माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८


मनपूर्वक आभार....!!!

                               काल वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी भरून पावलो. आपल्या साथीने आयुष्याचा हा प्रवास असाच घडत राहील याची खात्री आहेच. अनेकांनी शुभेच्छांच्या माध्यमातून आशा अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेलच. ज्यांनी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे कोडकौतुके समजावून सांगत त्यांच्यासारखाच हाफ चड्डीतून फुलपॅण्टीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्यांचेही आभार. तुमच्या असल्या प्रयत्नांनी आम्हाला स्फुरण येतेच. या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला मुदी मुक्त भारत, थापा मुक्त भारत, भाजप मुक्त भारत या संकल्पापूर्तीकरता पुर्णपणे प्रयत्न केला जाईलच. लवकरंच राजकीय वाटचालीच्या दृष्टीने पावलं पडतीलंच. तसेच आमच्या संकल्पाने उकळ्या फुटलेल्या इतर राजकीय पक्षांच्या मित्रांनादेखील यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. अन भाजप मुक्त भारत म्हणजे तुमच्या इतर पक्षाला समर्थन या भाबडापणात बिलकुल राहू नका.
                                 एस ए पी तसं आपलंसं नसलेलंच क्षेत्र होतं अन आहे. मागच्या वर्षभरात त्याबद्दल आवड निर्माण झाली नाही अन भविष्यात पण होणार नाही याकडं निश्चितच लक्ष देऊन वाटचाल सुरू राहील. आयुष्याच्या महत्वपूर्ण टप्प्यात या न आवडणार्‍या क्षेत्राचा निरोप घेऊन आपल्या आवडीच्या साहित्य अन राजकारण केले क्षेत्रात पुर्णपणे झोकून देण्यासाठी येणारं वर्ष महत्वपूर्ण राहील. जूनी अपूर्ण राहिलेली पुस्तकांपैकी काही पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेळ देण्याचाही प्रयत्न केला जाईल याची खात्री देतो. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला पहिले पुस्तक पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. काल अनेकांच्या शुभेच्छांमधील महत्त्वाची असणारी ही बाब मनावर घेण्याची जबाबदारी स्विकारत आहे. 
                            सोशल नेटवर्किंग साइट्स वर पदार्पण करून दशकपूर्ती झाली. दरम्यान अनेक मित्र परिवार तयार झाला. सोशल नेटवर्किंग साईट वर प्रतिसाद देणार्‍या या मित्रपरिवाराचेही सर्वांचे मनापासून आभार. आपल्याला अपेक्षित सरकारच्या कुचकामी धोरणांविषयी अन फसवेगिरी विषयी इथून मागेही स्पष्ट शब्दात व्यक्त झालोय अन इथून पुढेही होणार हे नक्की. तसेच इतरंही जे जे पटणार नाही त्याविरोधात लिहीणार. त्या मुळे वेळ पडलीच तर आप्तस्वकीयांच्या विरोधातही उभे रहावे लागले तरीही पर्वा नाही. राजकीय मतभेद ठेवून वादविवादातून आपली मतं मांडणाऱ्या मित्रमंडळीचं स्वागत होतं, आहे अन राहील.
                              वैयक्तीक पातळीवर धर्म, जात, पात, देव, अंधश्रद्धा या कशाचाही माझ्याशी संबंध नाही. या संदर्भात जे जे चूकीचं आहेत त्यावर कोरडे वाढणारंच. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश असे बळी घेतले म्हणून आमचा आवाज थांबणार नाही हे निश्चित. उलट या मंडळींचे विचार अजूनच स्फुरण देत रहातील. अन तशीही मरणाला निधड्या छातीने सामोरं जाण्याची तयारी ठेवूनंच जगण्याचा प्रयत्न आहे. नव्हे तीच विचारसरणी आहे. भारत या राष्ट्रात रहातो, भारतीय आहोत अन संविधान मानतो. बाकी इतर ओळख बाळगण्याची आवश्यकता नाही. आमच्या सोशल नेटवर्किंग साईट वर पोलीस मित्रांसह अनेक हितचिंतक आमच्या पेक्षा जास्त लक्ष केंद्रित करून असतात त्यामुळे चिंता करणे आम्ही केव्हाच सोडून दिले आहे. 
                           या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेम, आपुलकी, जिव्हाळा याबद्दल मनापासून ऋणी आहे. आपल्याला येणारा प्रत्येक क्षण आनंद देत राहील याची खात्री आहे. देशविघातक अन कट्टरवादी विचारांविरोधात शांत संयमी अन सर्वसमावेशक भारताच्या प्रगतीकरता आपण सगळे मिळून प्रयत्नशील राहू. जाती, धर्म, पंथ, प्रांत असे वाद निर्माण करणारी जळमटं अन गुलामगिरींची जोखाडं जुगारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधानाला अभिप्रेत अन ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी एक होऊ. सर्वांचे मनापासून आभार.


गणेश सुवर्णा तुकाराम
०९ सप्टेंबर २०१८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा