विश्वासाला कीड...!!!
आयुष्याच्या
प्रवासात अवचित काही माणसं भेटतात. अगदी सहज प्रेमाचा, मैत्रीचा
एक बंध निर्माण होतो. काही वेळेस हि माणसं जितकं लवकर जुळवून घेतात तितकंच लवकर
त्यांना निरोप ही द्यावा लागतो. मनात नसूनही निरोपाची वेळ फार लवकर येते कधी कधी.
असंच काहीसं.
नात्यांमधे
अविश्वास तयार व्हायला लागला की वेळीच सावध व्हायला लागते. अविश्वासावर आधारित
नाती तशीच रेटत घेऊन जाण्यात काही अर्थ उरत नाही. वेळीच सावध होत अशा नात्यांच्या
बंधनातून मुक्त झाले अन समोरच्या व्यक्तीला केले तर निश्चितच फायदा होतो.
सहा
वर्षे झाली आमची ओळख होऊन. मित्र कसे झालो माहिती नाही. एकत्र येऊन धमाल केली. महाविद्यालयीन
जीवन मनमुरादपणे जगलो. शिक्षण संपलं. नव्या नव्या वाटेने प्रत्येक जण आपापल्या
क्षेत्रात निघून गेला. एकत्रित असलेला प्रवास एकटा उरला. तरीही मैत्री तशीच एकसंध
होती.
आयुष्याच्या
उंबरठ्यावर नवीन पाऊल टाकत एकेकाचे विवाह सोहळे पार पडायला सुरुवात झाली. कुणी
बॅचलर पार्टी दिली. कुणाच्या नुसत्याच गप्पा झाल्या. कुणी नुसतेच पार्टीला जेवायला
उपस्थित राहिले. कुणी लग्न अन पार्टीला यायचेच टाळले. पार्टीतर उपस्थिती ठरवूनही
कुणी सरड्यापेक्षाही पटकन रंग बदलून गेले. विवाह सोहळा आनंदाने पार पडला. उत्साहाने
सहभागी झाले. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक मतभेदाची पातळी ओलांडून अविश्वासाची
पातळी सुरू व्हायला सुरुवात झाली. वाद झाले. विवाद झडले. जोपर्यंत मतभेदापर्यंत
होते तोपर्यंतच विश्वासाचे नाते उरले. अन शेवटी झालाच कडलोट.
मैत्रीत
व्यवहार उभा केला अन गमावून बसलो सगळंच. पण मैत्री या नात्यावरंच प्रश्नचिन्ह उभा
राहिले अन संपला प्रवास तिथेच संपला. क्षणभरात सहा वर्षे जपलेल्या नात्यांची गाठ
चटदिशी सुटली. नात्यांमधले बंध विलग व्हावेत तशी माणसे विभागली गेली. आज ह्रदयाजवळची
माणसे कायमची सोडून दिली याचं किंचित दुःख असलं तरी आनंदही आहेच. सहनशीलतेचा कडलोट
झाला की केवळ अशक्यच. अविश्वासाला जागा नाहीच. खरंतर तेव्हा अपेक्षित होतं मनातल्या
व्यक्तीनेही कधीकाही मनातले बोलणे ऐकावे.
नात्यांमधे
विश्वासाला कीड लागली ना नाती डळमळीत होतात. इतकी डळमळीत की क्षणभराचाही अविश्वास
हा वर्षानुवर्षाची घट्ट ओल नाहीशी करून नाती कोसळतात. सहा वर्षांची मैत्री क्षणात
संपली. एकदा कोसळलेली नाती पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा रूजत नाहीतंच.
अनेकदा विचार
केला. अनेकदा वाटलं. चूका होतात, गैरसमज असतात आणि ते हळूहळू
दूर होतात. गेले अनेक दिवस वाट पाहिली, वेळ जाऊ दिला. शेवटी
व्हायचा तोच कडेलोट झाला अन वीज कोसळवी
तशी नाती कोसळलीच. सहा वर्षांची मैत्री क्षणात संपली. खरंतर हा काळ जितका सुखद
तितकाच अविस्मरणीय अनुभव देणाराही होता.
धन्यवाद
भोईटे रेसिडन्सी मित्रमंडळ. विशेषतः आभारी आहे. आयटीसेल मधे भरतीच्या पात्रतेचे
झाल्याबद्दलही अभिनंदन. अन तसंही आपलं आयटीसेलशी पटण्याचा दूर दूर प्रयत्न नाही. सुटलेले
सोडून देत आपण चालत रहायचं. आयुष्य कुणासाठी थांबत नाही.
गणेशदादा शितोळे
(१९ जूलै २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा