माझा शोध...!!!
फिरणाऱ्या पंख्याच्या पात्याकडे पहात
शांत बसलो तर विचारांचं चक्र जोरात
फिरू लागलं
डोळे मिटून थोडं मनात डोकावून पहात
विचारांचं वादळ सैरभर होत शोधू
लागलं...
जगण्याचा अर्थ की विखूरलेल्या वाटा
बरंच काय काय त्याला सापडत गेलं....
धूळ खात पडलेल्या आठवणींचा साठा
उचकापाचक करून झालं...
सैरभैर इकडून तिकडं धावत धावत
शेवटी काहीतरी नक्कीच विचार करायला
लावणारं सापडलं...
खूप दिवसांपासून मलाच न मिळालेला
माझा वेळ
ढीम्म एकाजागी थांबलेला मनानं
पहिलं...
थोड्यावेळाने पुन्हा एकदा मन
इकडून तिकडं धावत पळत सुटलं
खूप शोधूनही काही गोष्टींच हरवणं
मनाला काही केल्या नव्हतं सापडलं
कोणतं कोणतं अन काय काय करत
मन रात्रभर तसाच छळत राहिलं...
माझा छंद अन माझ्या आवडी
एवढी उचकापाचक करूनही काही नाही
सापडलं...
गणेशदादा शितोळे
(१५ एप्रिल २०१८)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा