माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....



बघायला जायचं होतं प्रत्येकाला
आठवणीत राहील असं केरळ....
पण शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नव्हतं
गोवा चांगलं की केरळ....
एजंट पाहूनच अगोदरच माहित होतं...
होणार सगळ्या ट्रीपचा खेळ....
बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....

मित्रांच्या आग्रहानं घेतली मी पण घेतली रिस्क....
सर्वांनी केलं बघायला जायचं केरळच फिक्स....
काॅलेज लाईफच्या शेवटच्या ट्रीपमध्ये होऊन जाऊ मिक्स...

रिझर्वेशन झाले पाऊले पडली दौण्ड प्लॅटफॉर्म वरी...
जमले सगळे करायला सोबत नवीन दुनियादारी....
असेल भरपूर एनजाॅयमेंट आणि ट्रीप लय भारी...
ट्रेनोच्या शिटीसोबत झाली सुरू आमची केरळवारी...

पाहून माझं मनही झालं थोड वेंधळं...
रिझर्वेशन असूनही जेव्हा सगळ्यांचा उडला गोंधळ...
एकेकाला सीट मिळेपर्यंत आवाज आणि कल्लोळ....
जणू वाटत होतं उगाच आलो बघायला एकत्रित केरळ....

कशातरी मिळाल्या आमच्याच रिझर्वेशन केलेल्या सीट...
कितीही भांडलो तरी नाहीच मिळाल्या एकत्रित नऊ सीट...
कमी झाला दोनतीन तासांच्या गोंधळातला वीट...
वाटलं इतकं का चिडचिड करत होतो आपण फुकट...

आलं मग मोहोळ जाऊन स्टेशन सोलापूर....
मित्रा च्या घरून आला जिलेबी चे पार्सल भरपूर...
बसले सगळे खायला पुढे होऊन भराभर...
पण मित्रच झाला कुठल्या तरी बोगीत फरार...

प्रत्येकाने पोटभरून खाल्ले. ...
सगळे मग मित्राला चिडवण्यात रंगून गेले...
जिलेबी कशाची होती माहिती नाही...
पण आम्ही मित्राची एंगेजमेंट झाल्याचेच उठवले..

हळूहळू सगळ्या ट्रेनमध्ये पसरले...
मग एंगेजमेंट सोबत बारसेही झाले...
मित्राला थोडे वाईट वाटले...
पण टाॅन्ट मारणे आम्ही नाही सोडले...

गप्पांच्या ओघात रात्रीचे बारा कधीचे वाजून गेले...
केरळच्या प्रवासात नवीन एक कुटुंब भेटले...
त्यांनीच थोडं अॅडजस्ट करून आम्हाला एकत्र झोपायला सीट्स दिले...
कधी येईल केरळ वाटण्यात डोळे मिटून गेले....

पहाटेचे चार नाही वाजत तोच आमच्या मित्राला भलतेच सुचले....
भर थंडीत फुकटात सगळ्यांनी जागे केले...
प्रत्येकाला काहीतरी सांगितले...
अन गपचूप स्वतः झोपून घेतले...

वाटलं नव्हतं इतकाही होईल बट्याबोळ...
ट्रेन अन बसमधून फिरण्यातच जाईल सगळा वेळ. ...
आणि होईल सगळ्या ट्रीपचा अबॅनडंड खेळ...
बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....

गणेशदादा शितोळे
(२५ एप्रिल २०१७)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा