माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

बुधवार, १८ मे, २०१६

मानसिकता...!!!

                 नरेंद्र दाभोलकर उमजले असते तर भारतात असहिष्णुता/कट्टरतावाद/ जातीयवादाचं वारं कधीच आलं नसतं...
कदाचित सैराट सारखा चित्रपट आवश्यक पडला नसता...
पण लोकांची मानसिकता बदलायला तयार होत नाही.
                                    जन्माला आल्यापासून अंधश्रद्धा/चमत्कार याच्या गोष्टी पुराणांच्यासोबत  माणसाला विभागल्या जाणार्‍या धर्म, जात, पंथ, प्रांत, प्रदेश अशा विचारांचा मनावर बलात्कार ( बळजबरी लादले जातात) केला जातो. परिणामी माणसाच्या डोळ्यावर मग याच विचारसरणीचे पदर उबे रहातात आणि त्यात पदराचा एक जाड चष्मा तयार होता. त्या चष्म्यातून समोरचा माणूस हा माणूस म्हणून दिसतंच नाही. माणूस म्हणून दिसण्याअगोदर जात धर्म, पंथ, प्रांत या नजरेने पाहिले जाते.
                                   नुकतेच एक प्रकरण गाजत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीच्या कॉल हिस्ट्री मधे एकनाथ खडसे यांचा नंबर नाव पुढे आला. पण त्यावर काय चौकशी सुरू आहे ते बाजूला ठेवू. पण त्याऐवजी अमीर खान, शाहरूख खान यांचे नंबर मिळाले असते तर आजपर्यंत त्यांना दहशतवादी ठरवून निम्मी भारतीय जनता मोकळा झाला असती.
                              ही लोकांची मानसिकता आहे. कारण इथे अमीर खान, शाहरुख खान आणि दाऊद इब्राहिम यांचा धर्म एक आहे. एवढ्या एका नजरेनेच पाहिले की बासं देशद्रोहाचे सर्टिफिकेट देऊन मोकळे होतात..                              लोकांची ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. पण लोक हे लक्षात घेत नाहीत. आजही असे अनेक दाभोळकर आज अंधश्रद्धेसोबत जातीयवाद निर्मुलनाचेही प्रयत्न करत आहेत.




गणेश दादा शितोळे
(१७ मे २०१६)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा