✍✍✍ फ्लेक्स आणि विद्रूपीकरण ✍✍✍
राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एक वाक्य कायम असते
आमचे मार्गदर्शक अमुक अमुक....
प्रश्न पडतो की या राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेमके काय मार्गदर्शन केलेले असते..?
निवडणुकीला पैसे कसे वाटायचे...?
गावपातळीवर समोरच्याशी भांडणं कशी करायची...?
पातळी सोडून आरोप कसे करायचे..?
लोकांच्या पैशावर कसा डल्ला मारायचा...?
शासकीय मालमत्तेची तोडफोड कशी करायची...?
मतदारांची पळवापळवी कशी करायची...?
लोकांना थापा कशा मारायच्या...?
अशी भरपूर मोठी यादी असावी बहुतेक म्हणूनच मोठ मोठ्या फ्लेक्स द्ववारे विद्रूपीकरण करत
मार्गदर्शक झळकत असतात....
गणेशदादा शितोळे
(३१ ऑक्टोबर २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा