एका संध्याकाळी मग्न तळ्याकाठी....
रोजच्या कटकटीच्या
जगण्याचा,
द्यावा राजीनामा
आयुष्याकडे....
अन भोवतालंच सर्व विसरून
जाऊन बसावे
एका संध्याकाळी मग्न
तळ्याकाठी....
जावं आयुष्यातला थोडा
वेळ काढून
एका संध्याकाळी मग्न
तळ्याकाठी...
मनाला तृप्त करणारा
एक निवांत मोकळा श्वास घेण्यासाठी....
मावळतीला झुकलेला सूर्य
डुंबताना पहात
हरवलेले आयुष्य
शोधण्यासाठी...
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
संथ पाण्यातलं प्रतिबिंब
पाहून
थोडा आयुष्याचा हिशोब
करण्यासाठी...
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
शहारणारी थंडगार हवा
चाटून जाईल अंगाला
मनालाच जणू हुडहुडी
भरण्यासाठी....
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
शेकोटी पेटवून उसळत्या
ज्वाळांना बघत
आपलंच आपण आपल्यातंच
हरवून जाण्यासाठी....
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
जाईल नकळतपणे एक ठिणगी
वेध घेत
आठवणींना जाग्या
करण्यासाठी...
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
कललेली मान हळूवार
खांद्यावर सरकलेली
हातामध्ये आपलाच हात
आपणंच घेण्यासाठी....
एक संध्याकाळी निवांत
वेळी
जावून बसावं मग्न
तळ्याकाठी...
गणेशदादा शितोळे
(०७ जानेवारी २०१८)
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा