रंग...!!!
जगण्याला रंग नसतो की
मरणाला...
पण तरीही,
पण तरीही आपण
कायमच अडकत असतो
या ना त्या रंगातंच...
इकडे आड अन
तिकडे विहीर झाल्या
सारखं...
कधी जातीचा रंग डोक्यात
शिरतो...
कधी धर्माचा रंग जीव
घेतो...
पिवळा, हिरवा, भगवा, निळा
रंगाचाही बाजार उठतो...
नशीब त्या निसर्गाचं...
त्यानं अजून रंग बदलला
नाही
सर्वांना सामावून
घेण्याचा...
कधी वर्णाचा अहम चढतो...
गोरे नसण्याचा कमी पणा
वाटतो...
चामड्याचा रंग
बदलण्याचाही
बाजार मांडलाय...
नशीब त्या कातड्याचं
त्यानं अजून गुण सोडला
नाही
मातीत मिसळून जाण्याचा..
अमुक तमुक रंग रंग करत
आयुष्यालाही ज्वर
चढतो...
मरणाच्या उंबरठ्यावर
टेकल्यावर
जगण्यात जीव जडतो.
नशीब त्या रक्ताचं...
अजून त्यानं तरी अजून
रंग बदलला नाही
माणूसकीचा...
गणेशदादा
शितोळे
२ मार्च
२०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा