माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

एक वेडी मैत्रीण...!!!



ती आहे एक वेडी मैत्रीण,
माझ्यावर कविता कर कर म्हणणारी...
पण तिच एक कविता आहे,
कधीही समजूच न शकणारी..

ती आहे एक सोशल नेटवर्किंग साईट,
कायम ऑनलाईन राहत टचमधे रहाणारी...
निवडक माणसांशी चॅटिंग करत,
दुसर्‍यांना कायम बिझी दाखवणारी...

ती आहे एक अल्लड मैत्रीण,
जराशी लाजरी अन नाजूक हसणारी...
तिचं हसूच एक स्मित आहे,
जणू किंचितशा गालावरच्या खळीत सामावणारी...

ती आहे एक कुरमुजलेलं मैत्रीच पानं,
आठवणींच्या वहीत जपून राहणारी...
मैत्र परिवारात असते इतकी मग्न,
जणू भेटलेल्या कित्येकांच्या मनात घर करणारी...

ती आहे एक वेगळ्याच स्वभावाची  मैत्रीण,
प्रत्येकाशी मोकळेपणाने वागणारी...
हीच तर खरी तिची ओळख आहे
जणू नावाप्रमानेच सगळ्यांशी स्नेह ठेवणारी...







गणेश दादा शितोळे
(७ ऑक्टोबर २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा