बदलला नाही रंग माणूसकीचा...!!!
जन्माला आलो की मिळतात काही अनाहूत लेबलं,
अमक्या जातीचा अन तमक्या धर्माचा.
कळतं तर नसतं तेव्हा काहीही तरी पण,
रोवला जातो विचारच एकमेकांच्या द्वेषाचा...
कळू लागले जरासं बरं काही की,
वाटून घेता प्रत्येक भाग निसर्गाचा...
निळं आभाळ, तांबडा सुर्य अन हिरवा निसर्ग,
सगळा खेळ जळमटांच्या रंगाचा...
यातूनही एक मात्र नक्की आहे,
जातीधर्माच्या जळमटांनी केला थयथयाट तरी...
बदलले नाही रक्त अन,
बदलला नाही रंग माणुसकीचा...
अमक्या जातीचा अन तमक्या धर्माचा.
कळतं तर नसतं तेव्हा काहीही तरी पण,
रोवला जातो विचारच एकमेकांच्या द्वेषाचा...
कळू लागले जरासं बरं काही की,
वाटून घेता प्रत्येक भाग निसर्गाचा...
निळं आभाळ, तांबडा सुर्य अन हिरवा निसर्ग,
सगळा खेळ जळमटांच्या रंगाचा...
यातूनही एक मात्र नक्की आहे,
जातीधर्माच्या जळमटांनी केला थयथयाट तरी...
बदलले नाही रक्त अन,
बदलला नाही रंग माणुसकीचा...
गणेश दादा शितोळे
(२४ मे २०१६)
(२४ मे २०१६)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा