माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

पहली नजर में...!!!

 

                    काल तिला पहिल्यांदा पाहिलं. खरंतर तिची अन माझी ओळखही नव्हती. पण आयुष्यात अशी काही अनोळखी माणसं भेटतात की ज्यांची ओळख करून घेण्यात आयुष्य जावे असंच वाटतं. गेल्या वर्षभरात अनेक वेळा मित्रपरिवराकडून तिचं नाव ऐकलंही होतं. पण काल पहिल्यांदा पाहिल्यावर ही म्हणजे तीच ही खात्री झाली. तीन साधं वळूनही पाहिले नाही. पण माझी नजर तिच्या चेहर्‍यावरून अजूनही हटत हटत नाही. 
                    कालच्या दिवसभराच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या गोंधळात अन मित्रांच्या गराड्यात ती समोर असूनही जाणवली नाही. परंतु आपल्या एकटेपणात जी माणसं आठवतात तीच खरी आपली माणसं असतात या उक्ती प्रमाणेच काल घरी आल्यानंतर आत्ता लिहिण्यापर्यंत अजूनही तिचा चेहरा नजरेसभोरून दूर जाण्यास तयार नाही. जवळपास गेल्या बारा तासापासून मी तिच्याच विचारात गुंतून आहे. 
                   फेसबुकवर सर्च करून तिचा फोटो मिळाला आणि मी काही तास त्या कडे बघण्यातच घालवले हे आत्ता जाणवतंय. अगदी रात्री झोपही तिच्या आठवणीतच लागली. असं होतंय की आमची खूप जूनी ओळख आहे आणि आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ घालवलाय. घडीत मनं असही उत्तर देतं की, "पहली नजर मे ऐसा जादू कर दिया." आणि मी प्रेमात पडलो. 



                   पण तो प्रश्न कित्येकदा स्वतःलाच विचारला तर होकार आणि नक्की असा नकारही मिळाला नाही. पण हे नक्की की तिला काल पाहिल्यापासून मनाला मोठं कोडं मात्र नक्की पडंल आहे. तिची पुन्हा भेट होईल की नाही माहित नाही. 
                   आता मात्र "ती सध्या काय करते....?" या प्रश्नाच्या फेर्‍यात मी अडकणार हे नक्की.








गणेश दादा शितोळे
(२३ जानेवारी २०१७)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा