आत्ताच केरळची ट्रीपवरून जाऊन आलो....
मुन्नार मनुपट्टी डॅम दरम्यानच्या प्रवासात
साथीला होता बरसणारा पाऊस..
अन सोबतीला होती शब्दांची साथ...
गुंफत गेली एकेक ओळ....
अन अलगद उतरली मनातली बात....
आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात
आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात
निराशेच्या दुख:त सगळेच सेन्स हरवून जातात
कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेत होतं
आठवणींच्या कड्यावरून स्वत:लाच झोकून देत होतं
कोसळत होत्या सरी आणि धुंद झालेली हवा
आपसूकच कोणीतरी छेडलेला ढगांचा थवा
पण चिंब भिजलं तरी अंग कोरंच वाटत होतं
मनावर आलेलं मळभ मात्र अजूनही दाटलेलं होतं
मोकळया हवेत पण कधी अडखळत होता श्वास
गर्दीत असतानाही होत होता एकटेपणाचा भास
मित्रांच्या संगतीतही कधी मन मात्र एकटंच राहत होतं
ट्रिपमधेही एकांतात मोकळीक शोधत होतं
वेडया मनाला वाटतंय माझ्यापासून काहीतरी दुरावलंय
जणू काही काळाकरता माझं सर्वस्व हरवलंय
मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर
पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं
अश्रू मधून कधी ते नकळत गळतं...
गणेश दादा शितोळे
(२० मार्च २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा