माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०१५


वाढदिवसाला तुला शुभेच्छा दिल्या नाही....



वाढदिवसाला तुला शुभेच्छा दिल्या नाही....
विश यु हॅपी बर्थ डेही म्हणालो नाही....
होता तुझाही वाढदिवस लक्षात माझ्या...
तरी तुला उदंड आयुष्य लाभो म्हणू शकलो नाही....

मज आजही न आठवते ती वेळ कोणती...
मुद्दाम की चूकून विश करायचं राहिलं होतं...
खाजवून डोक्यावर कितीदा तरी....
तुला शुभेच्छा देण्याचं लक्षात कसं राहीलं नव्हतं....

बोलून दाखवता येत नाही मला सगळेच शब्दातून...
काही तुलाही उमजून यावू आपल्या मैत्रीतून...
असह्य होऊन हे मला कधी खटकेन म्हणून..
थोड्याशा आठवणी सोबत दिली कवितेला वाट करून....

आठवणीने सगळ्यांना विश कराणार्‍या तुला...
मात्र बरेच जण विश करायचे राहून गेले...
नाही माहित मुद्दाम हटकून की चूकून...
माझं मात्र लक्षात असून चूकून विश करायचं राहून गेलं...

कालही पुन्हा एकदा भरला असेलच ना मित्रांचा मेळा...
तुला मला अपेक्षित असतील एवढा नसेल कदाचित...
समजून घे आयुष्याच्या बिझी शेड्युलमधून
नाही मिळत आता हक्काच्या वेळा...

नाराज नको होऊ मित्रा कोणी विश केले नाही म्हणून...
ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यात समाधानी असावं आपण...
कामाच्या गडबडीत नसेल राहिले लक्षात घे समजून....
लक्षात ठेव जे होते त्यांच्या सोबतचेच सुंदर क्षण...

बघ या मित्राच्याही खांद्यावर हात ठेवून....
ओलांडून पुढे गेलास तू आयुष्याचं एक पुढचं पाऊल....
तुज बाकी काही नाही तर सोबत म्हणून....
जा घेऊन माझे हे दोन शब्द आठवणीच्या मोरपिसातले...

हे टॅलंट नाही माझे फक्त आहे कुणामुळे तरी मिळालेली देण...
मी माझे मन अन आठवणी तशा एकट्याच आहेत...
जे एकटेच उरले होते ठसे मैत्रीच्या नात्याचे...
तो फक्त शब्दांच्या गुंफणातून उमटत चालले आहेत...


गणेश दादा शितोळे
(१२ फेब्रुवारी २०१५)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा