माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

राजन खान यांचे काही विचार...!!!

                    मला राजन खान यांचे विचार पटतात नव्हे त्याने प्रभावित आहे असं म्हटलं तरी चालेल. आता त्यांचं खान अडनाव पाहून अनेकांच्या मनातील धार्मिक पिलावळ जागी होईल. पण मला त्याचा फरक पडत नाही. त्या माणसाची जात कोणती,  धर्म कोणता यापेक्षा त्या माणसाचे विचार कसे आहेत यावरून तो माणूस मला माझा वाटतो. कारण राजन खान या व्यक्तीला मी प्रत्यक्षात कधीही भेटलो नाही तरी त्या माणसाला विचारांनी अनेकदा भेटलो. विचारांशी समरूप झालो. म्हणूनच राजन खान यांचे हे काही विचार मला प्रभावित करून गेले.

भारतीयांच्या मनातून जात, धर्म, पंथ, वर्ण या माणसात भेद करणारे विचार ज्यावेळी निघून जातील अन एकसंध भारत खर्‍या अर्थाने #स्वच्छ_भारत होईल...
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................
मी सर्वच जातींच्या विरोधात आहे, मी सर्वच धर्मांच्या विरोधात आहे, मी माणसांमधल्या सर्वच भेदांच्या विरोधात आहे, पण माणसांच्या विरोधात अजिबात नाही, अजिबातच नाही.
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................

जातीधर्माच्या विचारांनी माणसाच्या मनावर इतका बलात्कार केला आहे की,
शरीरात जिवंतपणा तर आहे.
मात्र माणूसपणा निघून गेलाय....
.............................................................................................................................
                    .............................................................................................................................

फॅशनचा ट्रेण्ड आणि कपड्यांचा ब्रॅण्ड बदलण्यापेक्षा
विचारांचा ब्रॅण्ड आणि जगण्याचा ट्रेण्ड बदलून बघा.
आयुष्य सुंदर होतं आणि आहे.

गणेश दादा शितोळे
(२० एप्रिल २०१७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा