मिठीत तुझ्या...!!!
मांडीवर
डोकं ठेवून तुझ्या
सावलीत
विसावायचं होते...
डोळे
मिटून स्वप्नातही
तुलाच
पहायचे होते...
केसातून
फिरणारा तुझा हात
हातात
घेऊन विरून जायचं होते...
मनातल्या
मनात दाटून येणाऱ्या
अगणित
भावनांना मुक्त करायचे होते...
आजही
तुझी ही स्वप्न आठवून
मनालाही
माझ्या सुखावले होते..
जणू
तुझ्या सोबतच्या प्रत्येक क्षणाला
मला
पुन्हा पुन्हा जगायचे होते..
गणेशदादा शितोळे
(१५ एप्रिल २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा