महेशचा साखरपुडा
खुप दिवसांनी जूने मित्र भेटणार म्हटलं की काल रात्री मनाला एकदम तरूण
झाल्यासारखं वाटलं. म्हणजे मन म्हातारं झालं आहे असं नाही. फक्त रोजच्या
धकाधकीच्या आयुष्यातील, कामाच्या धावपळीनं विटलेलं मन जूने मित्र भेटणार हे
मनातल्या मनात अनुभवताना एकदम ताजेतवाणं झाल्यासारखं वाटत होतं. अगदी काल
रात्री उशिरा पर्यंत आज हा सगळा जूना मित्र परिवार आणि त्यांच्या सोबत
जगलेलं एक विलक्षण आनंद देणारं आयुष्य आठवून कधी झोप लागली कळलंच नाही.
सकाळी सकाळी आकुर्डीच्या सिग्नलवर महेश(मामा) भेटला तेव्हा तो क्षण आमचा इंजिनिअरींगचा चार वर्षांचा प्रवास झपकन डोळ्यासमोर तरळून गेला. एकेक करत सगळे महेशच्या साखरपुड्याला निघाले तसंतसे माझ्या मनात या येणार्या प्रत्येकासोबतच्या आठवणींना पुन्हा पुन्हा आठवत होतो.
गाडी मजल दर मजल करत उल्हासनगरला पोहचण्यापर्यंत रखडलेल्या पण नव्याने लिहायला घेतलेल्या पुस्तकाबाबतीत काय काय विचारायचं हे चालूच होतं. सोबत विकास, राम आणि महेश (मामा) सोबत गप्पा सुरूच होत्या. एकमेकांचे समज, गैरसमज, एकमेकांविषयीची मतं अन मतांतरं, एकमेकांशी संपर्काच्या तर्हा, उधारीचे किस्से अन तुटलेल्या संवादाच्या कानगोष्टी अशा विविध विषयांवर मागे चाललेल्या रस्त्यासोबत चर्चेची गुर्हाळंही मागे पडत होती. खुप दिवसांनी आठवलेल्या त्या प्रत्येक प्रसंगातून एकेका व्यक्तीची वैशिष्टय़ अधिक प्रगल्भतेने बाहेर पडत होती. भाकाळगिरीच्या पलिकडचं काही या तीन तासात नक्की मिळालं. साखरपुड्याच्या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला भेटून तोच आनंद होत होता.

"अरं तुला सांगतू........" पासून सुरू झालेला अन "तुझ्या माहितीसाठी सांगतू मह्या....."
पर्यंतच्या
संवादातील मंगेश आणि त्याची रांगडी भाषाशैली अजूनही कायम असल्याने आणि ती
महेश (मामा) ने त्याच शैलीत बोलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अनुभवता आला.
साखरपुड्याचे मुख्य अतिथी असणारा महेश आणि त्याच्या चेहर्यावर असणारी
निरागसता, साम्यंजसता स्वागतासोबत पाहिला मिळाली. सोबत जयदीप होताच. निरोप
समारंभानंतर तब्बल तीन चार वर्षांनी भेटलेला रोहित अजूनही "डुडं"च होता.
संयम, विनम्रता अन शांतता प्रत्येक शब्दासह अनुभवता आलं.
नुकत्याच हिमाचल,
कुलू मनालीच्या ट्रीपवरून आलेला स्वप्निल, मित्र परिवाराचा आधारस्तंभ आणि
अजूनही सहकारी मित्रांना जबाबदार न वाटणारा श्रीकांत (पाटील), चिरंजीवातून
श्री झालेला निलेश आणि हसतमुख असणारा कृष्णा या भेटलेल्या प्रत्येकासोबत
काॅलेजच्या चार वर्षांतील आठवणी मनात साठवून एकमेकांची खेचाखेची करत, ग्रुप
ग्रुप खेळत अन रूम पार्टनर म्हणून वेगळा फोटो काढून घेत सगळ्यांचे दोन
अडीच तास कसे उलगडले समजलं नाही. जेवणातील बाकी मेनूपेक्षा बीट खाण्यात आणि
खायला घालण्याचीही सगळ्यांनी मजा घेतली. आडेवेडे घेत उगीचच केलेला
उखाण्यातील नावांचा आग्रह अन लग्नापूर्वी करून घ्यायची उजळणीचे सल्ले देत
महेशचा लांबवलेला निरोप घेत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
दुपारच्या जेवणानंतरचा प्रवास म्हणून महेश आणि राम मागच्या बाकावर कधीचेच झोपले होते. माझ्याही अधूनमधून डुलक्या चालूच होत्या. पण एका खड्ड्यात गाडी आधळल्यानंतर झोप उडालीच. यानंतरच्या प्रवासात मनात फक्त विचारांच द्वंद्व सुरू झालं होतं. अगदी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यातच कठीण जात होतं. माणसाला जगाशी खोटं बोलता येईल पण स्वतःच्या मनाशी खोटं बोलता येत नाही. साखरपुडा, लग्न अमुक तमुक विधी व तत्सम गोष्टी आवडत नसूनही जाण्याचा घेतलेला निर्णय हा एका विशिष्ट वेळेपर्यंत रूचणारा नव्हता. पण खूप दिवसांनी सगळ्या मित्रपरिवाराला भेटण्याची संधी सहजपणे घालवण्याचा कोणताही विचार मनात आला नाही आणि मी श्रीकांतने सांगितल्याबरोबर होकार दिला.

दुसरा प्रश्न होता. चहा घेण्याचा..? सहसा माझा आणि चहाचा प्रसंग जरा कमीच
येतो. गेल्या सहा महिन्यांत अपवादात्मक परिस्थितीत पण न घेतलेला कपभर चहा
आज मित्रांसोबत काॅलेजच्या दिवसांची आठवण करून देणारा वाटला. जणू जब मिल
बैठेंगे सब यार, हम तुम ओर एक कप चाय असंच झालं आणि मागे जात एकदम
काॅलेजच्या आठवणीत मग्न होत कॅन्टीन मध्ये चहा पित बसल्याचंच जाणवलं. अगदी
जीभेला चटका बसला तरी आज तो जाणवला नाही.
आजचा दिवसच असा संस्मरणीय अनुभव देणारा होता. आयुष्यात खूप काही बदललं. काही सवयी सुटल्या. पण मित्र अजूनही तसेच आहेत. त्यांची सवय सुटता सुटेना आणि सुटू नये हीच इच्छा आहे. कारण काही सवयी न सुटण्यासाठीच असतात. बहुतेक त्यामुळेच गहिवरलेल्या विचारचक्रात अडकलेल्या मला "दादा आज लय गप गप " असं म्हणून हटकल्यावरही स्पष्टपणे बोलण्याची सवय असूनही बोलता आलं नाही. आणि याच सगळ्या भावना भावनांना मांडण्याचं हे माध्यम मला सोयीचं अन बरं पडतं. निदान माझ्या मनाशी तरी मी हे नक्की स्पष्टपणे बोलू शकलो. हे असे दिवस पुन्हा पुन्हा यावेत हीच अपेक्षा आहे. हार्ले डेव्हिडसन घेऊन एक ट्रीप या सर्व मित्रपरिवारासोबत जावी अशाच इच्छा आकांशा ठेवत शेवटी थांबलेला परतीचा प्रवास सुरू झाला.

बाकी महेशचा साखरपुडा अविस्मरणीय
अनुभव देणाराच होता. दिवसाच्या प्रवासाचीही सुरवात एकत्रित झाली नाही अन
शेवटही याची खंत मात्र नक्की मनात राहिली. बाकी मित्रांमधील गैरसमज दूर
झाले असतील तर आनंदच आहेत. झाल्या, गेल्या त्या न रूचणाऱ्या गोष्टी आठवून
अबोला न ठेवता मित्र परिवारातील संवाद कायम रहावा. आज काहींशी होणार्या
भेटी राहून गेल्या याचंही दु:ख आहेच. मैत्रीतील व्यवहार विश्वासाइतकेच जपले
जावेत. पण मैत्रीत व्यवहार न आणता ती जपली जावी हीच इच्छा आहे.
जाता
जाता जाग्या झालेल्या काॅलेजच्या आठवणी, पहिल नसलेलं प्रेम अन बरंच काही,
काॅलमधल्या तिच्या गोष्टी आणि शेवटी ती सध्या काय करतेय हे आठवत घेतलेला
निरोप संस्मरणीय आहेच. धन्यवाद मित्रांनो हा खुप दिवसांनी असा आनंदी दिवस
घालवता आला की जेणेकरून रोजचं धावपळीचं जगणं विसरून जगता आलं. शेवटी
धन्यवाद विकास आणि महेश सुखरूपपणे पुन्हा पुण्याला माघारी परत आणलं.
![]() |
| (महेश भाऊ वहिनींच्या हातात साखरपुड्याची अंगठी घालताना....) |
![]() |
| (महेश भाऊंच्या साखरपुड्याला आलेल्या पाहुण्याचा सन्मान करताना अन स्विकारताना विकास डोंगरे आणि श्रीकांत नागवडे पाटील....) |
गणेश दादा शितोळे
(१९ फेब्रुवारी २०१७)
(१९ फेब्रुवारी २०१७)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा