झोपेची मजा...!!!
का
कुणास ठाऊक आता
पहिल्यासारखी
सकाळ कधी भासतंच नाही...
कितीही
झोपावं वाटलं तरी
कोंबड्याच्या
आरोळीने झोपमोड होतंच नाही..
डोळे
उघडले की दिसणारं
निरभ्र
आकाश दिसतंच नाही...
शहारणारा
मंद गार वारा
भोवतालीही
फिरत नाही...
आता ती
साखरझोपेत पडणारी स्वप्नही
पहिल्यासारखी
येत नाहीत...
किंचितशी
जाग आली तरी
सकाळची
प्रसन्न सुरवात होत नाही..
आता ते
सर्व बदललंय
गावातून
शहारात आल्यावर सगळंच हरवलंय...
पैसा, सुखाच्या शोधात अन सोशल जगण्यात
अंगणातल्या
झोपण्याची मजा येत नाही...
गणेशदादा शितोळे
(१५ एप्रिल २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा