दोन शब्द आपल्या माणसांसाठी...!!!
मनातल्या मनात कुढंत राहिलं की,
मनामनाला दुरावा वाढतच जातो...
मनाचा मनाशीच होणारा संवाद थांबला की,
आपणच आपल्याला त्रास देत रहातो...
आपण काय आहोत असतं आपल्याही माहित,
पण दुसऱ्याचं सांगण्यावरून ते आपण ठरवत
जातो...
जगात कोण कसं आहे काय आहे बघताना,
आपण स्वत:लाच ओळखायला राहून जातो...
आपणंच आहोत आपली ती हक्काची माणसं,
ज्यांच्यासोबत आपण मनातलं बोलत असतो...
बोलताना संवादाचे वाद झाले तरी,
नात्यातले प्रेम आपण वाढवत जातो...
कधी
झोंबणाऱ्या खोचक शब्दांचाही,
मनाला खोलवर खूप राग जाणवत असतो,
धरला काहीकाळ आपण अबोला तरी,
परत नात्यात आपण पहिल्यासारखं रहातो...
आपलीच माणसं असतात ती हक्काची,
तोच प्रत्येकजण आपलं मन समजावून घेत असतो...
मानत असू आपली माणसं त्यांना तर विचार करावा
एकदा,
थोड्याफार रागाने गमवावत तर ना नसतो...
सुधारत जायचं नातं तुटण्याआधी,
सांभाळायचं कसं आपलं आपण ठरवत असतो...
तुटली जावीत नाती वाटत नसतं कोणाला,
पण सुधरावेत संबंध प्रयत्न आपण करायचा असतो...
राग धरून मनात संपवला संवाद आपल्याच माणसांशीच
तर,
कुढत्या अबोल्याने गैरसमज वाढतच जातो...
मग आपल्याच माणसांचही नेमके तेच ऐकू येतं,
जे आपण कधी बोललेलोच नसतो...
मित्र म्हणून तुला सांगण्यासाठी,
एव्हढेंच दोन शब्द लिहीत होतो...
मनावर घ्यायचं का सोडून द्यायचं,
निर्णय हा मी तुझ्यावरच सोडून देतो...
गणेशदादा शितोळे
(१५ जूलै २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा