माझ्या पहिल्या पुस्तकाची
प्रस्तावना...
सलामत रहे दोस्ताना हमारा...!
प्रिय मित्रमैत्रिणींनो
थँक यू. पुस्तकाची सुरवात थँक यू ने कधीच होत नसते
हे खरं आहे. पण पुस्तक लिहिण्याच्या वेळी मी विचार केला तर
मला या शिवाय दुसरी योग्य सुरवात सापडलीच नाही. मी
तुमच्यासारखाच कॉलेजचा तरुण मुलगा. पण तुम्ही माझ्यासाठी
लाखातून एक 'द स्पेशल वन' म्हणतात ना
तसे आहात. कारणही तसंच आहे. आपल्या
पहिल्या भेटीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंतच्या प्रवासापर्यंत ही साथ कायम राहिली आहे. आईवडील नेहमी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याकरीता धडपडत असतात. माझ्याही आईवडीलांनीही तेच केलं. आईवडीलांच्या
उपदेशाचा या वयात रागच येतो. पण त्याच वेळी आपली भेट झाली. एक प्रेरणा देणारी मैत्री म्हणून बेस्ट लक म्हणत फॉरमँलिटी म्हणून का
होईना प्रौत्साहन देणारी मैत्री कधी हक्काची झाली कळालंच नाही.
माझ्या जीवनात मैत्रीचा खूप मोठा वाटा आहे. जिवलग मैत्री होईपर्यंत किंवी अशी मैत्री करणारी व्यक्ती
मिळेपर्यंत मी रागिटच होतो. तापट होतो.
पण जसजसे नवनवीन मित्रमैत्रीणी भेटले तसतसा मी बदलू लागलो.
प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत गेलो. अनेक स्वार्थी नाही पण
कामापुरता मित्र म्हणणारे भेटले. त्यांच्यापासून अनेक गोष्टी
शिकलो. आणि आजही शिकत आहे. मी आज जो
आहे त्याचं श्रेय माझ्या आईवडिलांइतकाच आपल्या मैत्रीलाही आहे.
लहानपणाचा मी आता खुप बदललो आहे. पूर्वी फक्त स्वतःपुरता विचार करणारा मी आता स्वतःच्या
आनंदाचा विचार करण्याआधी दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो.
नेहमी आनंदी राहतो. कितीही दुःख असेल तरी चेहऱ्यावर नेहमी
आनंद ठेवतो. आता या घडीला कुणासोबत भांडण नाही. प्रत्येक पहाट प्रसन्न वाटते. प्रॉब्लेम्स मला
सुद्धा आहेत. पण परिस्थितीशी तोंड देण्यांचं आणि कोणतेही
संकट 'फेस' करण्याचं सामर्थ माझ्याकडे
आहे. ते फक्त मैत्री मुळेच. आता अर्धा
भरलेला ग्लास बघण्याची सवय लागली आहे.
मी काही फार हुशार वगैरे मुलगा नाही. यशापेक्षा माझ्या वाट्याला अपयशच जास्त आलं. तरीही मी मोडून पडलो नाही. कारण एकच मैत्रीचा आधार. 'माय इन्स्पिरेशन' म्हणून मी
नेहमी माझ्या मित्रमैत्रीणींकडेच पहातो. त्यांच्या अनेक
आठवणी मी मनाच्या कोपऱ्यात साठवलेल्या आहेत. कधी सहज
वाटल्यास एखाद्या निवांत संध्याकाळी माझ्या जगण्याला धीर म्हणून त्या आठवणीत
रमण्याचा प्रयत्न करतो.
आयुष्याच्या वाटेवरून जाता जाता मागे वळून पाहावेसे वाटते. पुढे जाता जाता, थोडे थांबावेसे वाटते.
इथवर आलो याचे कुतुहूल वाटते, जाता जाता थोडे
स्वस्थ बसावेसे वाटते. थांबून जरा आजवरच्या प्रवासाचे पान
उलगडावे वाटते, जाता जाता त्याबद्दल विचार करावेसे वाटते.
सरत्या वर्षातल्या सुखदुःखाचा हिशेब मांडत ताळा करता येईल खरं तर या
टप्प्यावर.
पण करायलाच हवा का?
पण वेळ होईल म्हणून पुन्हा एकदा उठावेच लागते, जाता जाता हेच दुःख अंगाशी बाळगत चालावेच लागते, चालावेच लागते.
तसे आपण प्रत्येकजण आपल्या कॉलेजच्या कट्ट्यावर, आपल्या खास अड्ड्यांवर भेटलो.
परस्परांची सुखदुःख वाटून घेतली. कधी आपलं आयुष्य वाचता वाचता
डोळ्यात टचकन पाणीच आलं तर कधी कुठल्याशा लेखातल्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या एका
साध्याश्या वाक्याने आपण जगण्याचा नव्यानं विचार करायला घेतला. त्या साऱ्यातून
एखाद्या साध्याश्या वाक्यामधून आपल्या कॉलेजच्या टीमलाही खास काहीतरी करण्याची नवी
धडाडी सतत मिळत गेली. आपली 'मैत्री' अशी दिवसेंदिवस वाढतच गेली. परस्परांच्या मदतीने
आपण समृद्ध होत गेलो. तसा क्वचित वादही घातला, टोकाची मतं मांडत चर्चा केल्या. जे आजिबात आवडलं
नाही ते रोखठोक सांगून टाकलं. जीवाभावाची दोस्ती आपली.
जीव लावणारी आणि मित्रमैत्रीणींसाठी जीवाचं रानं करणारीही! हक्कानं सांगणारी. अधिकारानं मागणारी.
इतक्या वर्षांचा आढावा घेताना मलाही वाटलं; एखादं पुस्तकचं 'मैत्री' वरच का असू नये? खास आपल्या सगळ्यांच्या आपल्या
मित्रमैत्रीणींच्या मैत्रीवर !
आयडिया सुचली आणि नजरेसमोर उभा राहिली मैत्रीची शेकडो रुपं.
नुस्ती कल्पना करा, मैत्री
किंवा मैत्री असा शब्द उच्चारला तरी मनात एक अवखळ लाटच येते.
नजरेसमोर उभे राहतात आपल्या शाळेतले खास अड्डे. कॉलेजचे
कट्टे. सबमिशनसाठी मारलेल्या नाईट्स आठवतात. एक प्लेट मिसळ तर्री टाकटाकून पाच जणांनी ओरपल्याच्या खास आठवणी. उडवलेल्या गाड्या आणि तुडवलेले रस्ते.. तासानतास
मारलेल्या गप्पा. उसनवारीची पैसे.
वडापावच्या पैजा. टाकलेले सिनेमे. घरी
मारलेल्या थापा. पचवलले घोळ. रात्र
रात्र केलेला कल्ला. अंगलट आलेल्या कुरपती. खुळचट गैरसमज नकोसे अबोले. डोकं भडकून केलेली भांडण. मग लावलेलं किलो किलो लोणी. होलसेलमधे खाल्लेला भाव. मित्रमैत्रीणींच्या नसत्या भानगडीत खुपसलेलं नाकं.
ग्रुपमधील मित्रांच्या प्रेमाची केलेली राखण. त्यांच्यासाठी
अरेंज केलेल्या सेटिंग्स. त्यांना आग्रहाने करायला लावलेले
प्रपोज. त्यातून डोळ्यादेखत घडली मोडलेली 'प्रकरणं.'
काय आणि कसं मोलं लावणार आपल्या मैत्रीचं! यशाच्या पायऱ्या चढताना आणि अपयशाचे घाव सोसतानाही आपले
मित्रमैत्रीणी सोबत आहेत. जगाने पाठ फिरवली तरी आपले
मित्रमैत्रीणी आपल्याबरोबर असतील, आपल्यावर विश्वास ठेवतील ही
भावना मोठमोठ्या संकटातून तगवून नेते. आपला छोट्यात छोटा
आनंद मित्रमैत्रीणींबरोबर वाटला की तो कित्येक पटीने वाढतो.
हा अनुभव तर नेहमीचाच. मैत्रीची सर कोणत्या नात्याला येईल? मैत्री
असं नात्याचं नाव असलं तरी तिच्या छटाही व्यक्तीगणिक इतक्या बदलत जातात की केवळ
मैत्री या नात्यात नाहीच बसवता येत त्या भावनेला !
फ्रेण्ड्स फॉरेव्हर असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसे जर खरेच
असेल तर हाताच्या कोपऱ्यापर्यंत फ्रेंडशिप बॅण्ड बांधून, मार्करने गिरगटून भरवलेले
टि शर्ट कशाला हवे असतात. मोबाइलचा इनबॉक्स फ्रेंडशिपच्या मेसेजेसनी भरून वाहतो. स्वतःच्या
मनातले काही नसते. इकडून तिकडून कॉपी पेस्ट झालेले सारे उसनीवारी
पाठवतात. जर आपण सदा फ्रेंड्स फॉरेव्हर मानतो तर मग आपल्या
मैत्राला का फक्त एक दिवसच साजरा करावा लागतो.
'रिश्तोंका इल्जाम'
तसाही या मैत्रीला मान्य नाही. ती फक्त असते. तिची ना काही व्याख्या करता येते ना तिला जगाच्या व्यवहारातील काही नियम
कळतात. ना तिला स्त्री पुरुष संबंधाच्या चौकटी बांधता येते. आजच्या पिढीतल्या आपल्याला विचारा स्त्री पुरषांमधे शुद्ध मैत्री असते की
नसते असले खुळचट प्रश्न आपल्याला पडत नाहीत, त्यापलीकडे या
मैत्रीने आपली निर्मळ जागा तयार केलीय. जिवाभावाचा एकच मित्र
किंवा एकच मैत्रीण अनेकांना असते. 'जान
से प्यारी दोस्ती' अनेकजण जगण्याच्या प्रत्येक प्रसंगात
निभावतात. पण एकाच माणसाभोवती आयुष्य गुंफण्याची ही रीतही या
नात्यानं मोडलीय. मोठा मित्र परिवार.
त्याची सतत साथ पाठींबा. आणि त्यांचं असणं ही अनेकांच्या
आयुष्याची खरी पुंजी झालेली दिसते.
एकीकडे माणसांच्या नात्यांवर अविश्वासाच्या सावल्या गडद होत
असताना, नाती तुटत असताना मैत्रीच्या नात्याने
मात्र नवीन माणसांचे परिवार तयार केले आहेत. साऱ्या
भेदांच्या पलीकडे ही मैत्री माणसांतला स्नेह व्यापून उरलीय.
मैत्रीच्या नात्याचा असा सुंदर वेध घेणारे, त्यातले पदर
उलगडून दाखवणारे. मैत्रीच्या रंगानी खुललेल्या आयुष्यातला
आनंद वाटणारे धावणाऱ्या आयुष्यात मागे पडलेल्या मित्रांसाठी काही काळ थांबून
त्यांना हात देणारे हे विशेष पुस्तक.
हे विशेष पुस्तक वाचताना,
आठवलेच काही दूर गेलेले मित्रमैत्रीणी तर त्यांना लिहा एखादं पत्र. करा एखादा मेसेज, रागावला असेल तो /ती तर फोन करुन
सॉरी म्हणून टाका. वेळ नाही या सबबीखाली केलाच नसेल खुप दिवस
फोन तर तातडीने लगेच नंबर फिरवा. आणि भेटलाच नसाल बरेच दिवस
तर हातातली कामं सोडा आधी भेटून गप्पांचा अड्डा जमवा....
बघा जुने मित्र नव्याने भेटतील आणि नवे कायम आपले होऊन
जातील. असं म्हणतात तुमच्या डोळ्यात दोन आश्रू आले
तर तो टिपायला किती मित्रमैत्रीणींच्या ओंजळी पुढे येतात यावर ठरते माणसाची
श्रीमंती.
आपण सारे असेच श्रीमंत होऊ....
समर्पित
हे पुस्तक माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींना आणि आमच्या
मैत्रीला समर्पित.
अनिकेत पटने, रोहन हिंगे, सागर लडकत, अक्षय निंबाळकर, विशाल देशमुख, ओंकार काळभोर,
कार्तिक उडताले, अक्षय खवले, विपुल गिरमकर, रोहित देशमुख व बाकी साधना विद्यामंदीर,
हडपसर मित्र परिवार.
वैभव पाचपुते, दत्तात्रय गायकवाड, वैभव कोकाटे, अमोल कोकाटे, धनंजय पाचपुते, राहुल
पांडकर, राहुल सुर्यवंशी, विकास शिंदे, तुषार शिंगाडे, श्रीपाद राऊत, राहुल पठारे,
पराक्रम शिंदे व बाकी जनता विद्यालय, काष्टी मित्र परिवार.
सागर भगत, ऋषीकेश बांडे, मोहन भुजबळ, विशाल वागस्कर, सावन मुनोत, किशोर व्यवहारे, सचिन कराळे, प्रवीण शिंदे, प्रतिक सोनावणे,
प्रमोद लहाकर, सनी कानडे, हेमंत घोडे, विवेक नांगरे, सागर पाटील, सागर गडकर, सुहास
गवळी, मोनीश मांढरे, अमर आंबेकर, सुरज जोशी, राहुल घोटेकर, निलेश घोटेकर, अभिजीत
गोसावी, राम केळुसकर व बाकी शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर (मेकॅनिकल) मित्र परिवार.
राहुल गिऱ्हे, महेश आडेप, संतोष
गाढवे, नंदकिशोर मोरे, स्वप्निल कोकाटे,
बाळासाहेब खाडे, मेघराज जाधव, महादेव दोलनार, व बाकी शासकीय तंत्रनिकेतन,
अहमदनगर (संगणक विभाग) मित्र परिवार.
प्रशांत थोरात, राहुल गाढवे, सागर गाढवे, राहुल काकडे, सचिन भुसाळ, गणेश रायकर,
निखील जाधव, परिक्षीत उगले, रामकृष्ण ढोकणे, विक्रम धाकतोडे, विशाल चेके, सुहास
क्षीरसागर, वैभव साठे, संदिप आंधळे व बाकी वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर
मित्र परिवार.
प्रसन्ना गोडसे, अविनाश घोसाळकर, नाना मैंदाड, निखील पाटील, उमेश निंबाळकर, मनोज
होलम, निखिल इंदलकर, मंगेश पोपळे, योगेश गारूडी, सचिन खरात, शिवप्रसाद शर्मा व
बाकी शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर (विद्युत व संदेशवहन विभाग ) मित्र परिवार.
अबोली पाटील, आरती दळवी, प्रचेता
गवारे, प्राची ठुबे, पुजा कोहक व व्हायरस
ग्रुप.
मंगेश मोरे, श्रीकांत नागवडे, रोहित
ननावरे, महेश बांडे, श्रीराम पवळे,
निलेश शितोळे, स्वप्निल साळुंखे, रोहित साठे, जयदिप नलावडे, श्रीकांत
इंगावले, महेश वारे, प्रनित समगीर, विकास डोंगरे रौनक नय्यर, कृष्णा साठे, प्रशांत
पाचपुते, निलेश कोलते, प्रमोद मुरकुटे,
प्रविण गाडे, आभाश शुक्ला, अल्पेश कराडे, स्वप्निल खंदारे, उमेश फडतारे, प्रशांत निंबाळकर, संजय शेळके व बाकी
परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी (यंत्र विभाग) मित्र परिवार.
प्रशांत जगताप, अभिषेक पाचपुते, सोनल गवते, चेतन भापकर,
रोहित सांबरे, वैभव सोनावणे व बाकी परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी
(स्थापत्य विभाग) मित्र परिवार.
दादासाहेब कर्पे, अक्षय खैरे, विलास
पुंड, अविनाश निंबोरे, प्रवीण जामदार,
रोहित अहिरराव, निलेश साळुंखे, अविनाश कुसमुडे, अशोक चांडे,
अक्षय लगे, महेश थोरात, सोमनाथ
जाधव, राहुल मेरगळ, युवराज कुद्री, संदीप सोनटक्के, आशुतोष
लांडे, शुभम जाधव, अक्षय कदम, प्रविण कुसमुडे व बाकी भोईटे
रेसिडेन्सी, काष्टी मित्र परिवार.
गणेश शिंदे, सागर भोसले, आशिष शिंदे, अविनाश रणमोडे, किरण साळुंखे, दिपक जाधव,
सुधिर पवार, धिरज जाधव व बाकी वृंदावन मित्र परिवार.
मनोहर रोहकले, अमोल जाधव, रिषभ शुक्ला, अभयसिंह राजेभोसले, सागर राजपुरे,
श्रीकांत रासकर, विशाल सुर्यवंशी, प्रशांत चौधरी, प्रमोद रणदिवे, शेखर मोरे, रोहित
बनसोडे, रणजीत ननावरे व बाकी परिक्रमा अभियांत्रकी महाविद्यालय, काष्टी (विद्युत व
संदेशवहन विभाग) मित्र परिवार.
श्रीकांत शितोळे, योगेश डोके, सागर पवार, सतीश डोके, राहुल सुपेकर, सुहास
डोके, सागर काळे, गणेश डोके, रणजीत गिरमकर, तेजस तावरे, अमोल शिर्के व मित्र
परिवार
किशोर खेडकर, प्रमोद बेंडभर, ओकार हंडोरे, योगेश कारंडे, प्रताप गवळी, विशाल
खोरे, घणशाम पाटोळे, किरण दिवटे, सचिन उंडे व मित्र परिवार.
महेश जाधव, वैभव जाधव, आशिष मोगल, सुरज कांबळे, मंगेश बारवकर, सागर जगताप,
ऋषिकेश जगताप,नागेश जगताप, विकास इथापे, मनोज कानवडे, गुलाब आवारी, सचिन चव्हाण, आशिष
पाटील, निखिल महाजन व इतर प्रायमस टेकसिस्टिम मित्र परिवार.
गणेशदादा शितोळे
०५ ऑगस्ट २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा