कविता सुचतील अशा मुली आहेतच कुठे...?
मित्रांच्या कमेंट वाचताना मुंबई पुणे मुंबई मधला एक खास डायलॉग आठवला...
त्यात मुक्ता बर्वे म्हणते : मला ना हे आजकाल असले गर्लफ्रेंडसाठी कविता वगैरे करणारे मुले नाही सापडत..
त्यावर स्वप्निल जोशीने दिलेलं उत्तर मला आजही मान्य आहे...
हल्ली कविता सुचतील अशा मुली आहेतच कुठे...
हे खरंय की आयुष्यात आम्हीही कित्येकांना जीव लावला...
पण ती माणसं क्लोज फ्रेन्ड्स मधून बेस्ट फ्रेंड कडे जाण्याऐवजी फ्रेन्ड्स मधे गेली...
खरंतर मैत्री मधे क्लासिफिकेशन नसतं पण सायन्स चा एक रूल आहे...
त्यानुसार आपल्या नात्यात ऑरबीट असतात...
पातळ्या असतात...
एक, दोन, तीन नाही म्हणणार मी पण अगदी जवळ, जवळ, थोडं दूर, दूर, अगदी दूर काहीशा अशाच...
व्यक्ती मधल्या स्पेशालिटी मुळे तिचा या पातळीवर प्रवास सुरू होतो...
इतर सर्व मित्रांमधे एखादी व्यक्ती जवळची वाटणे हे यातूनच पुढे येतं...
तसंच काहीसं माझ्या आयुष्यात झाले...
आजपर्यंत मित्र मैत्रिणी भरपूर कमावले...
काहींचा प्रवास क्लोज फ्रेन्ड्स पर्यंत झाला पण अजूनही कोणी मनातलं ओळखेल अशी बेस्ट फ्रेंड व्यक्ती भेटली नाही....
आयुष्याचा प्रवास सुरू आहे...
त्या व्यक्तींची भेट होईल अशी अपेक्षा ठेवत आपलं काम छंद सुरू ठेवायचा...
कवितेच्या बाबतीत म्हणायचे तर प्रेमकविता लिहिण्यासाठी प्रेमातच पडावे असंही काही नसतं.
कदाचित प्रेमात पडल्यावर त्या कविता सुंदर होतील असंही असू शकते..
अन कोणी कविता वाचूनही प्रेमात पडू शकते...
बघू मग अशा कवितेची वाट...
काळजात खोल खोल रूतले काही...
ओठी शब्द ते केव्हाच फुटत नाही...
आयष्य हे जगायचे आशेवर काही....
भेट होईल कुणाची मन आशा ठेवून राही...
गणेश दादा शितोळे
(१६ ऑगस्ट २०१५)
(१६ ऑगस्ट २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा