छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी
नुकतीच फाल्गुनी आमवस्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी होऊन गेली. अनेकांना ती लक्षात होती का नाही ते माहीत नाही. पण त्या सर्वांच्या मनात बिंबवलेला अन सोबत दुसर्या दिवशी गुढी पाडवा नावाचा एक सणही साजरा करण्यात आला. मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा साजरा करतात आणि म्हणून मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी फेसबुक व्व्हाटसअपच्या माध्यमातून पोस्ट्स पाठवल्या. काहींनी फाॅरमॅलिटीही पूर्ण केल्या. पण माझ्या कडून वैयक्तिक कोणालाही अशा शुभेच्छा मिळाल्या नाहीत. याच शुभेच्छा देणारांमधील काहींना माझ्याकडून दरवर्षी प्रमाणे या मुद्द्यावर अपेक्षीत विरोधी पोस्ट आल्या नाहीत म्हणून भुवय्या वरही केल्या. त्यांच्या भूवया कदाचित उंचावल्या असतील की माझ्या भूमिका अन मते बदलली अशीही शंका कित्येकांच्या मनात येऊन गेली. काहींनी फोन करून तसं विचारलंही.
ज्या दिवशी संभाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यामागची भूमिका, राजकारण आणि विविध विचारप्रवाहांचा अभ्यासू प्रभाव मनावर कोरला गेला त्या दिवसापासून आजवर कधीही गुढीपाडवा नामक सण माझ्या कडून साजरा करण्यात आला नाही. ना कोणाला शुभेच्छा देण्यात आल्या. नावाप्रमानेच आमच्याकरता फाल्गुनी आमवस्या अन चैत्राची सुरवात ही कडुलिंबा चाखल्यासारखी आजही कडवटच चव देणारी ठरली आहे. संभाजी महाराज आणि त्यांचा पराक्रमी इतिहास मनाच्या गाभाऱ्यात इतका खोलवर रूजला गेला आहे की त्यांच्या पुण्यतिथीचा आनंद बळजबरीनेही कधी साजरा होऊ शकत नाही. गुढीपाडवा आणि त्याची पार्श्वभूमी यावर चर्चा करण्यास आणि विचार मांडून फक्त वाद निर्माण झाले आहेत. माझ्या मनात एकमात्र भूमिका आहे की ज्या संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या बळावर शिवरायांचे स्वराज्य वाढीस लागले आणि त्याच पराक्रमी शौर्यामुळे आज आपण आहोत आणि या आपल्याला लाडक्या युवराजाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे चैत्राची सुरवात. भले असेल ती मराठी नववर्षाची सुरवात अन अजून काही. पण त्याच्या आनंदावर औरंग्याने विरजण टाकले आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. त्याचा शोक आणि दुःख केव्हाही मनाला त्रासदायक देणारे आहे. त्यामुळे दरवर्षी उपदेशाचे दोन शब्द सांगून वादविवाद करून आपली मतं दुसर्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा नव्हता. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी मानून ती साजरी करत आपल्या परीने जे काही चांगले सामाजिक काम करता येईल याचा विचार करत यंदाही संभाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आपली मतं आणि आपले विचार मांडणे योग्य आहेत. पण त्यावर वादविवाद घालून ते एकप्रकारे लादणे केव्हाही चूक. अन या चूकातून सुधारण्याचा माणस यावर्षी पासून केला आहे. आमच्या घराच्यांनाही माझे विचार पटत नाहीत. त्यांना अनेकदा वास्तविकतेची जाण करून दिली. पण विचार लादण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यांना जे साजरे करायचे त्यांनी ते करावे. मी आपली वैचारिक बैठक मजबूत ठेवून त्याच भूमिकावर ठाम आहे. आमचे राजे कधीही कोणत्याही एका जाती धर्मापुरते निगडीत नव्हते. ना त्यांनी कधी एका धर्मापुरता विचार केला नाही.
त्यामुळे त्यांचाच आदर्श समोर असताना कोणत्या एका धर्मापुरतं बांधून घेणे वैयक्तिक मला कधीच जमलं नाही. दाखल्यावर धर्म टाकणे माझ्या हातात नव्हतं. पण म्हणून त्या धर्माच्या बंधनात जोखडात अडकून रहाणेही मला कधी जमले नाही आणि जमणार नाही. माणसाला माणसाप्रमाणे वागवणे तोच खरा धर्म आणि त्याच माणूसकी नावाच्या धर्माचा पाईक होत शिवछत्रपतींच्या विचारांचा आणि संभाजी महाराजांचे आचरणाचा आदर्श ठेवून जगण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांना आमचे विचार पटतील अन ज्यांचे विचार आम्हाला पटतील अशा दोघासंह हा प्रवास सुरू झाला आहे. अजून ध्येय आणि वाटचाल दूरवर आहे. बाकी कोणाला काय वाटते याची फिकीर कधी वाटली नाही अन वाटणार नाही. आणि शेवटी एकच डोळ्यासमोर ठेवून जगायचे...
"मनाने कधी बंधने घालून घेतली नाहीत तर आपण ती का घालून घ्यावीत. भटकून द्यावे स्वैर त्यालाही. "
गणेशदादा शितोळे
२२ मार्च २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा