माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८



भेट
लवकरंच आपली भेट होईल...
एका अनोळखी व्यक्तीची
दुसर्‍या अनोळखी व्यक्तीशी....

हो कारण तसे आपण दोघंही
एकमेकांना अनोळखींच...
असं अनोळखी असलं तरी पण
हे दिव्य करावं तर लागेलच....

नुसतं भेटायचं म्हटलं आणि
क्षणभर मला असं वाटून गेलं की
आपली मैत्री होऊ शकेल कदाचित.
का ते माहिती नाही....

माझ्या आवडत्या छंदाबद्दल,
गोष्टींबद्दल मी नंतर भेटल्यावर सांगेनच...
का ते मला माहित नाही पण
आपल्या मध्ये काहीतरी साम्य आहे
असे मनातल्या मनात मला वाटत राहते....

तुझ्यारुपाने खूप जवळचा पण
अजूनही अनोळखी असल्याने
लांब असलेला आनंदयात्री मिळाला आहे मला....

तुला कितीतरी गोष्टी सांगाव्याश्या वाटतात...
पण ते एका भेटीत होईल वाटत नाही....
तरीही कधी आपली भेट होईल
असे मला सारखे वाटत राहतेय....

माझ्यासाठी हा शब्दांचा समुद्र म्हणजे
विलक्षण काही नाही आहे...
कारण ते मला रोजचेच आहे.
उलट तो माझ्या आयुष्याचा एक
खूप महत्वाचा भाग आहे....



गणेश सुवर्णा तुकाराम
२९ सप्टेंबर २०१८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा