माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २० जानेवारी, २०१५


वाढदिवस

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
नवीन वर्षात पदार्पण केल्याचा आनंद
की
जुने वर्षे निघून गेल्याचं दुःख...

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
नव्या वर्षांत जगण्याची उमेद
की
सरत्या वर्षांतील आठवणींची घालमेल. ..

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
पहिलं विश कोण करतं याची उत्सुकता
की
कोणीतरी आपल्याला विसरल्याची जाणीव...

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
मित्रांसोबत एकत्रित सेलिब्रेशन
की
गर्लफ्रेंड सोबतचा कॅण्डललाईट डिनर...

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
आई वडिलांचा घेतलेला सकाळचा आशिर्वाद
की
मित्रमैत्रिणींच्या दिवसभर मिळणार्‍या शुभेच्छा...

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
आयुष्य एक वर्ष जगल्याचं सेलिब्रेशन
की
आयुष्य एका वर्षानं कमी झाल्याचं दुःख

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
नवीन वर्षात करायचा संकल्प
की
जुन्या आठवणींना उजाळा देणारा क्षण

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
निश्चित उत्तर कधीच सापडत नसतं...
सापडलं तरी परिस्थितीनुरूप बदलत असतं...

खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
नव्यानं आयुष्य जगण्याची प्रेरणा अन
जुन्या आठवणीसोबतचा विरंगुळा,
आईवडिलांचा आशिर्वाद
अन मित्रमैत्रीणींच्या शुभेच्छा,
दिवसभर सेलिब्रेशन आणि लेट नाईट डिनर,
खरंच वाढदिवस म्हणजे नक्की काय असतं...
आयुष्य आनंदाने जगायला शिकवणारा पहिला क्षण...


गणेश दादा शितोळे
(२० जानेवारी २०१५)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा