माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ८ मे, २०१५

आरक्षण

मुळात आरक्षण का निर्माण करण्यात आले याची पार्श्वभुमी तपासायला हवी.
जातीला जन्माला घालण्या इतकेच ती कट्टरतेने पाळणारेही आरक्षण निर्माण करण्यासाठी तितकेच दोषी आहेत.
साठ वर्षे झाली आरक्षण निर्माण केले. की ज्याद्वारे समाजातील मागस, दलित आणि वंचित घटकांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये जातीच्या आधारावर आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला दहा वर्षांनी आरक्षणाचा लाभ आणि मुल्यांकन करण्यात येऊन ते पुढे पुढे वाढण्याचा निर्णय घेतला जाणार होता. झालेही तसेच. परंतु आरक्षणाचा सुरवातीला तितकासा लाभ घेतला गेला नाही. कारण त्यावेळी आरक्षण असणारा वर्ग शिक्षण आणि नोकरी याबाबतीत अनभिज्ञच होता. परिणामी आरक्षण वाढवण्याचा निर्णय झाला. पुढे हळुहळु जाणीव वाढत गेल्याने आरक्षणाचा लाभ वाढला. परिणामी उपलब्ध शिक्षण आणि नोकरीच्या कोठ्यात आरक्षणाची गरज प्रत्येक वर्गाला वाटू लागली. परंतु जवळपास आठशे वर्षे या आत्ता आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या वर्गावर इतर वर्गाने केलेले खच्चीकरण याकडे मात्र जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे फक्त साठ वर्षे सोसलं तरी एवढा जळफळाट का हे न उमजणारे आहे. आपल्या पूर्वजांच्या चूका भोगायला पितुरपाठ करण्यापलिकडे हे वास्तव मान्य केले पाहिजे. 
ही एक बाजू लक्षात घेऊनच

मुळात आरक्षणाकरता जात यामधूनही जातीयवादाला खतपाणी मिळाले हेही खरे आहे. आंबेडकरांनी आरक्षण हे जाती निर्माण करून झालेल्या वर्गांमधे समतोल करण्याकरता तयार केले होते. परंतु त्याचाही या जातीला खतपाणी घालघालणाऱ्या लोकांनी चुकीचा वापर करून हा समतोल करण्याऐवजी अजूनच वाढवला. परिणामी आजही समाज जातीला गोचीडासारखाच चिकटला आहे. 

आरक्षणाचा हट्ट धरणारेही
आणि ज्यांना दुसर्‍याला आरक्षण मिळते म्हणून जळणारेही...
जाती धर्मासारख्या फालतु गोष्टीचा गर्व बाळगून सोडायला तयार होत नाहीत. 
राहिला प्रश्न सैराट चित्रपटाचा तर चित्रपटात जातीपलिकडे जाऊन विचार करायला लावणारी गोष्ट मांडण्यात आली आहे. आरक्षणाची कोणतीही भूमिका मांडण्यात आली नाही. उगाच कोणत्याही वादात ओढण्याचा प्रयत्न करून उपयोग नाही. आपली दृष्टी आणि दृष्टीकोन बदलला की तात्पर्य आणि सारांश दोन्ही लक्षात येते. 

याच जातीधर्माला चिकटून रहाणार्‍या लोकांना राजन खान यांनी आयबीएन लोकमत वरील कार्यक्रमात दिलेले उत्तर अगदी समर्पक आहे. 

काय
घेऊन बसलात जातीचं..?
धर्माच..?
मी ब्राह्मण, मी मराठा,
मी हिंदू, मी मुसलमान
काय आहे या जाती धर्माचं बिरुद....
सिद्ध करून दाखवता का अमुक जातीचा आहे धर्माचा आहे...
शेवटी सगळे तोंडाने खाता आणि बुडानंच हागता ना. .?
की मी अमुक जातीचा धर्माचा म्हणून काही उलटं करता..?

शेवटी इतकंच...
जात सोडा...
धर्म सोडा...
माणसाला माणूस म्हणूनच बघा...
आपली केवळ एक ओळख....

धर्मनिरपेक्ष भारताचा नागरीक. ..

 मी भारतीय...

गणेशदादा शितोळे
(८ मे २०१६)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा