात्यांकडे जाणारे रस्ते आहेत...
मैत्री एकमेव असं नातं आहे जे हक्क व कर्तव्य दोन्ही पुर्ण करून घेतं...
फक्त त्याची जाणीव आपल्याला झाली की आपण पुढच्या नात्यांच्या घराचा उंबरा ओलांडलेला असतो...
निखळ मैत्रीच्या प्रवासाला सुरवात करा...
आयुष्यात सगळी नाती पायाशी लोळण घेतील...
नात्यात विश्वास ठेवा नाती सुंदर बनून जातील...
अविश्वास अन विश्वासघाताची जखम फक्त खोलवर आघात करते...
शेवटी हेच खरं की...
काळजात खोल खोल दुःख झरे,
पापणीची ओल वाहून नेई सारे,
कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा,
हवा हवा जुना दुवा नव्याने सांधा,
नशिबाला लावून बोल काय उरे....
गणेश दादा शितोळे
(१५ मे २०१५)
(१५ मे २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा