माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

सोमवार, २६ जानेवारी, २०१५

काही नाती टिकवण्यासाठीही,
जगायचे असते आयुष्य....

रोज येते आठवण तसा मी,
आठवणींच्या जगात रमुन जातो....
रोज येते आठवण तसा मी,
आठवणींच्या जगात रमुन जातो....

जुन्या त्या रम्य क्षणांचा सोबती होऊन रहातो...
कॉलेजच्या त्या पहिल्या दिवसात गेलो...
सगळेच होते अनोळखी ते ओळखत गेलो...
अमुक हा त्याचा मित्र तमुक हा दोस्त म्हणत गेलो...
म्हणून मीही त्या ग्रुपचा होत गेलो...

लहानपणीच मैत्रीचं गणित समजून घेतलेला मी....
मित्रांच्या ग्रुपचा खंबीर साथ होत गेलो...
कॉलेजच्या कट्ट्यावर बसणे झाले...
रोज नवीन चेहरे बघणे झाले...
मित्रांचे प्रपोज करूनही झाले...
अन मित्राच्या गर्लफ्रेंडच्या मागे असणार्‍या मजनूला मारूनही झाले...

कॉलेजात ज्युनिअरचं सिनियर्स होऊनही झाले....
सो काॅलड महत्त्वही वाढवून झाले...
आणि एक दिवस लक्षात आले...
मी मित्रांच्या गर्दीत हरवून गेलो आहे....
पण खरंतर माझ्या आयुष्यात थोडक्याच मित्रांचं अस्तित्व आहे...
रस्त्यावर हात दाखवून ओळख सांगणारे भरपूर आहेत...
पण थांबून भेटून बोलणारे थोडेच उरलेले आहेत...

मी एक समोरून आक्रमक भूमिका घेणारा...
पण आयुष्याचा शांतपणे विचार करणारा...
मी नाही टिपीकल काॅलजकुमार...
काॅलेजलाईफमधे फक्त गर्लफ्रेंड फिरवणारा...
मित्रपरिवार भरपूर पण हक्काचा कोणी एक असणारा...

मी आहे एक वाटसरू...
फक्त आयुष्याच्या प्रवासात वाट शोधणारा...
कधीतरी ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे...
एवढ्याच आशेवर जगणारा...
उगाच एकाच गोष्टीकरता मागे न धावणारा....
त्याच्याशिवाय भरपूर काही आयुष्यात आहे समजणारा....

फेसबुक व्हाट्सअप चॅटिंग रोजच करत असतो....
जवळच्या लांबच्या ओळखीच्या अनोळखी...
प्रत्येकालाच ग्रुपला अॅड तर करतो...
पण याने फक्त पोस्ट्स करणार्‍यांची फ्रेन्ड्स लिस्ट वाढत असते..
आयुष्यात मदतीला धावणार्‍यांची साथ नसते...

फ्रेन्ड्स फाॅरेव्हर म्हणणारेच दूर निघून जातात...
जवळ असल्याचे कमिटेड वेळेलाच बिझी होत जातात....
सुखदुःखात सोबत करायला आज मित्र शोधायला लागतात...
आपल्याला खरी गरज असते...
तेव्हाच बिझी शेड्युलमधेही मैत्री करता वेळ असतो...

आयुष्यात आठवणींना टाळता येत नसतं...
आपण आयुष्याभर आठवणीत असतो अडकलेलो...
आठवणींना सोडून पळता येत नसतं...
मग असं कधी आठवणींच्या जगात मन रमत असतं..

पण आठवण यायला हवे असतात हक्काचे मित्र...
जे हक्काने कौतुक करतील...
अन प्रसंगी शिव्याही घालतील..
त्यांच्यासाठी मैत्री नसतो फक्त पैशाचा व्यवहार...
तर असते आयुष्यभर साथ करण्याची कमिटमेंट....

असे सच्चे दोस्त सापडतात आठवणींच्या जगात...
मैत्री कमवून नात्याने श्रीमंत झालेले..
मित्रांच्या गर्दीतही मनाच्या एक कोपर्‍यात बसलेले....
मैत्रीची साक्ष देत असलेले....

असे मित्र कमवायला आठवणींच्या जगात रमायला पाहिजे...
फेसबुक व्हाट्सअप च्या चॅटिंगने आयुष्य राहते रिते...
फक्त जगण्यासाठी आयुष्य जगायचे नसते...
काही नाती टिकवण्यासाठीही जगायचे असते आयुष्य....
काही नाती टिकवण्यासाठीही जगायचे असते आयुष्य....
गणेश दादा शितोळे
(२६ जानेवारी २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा