जुनं वर्ष गेलं नवीन वर्ष आलं,
पण खरंच २०१३ने काय दिलं...
वर्षभरात काँग्रेसनं काहीतरी चांगलं काम केलं
अफजल गुरूला फासवर दिलं
वर्षाखेर युवराजांना पंतप्रधानपदाचं बाशिंग बांधायला लागलं
चहावाल्या मोदींना राष्ट्रीय नेता घोषीत करावं लागलं
दोघांच्या भांडणात राजधाणीत आम आदमीचं सरकार आलं
आण्णांच्या आंदोलनाला यंदातरी यश आलं
जनलोकपाल नाहीतरी लोकपाल तरी आलं
चारा घोटाळ्यानी लालूला जेलमधे नेलं
यावर्षीतरी राजकारणात नवीन काही घडलं
महाराष्ट्रात २०१३ने बरंच काही घडवलं
घोटाळ्यांच्या मालिकांना उघडकीस आणलं
सत्ताधारी विरोधकांच्या गोंधळांनंच वर्ष गाजवलं
हिंदुंह्रदयसम्राटाला भर दिवाळीलाच देवानं भेटीला बोलावलं
बाळासाहेबांच्या तोफेला इहलोकीच्या निरोपाला जावं लागलं
सनातन्यांनी महाराष्ट्राच्या नरेंद्राला गोळ्या घालून मारलं
दाभोळकरांना जादुटोणा कायद्यासाठी धारातिर्थी पडावं लागलं
२०१३ ने महाराष्ट्राला बरच काही दिलं
या वर्षानं थोडी खुशी थोडं गम काही दिलं
चित्रपटनगरीत बरंच काही घडलं
मन्ना डेंचं गाणं अजरामर झालं.
प्राणसारख्या अभिनेत्यालाही देवाघरी नेलं
विनय आपटे, राजीव पाटलांना आपल्यातून दूर नेलं
निशब्द जियानंही मरणाला कवटाळलं.
दुनियादारीनं मराठी चित्रपटाला ग्लॅमर मिळवून दिलं
किंग खानच्या चेन्नई एक्सप्रेसला क्रिशने माग टाकलं
जाता जाता धुमने रेकॉर्ड केलं
२०१३ ने चित्रपटनगरीला बरच काही दिलं
या वर्षानं थोडी खुशी थोडं गम काही दिलं
हेही वर्ष महिला अत्याचारानं गाजलं
बलात्कारानं महिलांना भयभीत केलं
बापू साईनं श्रद्धेला कलंकीत केलं
तहलकाचं भिंग जगासमोर आलं
न्यायाधिशांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं
बड्या धेंड्यानीच महिला अत्याचाराला सुरू केलं
देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह उभं झालं
२०१३ ने देशाला बरच काही दिलं
या वर्षानं थोडी खुशी थोडं गम काही दिलं
ज्या सचिनवर जिवापाड प्रेम केलं
त्या देवालाही रिटायर याच वर्षानं केलं
बावीस यार्डाच्या बादशाहाला निवृत्त केलं
क्रिकेटच्या गॉडफादरला भारतरत्न केलं
पॉन्टिंग, कॅलिस सारख्या दिग्गजांना रिटायर व्हावं लागलं
रोहित धवन कोहलीसारख्या रत्नांना दिलं
२०१३ ने महाराष्ट्राला बरच काही दिलं
या वर्षानं थोडी खुशी थोडं गम काही दिलं
२०१३ गेलं २०१४ आलं
फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत झालं
फ्लॅशबॅकच्या कवितेत बरेच आठवलं
हे वर्ष सगळ्यांना आनंदाचं भरभराटीचं जावो
एवढंच काय ते मी मागितलं...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा