लिहीणार्या हातांमधे...!!!
लिहीणार्या हातांमधे,
बळ असतं विचारांचं....
समोरच्याच्या मनामधे,
पडणार्या ठिणगीचं...
तेवत रहाते मशाल,
जळण असतं शब्दांचं...
विझण्याची नसते चिंता,
मन जडलेले असतं वार्याचं...
उसळत असतो डोंब,
ठिणगीनं मन जळत वाचणाराचं...
रागावतं, कावतं अन हसतं,
मनातल्या मनात स्वतःचं...
अन येते अचानक कुठून नेम हुकलेली गोळी,
लक्ष भेदतं लेखकाच्या काळजाचं...
लेखक मरतो पण विचार तसाच रहातो,
मोल कळत नसतं त्याला फोफावणार्या शब्दांचं...
गणेशदादा शितोळे
(११ नोव्हेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा