माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, १४ डिसेंबर, २०१३


 तो निळाशार समुद्र मी अन तुझी आठवण. ..



समोर दिसत होता तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण....
सागराच्या धडकणार्‍या लाटेवर भटकत चाललं होतं मन...
तू सोबत होती मी माझी कविता अन एकांत
पण तरी अजूनही तू सोडून गेली नसल्याचे मानत नव्हते मन...


तो खळखळणारा समुद्र माझा मीच भासत होता मला...
जणू प्रत्येक लाटेसरशी नव्याने साद घालत होता तुला...
त्या एकांतात तेवढाच तरी सोबती होता मला....
मन सलाम करत होतं त्याच्या त्या अथांग मैत्रीला...


होते सोबत काही जिवलग मित्र अन भोवतालचे अनेक जण..
पण तुझ्यासारखं आपलंस नव्हतं भासत कोण...
आपल्याच विचारात गुंगून गेला होता इथला प्रत्येक जण...
होता तो निळाशार समुद्र मी अन तुझी आठवण....



गणेशदादा शितोळे
(१४ डिसेंबर २०१३)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा