माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

मला भेटलेला आनंदयात्री - जितेंद्र जोशी



प्रिय जितेंद्र,

                 आज तुझा वाढदिवस. अनेक दिवस वाटत होतं. तुझ्यावर भरभरून लिहावं. पण जमलंच नाही. काकाण असो की दुनियादारी असो की व्हेंटीलेटर असो. तुझ्या भूमिका आवडल्या नव्हे तर मीच त्या भूमिकेतून जगतोय वाटलं.

                 आजवर तुझे अनेक चित्रपट पाहिले अन मनापासून आवडलेही. तू प्रत्येकवेळी विविधअंगी भूमिका साकारल्या. तुला पहिल्यांदा पाहिलं ते हंबरून वासराले ही कविता सादर करताना झी मराठीवर. त्यानंतर शाळा ह्या चित्रपटात. नारूमामा. प्रत्येक भाच्याला तुझ्यासारखा मामा असावा ही सुप्त इच्छा माझी तेव्हापासूनच मनात यायला सुरू झाली. 



नंतर तुझी तुकाराम महाराजांची भूमिका पाहिली अन जाणवलं महाराजांच्या भूमिकेला तुझ्या इतका न्याय कुणीच देऊ शकणार नव्हतं. 



कुटुंब मधील बाप साकारणारा नक्की तूच आहे का असा प्रश्न कधीच पडला नाही. भल्या मनाचा राजा आजही ऐकतो. तू साकारलेला बाप ही प्रत्येक बापाची कथा आहे. आजवर नेहमीच बाप ह्या व्यक्तिरेखेवर अन्याय झाला आहे. पण तू त्यालाही न्याय दिला. बापाची व्यथा तू मांडली आणि ती मनाला भिडली देखील. 


                 सुहास शिरवळकरांच दुनियादारीच पारयण मी दोन चार वेळा केलंच होतं. त्यामुळे दुनियादारी पहाताना विशेष ओढ होती. तू साई सारखा खलनायक इतक्या सहजतेने साकरला जितक्या सहजतेने तुझा पाहुणे पाहुणे हा संवाद लक्षात राहिला.मी पुस्तक वाचताना मनात साई जसा चितारला होता त्याच्या कितीतरी वेगळा तू चित्रपट दिसला. सुशिंची पुस्तकातील संवादफेकंच इतकी सुंदर होती की चित्रपटातील संवाद म्हणजे उत्तमच होते.  सुशिंच्या पुस्तकातला दुनियादारीचा शेवट झाला नाही याचं आजही वाईट वाटतं.



                 तुझा बाजी आवडला नाही, पण काकण सारखा वेगळ्या ढंगाचा चित्पट रूचला. खरंतर तू काकणमधून जे मांडलं त्याच मकताचा मीही आहे. पण मला नाही कळत प्रेमातला वेडपणा, पण मला प्रेम जपायला आवडतं ह्या पोस्टरवरच्या एका वाक्याकरता मी चित्रपट पाहिला. जिवंत अभिनय केलाय रे तू आणि उर्मिला दोघांनी. या चिञपटाचं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. निर्मळ प्रेम,निस्वार्थ प्रेम,निखळप्रेम,जपलेलं प्रेम,जगलेलं प्रेम,जाणवलेलं प्रेम,जागवलेलं प्रेम,जगवलेलं प्रेम,हरवलेलं प्रेम,आठवलेलं प्रेम,मनाच्या कोंदनात,आत खोलवरच्या कप्प्यात साठवलेलं प्रेम,खरं प्रेम म्हणजे दोन शब्दात बलायचं तर काकण प्रेम.



                 पोस्टरगर्लमधला भारतराव झेंडेही बरा होता. व्हेंटीलेटर मधला प्रसन्ना सर्वात जास्त आवडला. कारण खऱ्या आयुष्यातला मी बरोबर असाच होतो. माझे डोळे उगडणारा चित्रपट म्हणजे व्हेंटीलेटर. खऱ्या अर्थाने व्हेटीलेटरवरून श्वास घ्यायला शिकवलं ह्या चित्रपटाने. वर्षभरापूर्वी मीही असाच महिनाभर आजोबांच्या दवाखान्यानिमित्ताने हे सगळं अनुभवलं आहे. १ टक्केही आशा दिसत नसली तरी माणसाने आशा सोडता कामा नये.




                 शिवाजा महाराज ह्या व्यक्तिमत्वावर कुणी प्रेम करत नाही. रक्ताला शहारेच येतात. आणि अशा महारांजाच्या गडकिल्ल्यावर हेमंत ढोमेचा चित्रपट येतोय म्हटल्यावर बघायचाच निश्चित होतं. सिंहगडावरच्या कार्यक्रमातल्या तुझ्या भावना माझ्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. नानासाहेब देशमुख उत्तम होता. नवी खोटी स्मारकं उभारण्यापेक्षा गडकिल्ल्यांसारखी महाराजांची जीवंत स्मारके संवर्धित करण्याच्या भूमिका लोकांना समजायला जड जाईल कारण पुतळ्यांच्या अन स्मारकांच्या नावाखाली राजकारणाच्या पोळ्या भाजता येतात. पण बघतोस काय मुजरा कर ने महाराजांनाच नाही तर  गडकोटांना मुजरा करायला लावले. 


                 येणाऱ्या वाढत्या आयुष्यासोबत तुझ्याकडून असेच उत्तम भूमिकांचे चित्रपट येतील ही अपेक्षा आहेच.





आज खंरतर आजवर तू साकारलेल्या भूमिकातून जे काही दिलं त्याबद्दल मनापासून आभार आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो तुझं लिखाण वाचायचंय...




गणेशदादा शितोळे
(२७ जानेवारी २०१८)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा