मितवा...!!!
त्याच्या बद्दल काय लिहायचं आणि काय राखून ठेवायचं हा खरं तर प्रश्नच आहे. एकदम मितवा व्यक्तीमत्व.
कॉलेजमधील अभ्यासाव्यतिरिक्त कार्यक्रमात शिक्षकांच्या पुढे पुढे करणारा तोच कॉलेजबाहेर कट्ट्यावर मित्रांच्यात बसणारा मित्र.
स्वतः कोणत्याही वादात न पडता मित्रांनाही वादात न पडण्याचे तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ.
अनेक मित्रांना मैत्रीतून प्रेमाची वाट दाखवणारा वाटाड्या.
स्वतःच नाव अनेक जणींशी जोडण्याची मित्रांना संधी देणाऱ्या आमचा मित्र चि. रोहित ननावरे उर्फ मित्र परिवारात लोकप्रिय गोट्या याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
या आमच्या मित्राला लवकरच चिरंजीव वरून श्री म्हणण्याची संधी मिळावी हीच सदिच्छा. बघू दोन दिवसांनी येणार्या यावर्षीच्या व्हॅलेंटाईनला तरी मित्रांनी नाव जोडलेल्या एखादीशी बोलतोय का ते...
की नवीनच नाव ऐकायला मिळतंय.
 |
| (आकाशात झेप घेती पाखरे....( |
 |
| (भावाची एकच नजर बास भो.....) |
 |
| (दौण्डच्या उड्डाणपुलावर रोहितभाऊंनी घेतलेली एक सेल्फी...) |
 |
| (शिवराज्याभिषेकसोहळ्यात छत्रपती संभाजीराजांसह रोहीत भाऊ आणि श्रीकांत नागवडे पाटील) |
गणेश दादा शितोळे
(१२ फेब्रुवारी २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा