माझ्या मनातलं...!!!

कितीही फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा मोबाईल फोन आहेत असं म्हटलं तरी मित्रमैत्रीणींसोबतचा गप्पांचा कट्टा तो कट्टाच....! महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा कट्टा उपलब्ध नसल्यानं मित्रमैत्रीणींसोबतच्या गप्पा राहून गेल्यासारखं होतं. अधूनमधून भेटी होत राहिल्या तरी तितकाशा गप्पा होत नाहीतंच अन त्यातही आपल्यातला लेखक/कवी कुठेतरी हरवल्याची खंत वाटली. म्हणूनच आपल्या लेखनाला तरी न्याय देण्यासाठी मी या ब्लॉग कट्ट्यावर पाऊल टाकलं. माझ्या या छोट्याश्या प्रयत्नातून शोधत आहे माझीच हरवलेली शब्दांची मोरपिसं...!!!!!

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

नात्यांच्या प्रतिक्षेत

ओळख झाली अन भेटी झाल्या कित्येक तरी...
नात्यांची गाठ बांधणे अजूनही बाकी आहे....
संवाद घडोघडीचा क्षणांनी वाढत राहिला तरी...
नात्याचा धागा अजूनही सैल आहे...

ओढ वाढत राहिली सहवासाची तरी...
नात्यांची जोड घट्ट होणे बाकी आहे...
जुळत चालले प्रेमाचे बंध रेशमी तरी...
गुंफता वीण पदरांच्या उपेक्षित आहे...

नात्यांच्या प्रेमात भागली क्षणभर विश्रांतीतली तृष्णा तरी...
चातकाला पाण्याची ओढ अजूनही तशीच आहे....
आयुष्यात भेटत राहिले राजहंस किती तरी...
प्रेम अन मैत्रीतले दूधपाणी वेगळे होण्याच्या प्रतिक्षेत आहे...


गणेश दादा शितोळे
(२८ एप्रिल २०१५)


शनिवार, २५ एप्रिल, २०१५

बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....



बघायला जायचं होतं प्रत्येकाला
आठवणीत राहील असं केरळ....
पण शेवटच्या क्षणापर्यंत ठरत नव्हतं
गोवा चांगलं की केरळ....
एजंट पाहूनच अगोदरच माहित होतं...
होणार सगळ्या ट्रीपचा खेळ....
बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....

मित्रांच्या आग्रहानं घेतली मी पण घेतली रिस्क....
सर्वांनी केलं बघायला जायचं केरळच फिक्स....
काॅलेज लाईफच्या शेवटच्या ट्रीपमध्ये होऊन जाऊ मिक्स...

रिझर्वेशन झाले पाऊले पडली दौण्ड प्लॅटफॉर्म वरी...
जमले सगळे करायला सोबत नवीन दुनियादारी....
असेल भरपूर एनजाॅयमेंट आणि ट्रीप लय भारी...
ट्रेनोच्या शिटीसोबत झाली सुरू आमची केरळवारी...

पाहून माझं मनही झालं थोड वेंधळं...
रिझर्वेशन असूनही जेव्हा सगळ्यांचा उडला गोंधळ...
एकेकाला सीट मिळेपर्यंत आवाज आणि कल्लोळ....
जणू वाटत होतं उगाच आलो बघायला एकत्रित केरळ....

कशातरी मिळाल्या आमच्याच रिझर्वेशन केलेल्या सीट...
कितीही भांडलो तरी नाहीच मिळाल्या एकत्रित नऊ सीट...
कमी झाला दोनतीन तासांच्या गोंधळातला वीट...
वाटलं इतकं का चिडचिड करत होतो आपण फुकट...

आलं मग मोहोळ जाऊन स्टेशन सोलापूर....
मित्रा च्या घरून आला जिलेबी चे पार्सल भरपूर...
बसले सगळे खायला पुढे होऊन भराभर...
पण मित्रच झाला कुठल्या तरी बोगीत फरार...

प्रत्येकाने पोटभरून खाल्ले. ...
सगळे मग मित्राला चिडवण्यात रंगून गेले...
जिलेबी कशाची होती माहिती नाही...
पण आम्ही मित्राची एंगेजमेंट झाल्याचेच उठवले..

हळूहळू सगळ्या ट्रेनमध्ये पसरले...
मग एंगेजमेंट सोबत बारसेही झाले...
मित्राला थोडे वाईट वाटले...
पण टाॅन्ट मारणे आम्ही नाही सोडले...

गप्पांच्या ओघात रात्रीचे बारा कधीचे वाजून गेले...
केरळच्या प्रवासात नवीन एक कुटुंब भेटले...
त्यांनीच थोडं अॅडजस्ट करून आम्हाला एकत्र झोपायला सीट्स दिले...
कधी येईल केरळ वाटण्यात डोळे मिटून गेले....

पहाटेचे चार नाही वाजत तोच आमच्या मित्राला भलतेच सुचले....
भर थंडीत फुकटात सगळ्यांनी जागे केले...
प्रत्येकाला काहीतरी सांगितले...
अन गपचूप स्वतः झोपून घेतले...

वाटलं नव्हतं इतकाही होईल बट्याबोळ...
ट्रेन अन बसमधून फिरण्यातच जाईल सगळा वेळ. ...
आणि होईल सगळ्या ट्रीपचा अबॅनडंड खेळ...
बघायचं होतं प्रत्येकाला अविस्मरणीय केरळ....

गणेशदादा शितोळे
(२५ एप्रिल २०१७)


सोमवार, २० एप्रिल, २०१५

 आत्ताच केरळची ट्रीपवरून जाऊन आलो....
मुन्नार मनुपट्टी डॅम दरम्यानच्या प्रवासात
साथीला होता बरसणारा पाऊस..
अन सोबतीला होती शब्दांची साथ...
गुंफत गेली एकेक ओळ....
अन अलगद उतरली मनातली बात....




आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात



आजकाल छोटया छोटया गोष्टी पण फिल होतात
निराशेच्या दुख:त सगळेच सेन्स हरवून जातात

कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेत होतं
आठवणींच्या कड्यावरून स्वत:लाच झोकून देत होतं

कोसळत होत्या सरी आणि धुंद झालेली हवा
आपसूकच कोणीतरी छेडलेला ढगांचा थवा

पण चिंब भिजलं तरी अंग कोरंच वाटत होतं
मनावर आलेलं मळभ मात्र अजूनही दाटलेलं होतं

मोकळया हवेत पण कधी अडखळत होता श्वास
गर्दीत असतानाही होत होता एकटेपणाचा भास

मित्रांच्या संगतीतही कधी मन मात्र एकटंच राहत होतं
ट्रिपमधेही एकांतात मोकळीक शोधत होतं

वेडया मनाला वाटतंय माझ्यापासून काहीतरी दुरावलंय
जणू काही काळाकरता माझं सर्वस्व हरवलंय

मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर

पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं
अश्रू मधून कधी ते नकळत गळतं...



गणेश दादा शितोळे
(२० मार्च २०१५)


सोमवार, १३ एप्रिल, २०१५


नुकताच इंजिनिअरींगचा निरोप समारंभ (सेण्डाॅफ) झाला...
खरंतर गेल्या बॅच (स्पेशल 26) च्या वेळीच बरंच बोलायचं होतं पण आमच्याच मित्रांच्या दुनियादारीनं ते राहिलं अन राहूनच गेलं...
वाटलं यंदा तरी काही बोलावं पण अधीच दिवसभरातल्या कार्यक्रमानं उशीर झाला अन पुन्हा एकदा बोलायचे शब्द ओठांवरच राहिले...
त्यावेळेस कशीबशी एक कविता आठवली अन सादर केली पण मनात या काॅलेज मधील दिवसांवर कविता तयार होत होती अन आज फायनली झाली...
काॅलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
काॅलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही...


काॅलेज लाईफ जगता जगता भेटत गेली बरीच माणसं
कोणी वाटलं हक्काचं तर कोणी परकं कधी वाटलंच नाही...
जूळून आल्या नात्यांच्या अशा गुंफलेल्या रेशीमगाठी...
रक्ताच्या नाहीत असं कधी वाटलंच नाही...

जगलो दुनियादारी सोबत काही क्षण अविस्मरणीय....
आयुष्यात कधी असं जगेल वाटलंच नाही....
साथ सोबत क्लासमेट्सची लाभली न्यारी...
मित्रांसोबतचा असाही कॅम्पसकट्टा कधी मिळेल वाटलं नाही...

गॅदरींगच्या राजकारणाचा डाव शिकलो
पण कधी मैत्रीत राजकारण करावसं वाटलं नाही...
मित्र जोडत गेलो कायम चढत्या क्रमाने....
पण मैत्रीत कोणाला दगा द्यावा कधी वाटलं नाही...

पैशानं समाजात श्रीमंत होता येतं म्हणून...
आयुष्यात पैसा कमवण्याच्या मागे धावलो नाही...
आयुष्यात फक्त हक्काची माणसं कमावत गेलो...
म्हणून मैत्रीत गरीब असल्याचं कधी वाटलं नाही....

मित्रांसोबत दिल दोस्ती दुनियादारी करत
काॅलेज कॅम्पस कट्ट्यावर आयुष्य जगलो बरंचकाही...
काॅलेजमधे एकेक क्षण जगता जगता...
काॅलेज लाईफ संपलं कधी कळलंच नाही........!!!



गणेश दादा शितोळे
(१३ एप्रिल २०१५)